आजच्या काळात मायक्रो फॅमिलीची परंपरा सुरु आहे. लोक ‘हम दो, हमारे दो’ च्या कॉन्सेप्ट मागे टाकत ‘हम दो, हमारा एक’ पॉलिसी फॉलो करत आहे. दोन पेक्षा अधिक मुलं जन्माला घालताना विचार करतात. अशातच युगांडा मधील मूसा हसाया असे विचार करत नाही. त्यांनी मुलं जन्माला घालण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कारण त्याने ऐवढी मुलं जन्माला घातली आहेत की, त्याचे घर एखाद्या जिल्ह्यासारखे वाटते. मूसा हसायाने एकूण १०२ मुलं आणि ५७८ नातवडं आहेत. त्यांनी एकूण १२ लग्न केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी १०२ मुलं जन्माला घातली. आता त्यांच्या मुलांची मुलं ५७८ क्रॉस झाली आहेत. एका गावात केवळ यांचाच परिवार आहे. मूसाला आपल्या सदस्यांची नाव ही माहिती नाहीत. नातवंड सोडली तर मुलांची नाव ही लक्षात नाही.(Uganda)
मूसाला याचे वाईट वाटते की, त्यांचे आरोग्य बिघडत आहे. याच कारणास्तव ते आपल्या परिवाराल सांभाळू शकत नाहीत. युगांडाच्या बुटालेजा जिल्ह्यातील बुगिसा गावात राहणाऱ्या या परिवारात आता शेकडो लोक आहेत. मूसा हसायाने असे म्हटले की, आता त्यांच्याकडे केवळ २ एकर जमीन असून परिवारात शेकडो लोक आहेत. त्याच्या दोन पत्नींनी साथ सोडले कारण, त्यांनी त्याच्या इच्चा पूर्ण केल्या नाहीत. आता त्यांना आपल्या मुलांना जेवण, शिक्षण आणि कपडे ही देऊ शकत नाहीत.

मूसा हसाया बेरोजगार पण शेकडो नातवंड
मूसा हसाया सध्या बेरोजगार आहे. त्यांचे गाव हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कारण दूरदूरवरुन लोक त्यांचा परिवार पाहण्यासाठी येतो. मूसा यांचे असे म्हणणे आहे की, पुढे जाऊन परिवार आणखी वाढू नये. यासाठी त्यांच्या पत्नी बर्थ कंट्रोलवर काम करत आहेत.(Uganda)
मुलं जन्माला घालून पश्चाताप व्यक्त करतायत मूसा
मूसा हसाया यांना ऐवढी मुलं जन्माला घालून पश्चाताप व्यक्त करत आहेत. ते असे म्हणतात माझ्या पत्नी आता गर्भ निरोधक गोळ्या घेतात. पण मी घेत नाही. मला आणखी मुलं जन्माला घालण्याची अपेक्षा नाही. कारण ऐवढी मुलं जन्माला घालून मी बेजबाबदारपणा केला आहे. मी हे शिकलो की, त्यांची देखभाल करु शकतो.
मूसा हसाया एका तुटलेल्या घरात राहतात. लोखंडाचे पाईप घरात लावण्यात आले आहेत. त्यांच्या आसपास दोन डझन गवत-मातीच्या झोपड्या आहेत. त्यामध्येच विविध घरात त्यांचा परिवार राहतो. त्यांनी स्वत:चे गाव वसवले आहे.
हे देखील वाचा- नाणी किंवा नोटा नव्हे तर दगडाच्या करंसिने येथील लोक व्यवहार करतात
कधीपासून मुलं जन्माला घालतायत मूसा हसाया?
मूसा हसायाने १९७२ मध्ये पहिल्यांदा लग्न केले होत. वयाच्या १७ व्या वर्षातच त्यांनी पहिले मुलं सँन्ड्रा नबवीरचा जन्म झाला. त्यांच्या नातेवाईकांनी सल्ला दिला होता की, त्यांना आपला वंश वाढवण्यासाठी मुलं जन्माला घालत आहेत.