Home » यूक्रेनने बुडवली रशियाची सगळ्यात ताकदवान युद्धनौका!

यूक्रेनने बुडवली रशियाची सगळ्यात ताकदवान युद्धनौका!

by Team Gajawaja
0 comment
Russia Ukraine War
Share

रशिया आणि यूक्रेन यांच्यामधलं युद्ध अजूनही सुरू आहे. २४ फेब्रुवारी २०२२ला रशियाने यूक्रेनमध्ये सैन्य पाठवलं. सुरुवातीला रशियन सैन्याने आगेकूच केली, पण सद्य परिस्थितीत यूक्रेन रशियाशी चिवटपणे लढत आहे. आपल्याला वाटेल रशियासारखी मोठी लष्करी ताकद यूक्रेनशी आरामात लढत असेल… म्हणजे आपल्याला वाटेल रशिया क्रूर पद्धतीने यूक्रेनमध्ये शिरला आणि आता यूक्रेनचा नायनाट करतो आहे. ही गोष्ट पूर्ण खरी नसून थोडी खरी आहे. (Russia Ukraine War)

याचं कारण यूक्रेनच्या मदतीला अमेरिका आणि तिचे मित्रदेश धावून आले आहेत. त्यामुळे या युद्धरूपी चित्रपटातला व्हिलन फक्त रशिया नसून यूक्रेन, अमेरिका आणि मित्रराष्ट्रसुद्धा आहेत. यामध्ये यूक्रेन आणि अमेरिका पण तेवढेच दोषी आहेत. काही दिवसांपूर्वी यूक्रेनने अमेरिकेच्या मदतीने रशियाचे ब्लॅक सी फ्लिटमधले फ्लॅगशिप म्हणजेच नेतृत्व करणारे आणि सगळ्यात ताकदवान असं जहाज ‘मॉस्कव्हा’ हे काळ्या समुद्रात बुडवलं. 

ओडेसा या प्रांताच्या जवळ काळ्या समुद्रात साधारण १२० किमी दूर असताना ‘मॉस्कव्हा’वर दोन मिसाईल्स डागल्यानंतर काही वेळाने रशियाचे जहाज समुद्रात बुडाले आणि त्याला जलसमाधी मिळाली. अमेरिकेने यावर थेट भाष्य करणं टाळलं आहे. (Russia Ukraine War)

अमेरिकेचा परराष्ट्र विभागाचा प्रवक्ता एवढंच म्हणाला की, यूक्रेनने ‘मॉस्कव्हा’वर दोन मिसाईल्स डागल्या आणि ते जहाज बुडाले, यासाठी रशियाच्या जहाजाचं स्थान नक्की कुठे होतं आणि ते कुठे निघालं होतं याबद्दल अमेरिकेच्या गुप्तचर संस्थानी यूक्रेनियन मिलिटरीला माहिती पुरवली. पण या जहाजाच्या हल्ल्यात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. 

‘मॉस्कव्हा’ हे रशियाच्या ‘ब्लॅक सी फ्लिट’ मधलं सगळ्यात मोठं, नेतृत्व करणारं, म्हणजे ज्या जहाजावर साधारणतः कमांडिंग ऑफिसर (अँडमिरल) असतो आणि तो आदेश देत असतो; ही युद्धनौका या प्रकारचीच होती. (Russia Ukraine War)

यूक्रेनवर जेव्हा रशियाने चढाई करायला सैन्य पाठवलं तेव्हा या जहाजाने प्रथम यूक्रेनच्या दिशेने काळ्या समुद्रात कुच केलं. ते ‘सेवास्तोपोल’ इथून निघालं होतं. १४ एप्रिल २०२२ ला या बद्दल माहिती मिळताच या युद्धनौकेवर यूक्रेनच्या सैन्याकडून दोन R – 360 नेपच्यून अँटी शिप मिसाईल्स डागण्यात आल्या. 

