Home » उद्धव ठाकरेंचं सिम्पथी कार्ड कि पवारांचं बेरजेचं राजकारण

उद्धव ठाकरेंचं सिम्पथी कार्ड कि पवारांचं बेरजेचं राजकारण

by Team Gajawaja
0 comment
Sympathy card
Share

राज्यात आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांची तयारी चालू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक असे दोघेही विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. सध्या महाराष्ट्राचं राजकारण यामुळेच तापलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंनी काही महत्वाचे पक्षप्रवेश करून घेतले आहेत. महत्वाचं म्हणजे राजू शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी भाजपातून पक्षात घेतलं आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी जिथे आमदारांचा पक्षात समावेश केल्यामुळे पक्षालाच मदत होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल. त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात काही अडचण नाही असं वक्तव्य केलं आहे. यामुळे अजित पवार गटाचे बॅनर लावणारे अनेक कार्यकर्ते आणि नेते विधानसभा लक्षात घेऊन शरद पवार गटात परततील अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद अपवर हे दोघेही पक्षप्रवेश करून घेत असले तरी दोघांची स्ट्रॅटेजी वेगळी आहे? आणि नेमक्या कोणत्या स्ट्रॅटेजीचा महायुतीला सर्वात जास्त धोका असेल? (Sympathy card)

तर उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या आधीच पक्षप्रवेशांचा सपाटा लावला होता. मात्र त्यांचे हे पक्ष प्रवेश दुसऱ्या पक्षातून होते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या एकही नेत्याला त्यांनी पुन्हा पक्षात स्थान दिलेलं नाहीये. सोबतच त्यांनी स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांना पुन्हा सोबत घेणार नसल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या आमदारांचा सातत्याने गद्दार असा उल्लेखही त्यांनी चालूच ठेवला आहे. थोडक्यात येत्या विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांना गद्दार विरुद्ध निष्ठा या नॅरेटिव्हवरच खेळायचं असल्याचं दिसत. यातून पुन्हा पक्ष, पक्ष काढून घेणे, त्यासाठी असलेलं भाजपचं पाठबळ असं सिम्पथी कार्डही उद्धव ठाकरेंना खेळता येणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापुढे एक मोठा आव्हान असणार आहे. (Sympathy card)

लाडकी बहीण योजना, स्त्रियांना अर्ध्या किंमतीत बस प्रवास, आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे निष्ठा- गद्दार नॅरेटिव्ह, सिम्पथी कार्ड याला काउंटर करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र त्यासाठी त्यांना अजून प्रयत्न करावे लागू शकतात. मात्र यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या परतीला पूर्णपणे विरोध केला असल्याने एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे आमदार त्यांच्या बरोबरच असतील. सोबतच राजकीय भविष्याची चिंता असल्याने हे आमदार निवडणूकही तेवढ्याच ताकदीने लढतील.

मात्र अजित दादांच्या गटात असलेल्या आमदारांकडे परतीचा ऑप्शन मात्र कायम आहे. पक्ष फुटीमुळे शरद पवारांपुढे चॅलेंज वेगळ असलं तरी त्यांनी त्यासाठी आपला मार्ग बदललेला नाही. त्यांनी त्यांच्या बेरजेच्या राजकारणच पर्याय चालूच ठेवला आहे. निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवाराला पक्षात घेणे मग तो विरुद्ध विचारधारेचा किंवा भूतकाळात पक्षाचा कट्टर विरोधक का असेना. हे शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाचं मूळ आहे. हेच तत्व वापरत त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर धैर्यशील मोहिते पाटील, निलेश लंके, बजरंगबाप्पा सोनावणे यांना तिकीट दिलं. महत्वाचं म्हणजे निलेश लंके हे अजित पवार गटात होते तर बजरंगबाप्पा सोनावणे हे निवडणुकीच्या अगदी महिनाभर आधी अजित पवार गटाशी चांगले संबंध राखुन होते. (Sympathy card)

==================

हे देखील वाचा: एकच वा(य)दा…अजितदादा

==================

आताही शरद पवारांनी हि स्ट्रॅटेजी कायम ठेवली आहे. त्यामुळेच आता अजित पवारांकडील आमदार आणि आमदारपदासाठी इच्छुक असलेले अनेक जण तुतारीचं चिन्ह हातात घेण्याचे संकेत देत आहे. महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी राष्ट्र्वादीतली लढाईही निष्ठा विरूद्ध गद्दारी अशी ठेवलेली नाहीये. त्यामुळे अजित पवार कि शरद पवार असा सामना होताना दिसत आहे. या सामन्यमध्ये लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांना सहज मात दिली आहे. ज्यामुळेही अजित पवारांच्या गटात असलेल्या आमदारांच्या मनात अस्वस्थता आहे. थोडक्यात सध्या अजित पवारांपुढे तर शरद पवारांचं निवडणुकीच्या आधीच आव्हान आहे. मात्र ऐकनूच महायुतीला उद्धव ठाकरेंच्या सिम्पथी कार्डच्या आणि शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला पर्याय द्यावा लागणार आहे एवढं नक्की.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.