अमेरिकेच्या संरक्षण विभागाची यंत्रणी जिथे आहे, त्या पेंटागन भागात अनेकवेळा युएफओ म्हणजेच, उडत्या तबकड्या बघितल्याची नोंद झाली आहे. पृथ्वीव्यतिरिक्त अन्य ग्रहावर राहणा-या सजिवांबाबत कायम उत्सुकता राहिली आहे. मुळात पृथ्वीव्यतिरिक्त अन्य कुठल्या ग्रहावर सजिव वस्ती आहे का ? हे जाणणेच अधिक उत्सुकतेचे आहे. अशात अमेरिकेमध्ये अनेकवेळा युएफओ बघितल्याची नोंद आहे. आता हेच युएफओ चक्क भारताच्या सिमेवर दिसल्याची नोंद झाली आहे. (Manipur)
जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान क्रिकेटचा विश्वचषक सामना खेळला जात होता त्याच वेळी मणिपूरच्या सिमेवर दोन युएफओ खूपवेळ दिसल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर भारतीय सैन्यानंही या उडत्या तबकड्यांची नोंद घेऊन त्यांच्या मागोवा काढण्यासाठी दोन राफेल विमाने पाठवल्याचे चित्रण स्थानिक तरुणांनी केले आहे. या घटनेची आता मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर चर्चा होत आहे. काहींच्या मते या उडत्या तबकड्या नसून चीननं मणिपूर सिमेवर भारतातर्फे चालू असलेल्या कामांची माहिती घेण्यासाठी पाठवलेले द्रोण होते. तर काही चर्चांमध्ये मणिपूर सिमेवर यापूर्वीही अनेकवेळा अचानक प्रकाश दिसला असून, या भागातील जंगलात उडत्या तबकड्या उतरत असल्याचेही या चर्चातून सांगण्यात येत आहे.
रविवारी क्रिकेटच्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात असताना मणिपूर सिमेवर मात्र वेगळेच नाट्य रंगले होते. मणिपूरमधील इम्फाळ विमानतळाजवळ बराचवेळ आकाशात काहीतरी चमकतांना दिसत होते. उत्साही तरुणांनी शुटींग केल्यावर ते यूएफओ सारखे असल्याचे दिसले. काहीवेळानं या यूएफओ सारख्या दिसणा-या प्रकाशाचा मागोवा घेण्यासाठी भारतीय सैन्याच्या राफेल या लढाऊ विमानाने आकाशात झेपही घेतली. मणिपूरच्या सिमेवर आकाशात फिरणारी राफेल स्थानिकांना दिसत होती. मात्र राफेल येण्यापूर्वी काहीवेळ आधीच युएफओ सारखे दिसणारी अज्ञात विमाने वेगानं अधिक वर गेल्याचे काहींनी सांगितले. त्यानंतर त्यांचा प्रकाश दिसेनासा झाला. (Manipur)
या घटनेमुळे मणिपूरमध्ये एलियन्सचा वावर आहे का य़ याची चर्चा सुरु झाली. मुख्य म्हणजे, ही युएफओ जेव्हा आकाशात होती, तेव्हा त्याचा सर्व विमानांच्या हालचालींवर परिणाम झाला. या उडत्या तबकडया अत्यंत स्पष्टपणे दिसत असतांना स्थानिकांनी त्यांचे व्हिडिओही केले. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. हवाई दलाचे राफेलही त्यांचा शोध घेत असतांना अनेक विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली. या घटनेमुळे युएफओ आल्याची अधिकच चर्चा सुरु झाली. मात्र त्यासोबत अनेकांनी सावधतेची भूमिका घेतली असून हे युएफओ नसून चीनची हेरगिरी करणारी लहान विमाने असल्याचे सांगितले आहे.
यापूर्वीही चीननं हेरगिरी करण्यासाठी अशा लहान आकाराच्या विमानांचा वापर केल्याचा आरोप खुद्द अमेरिकेनं केला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या हवाई हद्दीतच एक चिनी गुप्तहेर फुगा आढळून आला होता. अमेरिकेच्या लष्करानं हा फुगा पाडला तेव्हा त्याचा आकार तीन बसएवढा मोठा असल्याचे लक्षात आले. शिवाय त्यात काही यंत्रसामग्रीही होती. (Manipur)
चीननं हवामान बदलाचे निरिक्षण करण्यासाठी फुगा आकाशात सोडल्याचा कांगावा केला असला तरी अमेरिकेनं याद्वारे चीन आपल्या हवाई तळांची पहाणी करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनेक देशात असे मोठे फुगे आढळून आले. मणिपूरमधील सिमेवर अशाच प्रकारचा मोठा फूगा असण्याची शक्यताही अनेकांनी व्यक्त केली आहे. याशिवाय इंग्लडमधील प्रचार माध्यमांनीही इंग्लंडच्या माध्यमांनी चीनच्या हेरगिरीबाबत पुरावे सादर केले आहेत. यात जपान आणि तैवानमधील घटनांचाही समावेश आहे.
मणिपूर सिमेजवळही चीननं हेरगिरी करण्यासाठी असाच फुगा पाठवला असल्याचे काही तज्ञांचे मत आहे. चीन यूएफओ सारखे दिसणारे फुगे जगातील विविध देशांमध्ये पाठवत आहे. चीनने मणिपूरजवळील म्यानमारच्या कोको बेटा वर हेरगिरीच्या कारवायांसाठी तळ बनवला आहे. येथे धावपट्टी, हँगर आणि पाळत ठेवणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. म्यानमारमधील कोको बेटावर चीनचा गुप्त लष्करी तळ बांधण्यात आला असून त्यावरुनच या यूएफओ सारख्या फुग्याचे नियंत्रण चीन करत असल्याचा संशय आहे. (Manipur)
==============
हे देखील वाचा : वास्तुनूसार वर्कटेबलवर ‘या’ गोष्टी ठेवणे टाळा
==============
या वर्षी जानेवारीमध्ये मॅक्सर टेक्नॉलॉजीने घेतलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये ग्रेट कोको बेट परिसरात नवीन इमारतींचे बांधकाम उघड झाले आहे. भारतीय तटरक्षक दलाने अंदमान बेटांवर म्यानमारचा झेंडा फडकवत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरला रोखले असता ते सर्व चिनी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले होते. धक्कादायक म्हणजे, त्यांच्याकडून पाणबुड्यांमध्ये वापरल्या जाणार्या क्रू रेडिओ आणि खोल आवाज करणारे उपकरण सापडले होते. त्यामुळेच मणिपूर सीमेजवळ दिसलेले यूएफओ नसून चीनचे ड्रोन किंवा यूएफओच्या आकाराचा फुगा असल्याचा संशय आहे.
सई बने…