Home » उधारीने सुरु केले होते काम, 25 वर्षात उभारली भारतातील चौथी मोठी बँक

उधारीने सुरु केले होते काम, 25 वर्षात उभारली भारतातील चौथी मोठी बँक

कोटक महिंद्रा बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर उदय कोटक यांनी आता निवृत्तीची घोषणा केली आहे. येत्या डिसेंबरला ते आपल्या पदावरुन निवृत्त होणार आहेत.

by Team Gajawaja
0 comment
Uday Kotak Life Story
Share

कोटक महिंद्रा बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर उदय कोटक यांनी आता निवृत्तीची घोषणा केली आहे. येत्या डिसेंबरला ते आपल्या पदावरुन निवृत्त होणार आहेत. उदय कोटक हे बोर्ड गवर्नेंस मेंबर आणि एक स्ट्रॅटिजिक शेअरहोल्डरच्या रुपात मात्र बँकेशी जोडले जाणार आहेत. नुकत्याच त्यांनी शेअरहोल्डरला लिहिलेल्या एका पत्रात असे म्हटले की, 38 वर्षांपूर्वी 13 लोकांसोबत 300 स्क्वेअर फीटच्या ऑफिसमध्ये बँक सुरु करण्याचा निर्णय हा एका योग्य वेळी घेतला होता. (Uday Kotak Life Story)

उदय कोटक हे 1985 मध्ये एका एनबीएफसीच्या रुपात आणि 2003 पासून एका कर्मशियल बँकेच्या रुपात कोटक महिंद्रा बँकेला लीड करत आहेत. भारतीय रिजर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, त्यांना डिसेंबर 2003 मध्ये एमडीच्या पदावरुन निवृत्त व्हावे लागणार आहे. कारण त्यांना या पदावर काम करुन 15 वर्ष झाली आहेत. फोर्ब्सच्या रिच लिस्टनुसार आज ते भारतातील दहावे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचे एकूण नेटवर्थ 1.15 लाख कोटी रुपये आहे. ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत बँकर आहेत.

क्रिकेटर व्हायचे होते
उदय कोटक यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी मुंबईतील सिडनेम कॉलेज मधून कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली. त्यानंतर जमनलाल बजाज इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडी येथून एमबीए केले. बालपणातच उदय कोटक यांनी क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र दुखापतीमुळे त्यांना क्रिकेटर होता आले नाही आणि व्यवसायाच्या जगात त्यांनी पाऊल ठेवले.

Uday Kotak Life Story

Uday Kotak Life Story

उधारीने सुरु केली एनबीएफसी
उदय कोटक यांच्या परिवारातील मंडळी कॉटन ट्रेडिंगचे काम करायचे. काही दिवस त्यांनी परिवाराच्या व्यवसायात मदत केली. मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. त्यांनी परिवारातील मंडळी आणि मित्रांकडून 30 लाख रुपये जमा करत 1985 मध्ये एक गुंतवणूक कंपनी सुरु केली. त्यानंतर त्यांनी महिंद्रा ग्रुप सोबत पार्टनरशिप केली आणि याच कंपनीचे नाव कोटक महिंद्रा फाइनान्स असे ठेवले. उदय कोटक यांनी हळूहळू आपल्या पोर्टफोलियोचा विस्तार स्टॉक ब्रोकिंग, इन्वेस्टमेंट बँकिंग, इंन्शुरन्स, म्युचअल फंडात केला.

2003 मध्ये मिळाला बँकेसाठी परवाना
2003 मध्ये भारतीय रिजर्व्ह बँकेकडून बँकेचा परवाना मिळाला आणि अशा प्रकारे कोटक महिंद्रा बँकेची सुरुवात झाली. आज कोटक महिंद्रा बँकेचे नाव हे भारतातील खासगी बँकांमध्ये घेतले जाते. कोटक महिंद्रा बँकेचे बाजार भांडवल हे 3.74 कोटी रुपये आहे. उदय कोटक यांनी जोखिम असणाऱ्या सेक्टरला कधीच खुल्यापणाने कर्ज दिले नाही. हेच कारण होते की, संकटाच्या वेळी सुद्धा बँकेचे प्रदर्शन हे नेहमीच उत्तम राहिले. आजच्या तारखेला या बँकेने एक लाखांपेक्षा अधिक लोकांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. (Uday Kotak Life Story)

हेही वाचा- Success Story: पद्म भूषण पुरस्काराने गौरवलेल्या सत्य नडेला यांच्या आयुष्याचा प्रवास

पहिल्या नजरेत झाले प्रेम
उदय कोटक यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास तर त्यांचे लग्न पल्लवी कोटक यांच्यासोबत झाले आहे. 1985 मध्ये उदय यांची भेट पल्लवीशी झाली. तिला पहिल्यांदा भेटल्यानंतरच्या दोन महिन्यांनी उदय यांनी पल्लवी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. उदय यांना दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा जय याने हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे आणि 2017 पासून तो कोटक महिंद्रा बँकेतच कार्यरत आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.