याउलट रशियाने याबद्दल मॉस्कव्हा युद्धनौका यूक्रेनच्या हल्ल्यात बुडाली नसून त्या युद्धनौकेवर त्याच्या दारुगोळ्याला आग लागली म्हणून ते बुडालं हे कारण दिलं आहे. अर्थात ते बहुतेक तितकस खरं नाही. यूक्रेनने सांगितल्यानुसार ‘ओडेसा’ या भागातून जमिनीवरून मारा करणाऱ्या लॉंनचर वरुन या मिसाईल्स डागण्यात आल्या होत्या. (Russia Ukraine War)

मॉस्कव्हा ही युद्धनौका आकाराने प्रचंड मोठी होती. या जहाजाची लांबी होती १८६ मीटर. या जहाजावर ५१० इतका कर्मचारीवर्ग (Crew) होता. रशियाने मॉस्कव्हाबद्दल सांगताना म्हटलं आहे की, हे जहाज खराब वातावरणामुळे आणि खवळलेल्या समुद्रातील वादळामुळे बुडाले आहे. रशियाने अधिकृतपणे मृतांची आकडेवारी जारी केली, त्यात म्हटलं की १ कर्मचारी मृत पावला आहे, तर २७ जण बेपत्ता आहेत, तर यूक्रेनकडून सांगण्यात आलं की, बरेच कर्मचारी यात मृत पावले आहेत. 

रशियाच्या पुतीन यांनी यूक्रेनला वॉर्निंग दिली आहे; यूक्रेनने आणि अमेरिकेने युद्धं थांबवलं नाही, तर रशिया यूक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करेल. बेलारूस हा देश तसा रशियाच्या बाजूने उभं राहणारा… पण बेलारूसचे अध्यक्ष आलेक्झानडर ल्युकाशेनको यांनी सांगितले की, “अण्वस्त्र हल्ला करणं  म्हणजे सगळीकडे विनाशच विनाश आणि याची प्रचंड किमत आपल्याला मोजावी लागेल.” अर्थात ल्युकाशेनको पुढे हेसुद्धा म्हणाले आहेत की, “यूक्रेनचे अध्यक्ष झेलेनसकी आणि अमेरिकेचे बायडन यांनी ठरवलं, तर ते हे युद्ध काही वेळातच संपेल.” यामधला सुचक इशारा म्हणजे अमेरिकेने यूक्रेनला मदत करणं थांबवाव आणि झेलेनसकी यांनी ताबडतोब शरणागती पत्करावी. 

========

हे देखील वाचा – पहिल्याच हिंदी सिनेमात आईची भूमिका साकारणार ‘ही’ साऊथची सुपरस्टार अभिनेत्री

========

अमेरिका तर यूक्रेनला भरमसाठ निधी देत आहे. बायडन यांनी ३३ बिलियन डॉलरची सैनिकी आणि आर्थिक मदत देण्याकसाठी अमेरिकन कॉँग्रेसला विनंती केली आहे. अमेरिका म्हणते, “यूक्रेनला लष्करी मदत देणं म्हणजे आम्ही रशियावर हल्ला करत नाही”, हे तितकसं बरोबर नाही. याचं कारण अमेरिकेच्या एकूण पाच मिलिटरी साहित्य तयार करणाऱ्या आणि पुरवणाऱ्या कंपन्यांकडून ही शस्त्रास्त्र अमेरिका यूक्रेनला देणार म्हणजे अशाप्रकारची लष्करी मदत अमेरिका करणार आहे आणि करतही आहे. (Russia Ukraine War)

सुज्ञ लोकानी यावरून काय तो अर्थ काढावा. याचा अर्थ रशिया बरोबर आहे असं नाही, तर यूक्रेनचं काय चुकत आहे आणि अमेरिका कसं शस्त्रास्त्र स्पर्धेला खतपाणी घालत आहे हे यावरून लक्षात येतंय. रशिया – यूक्रेन युद्ध लवकर थांबावं आणि दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी होऊन त्यांनी शांततेच्या मार्गाने चर्चा करून हा प्रश्न सोडवावा, एवढीच अपेक्षा आहे.

– निखिल कासखेडीकर 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.