Home » चिमणी उडाली भुर्रर्र..ट्विटरच्या नव्या लोगोची सोशल मीडियात चर्चा

चिमणी उडाली भुर्रर्र..ट्विटरच्या नव्या लोगोची सोशल मीडियात चर्चा

एलन मस्क यांनी नुकत्याच ट्विटरचा नव लोगो लॉन्च केला आहे. मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे री-ब्रँन्डिंग करण्याच्या उद्देशाने मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे.

by Team Gajawaja
0 comment
twitter new logo
Share

एलन मस्क यांनी नुकत्याच ट्विटरचा नव लोगो लॉन्च केला आहे. मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे री-ब्रँन्डिंग करण्याच्या उद्देशाने मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. मस्क यांच्या सोशल मीडिया साइटचा नवा लोगो चिमणी नव्हे तर आता X असा असणार आहे. अशातच नवा लोगो लॉन्च केल्याच्या काही तासांनी ट्विटरवरच्या वेब वर्जनवर नवा लोगो दिसू लागला. मात्र तुम्ही X.com वर गेलात तर तुम्ही ट्विटरवर रीडायरेक्ट होता. खरंतर काही महिन्यांपूर्वी कंपनीचे कायदेशीर नाव हे X Crop असे केले होते. ट्विटरच्या सीईओ Linda Yaccarino यांनी सुद्धा नव्या लोगोवरुन ट्विट केले. (Twitter new logo)

यापूर्वी ट्विटरचे अरबपति व्यवसायिक एलन मस्क यांनी काही ट्विट्स केले होते. त्यामध्ये त्यांनी ब्लू बर्ड लोगो ऐवजी अधिकृत नव्या X लोगोची घोषणा केली होती. या व्यतिरिक्त मस्क यांनी सोशल मीडिया नेटवर्कची रीब्रँन्डिंग करत एक्स नाव देण्याची सुद्धा घोषणा केली होती. मस्क यांनी ट्विट केले होते की, आम्ही लवकरच ट्विटर ब्रँन्ड आणि हळूहळू सर्व ब्लू बर्डला गुडबाय करणार आहोत. यावरुन आता सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काहींनी ट्विटरच्या नव्या लोगोवरुन मिम्स ही शेअर केले आहेत.

नक्की का बदलला गेला लोगो?
खरंतर मस्क यांचे एक्स अक्षराशी जुने नाते आहे. एलन मस्क यांची अन्य एक कंपनी आहे त्याचे नाव सुद्धा स्पेस एक्स असे आहे. या कंपनीला यश मिळत गेले. त्यामुळेच एलन मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स ठेवले. एलन मस्क यांनी जवळजवळ २४ वर्षांपूर्वी १९९९ मध्ये x.com ची स्थापना केली होती. हेच कारण आहे की, एलन मस्क यांना एक्स हे अक्षर आवडते. ट्विटरची URL ही बदलली जाणार आहे. आता ट्विटर डॉट कॉम ऐवजी एक्स डॉट कॉम असे दिसणार हे. त्याचसोबत ब्लू बर्ड ऐवजी एक्सचा वापर केला जाणार आहे. तसेच ट्विटरचा निळा रंग हा आता काळ्या रंगात दिसणार आहे. (Twitter new logo)

एलन मस्क यांनी बँकिंग, डिजिटल शॉपिंग, क्रेडिट, लोनसाठी एक्स डॉट कॉम एक शानदार प्लॅटफॉर्म बनवला होता. त्याचसोबत मस्क यांना डिजिटल पेमेंट सिस्टिमचे नाव PayPal ऐवजी X.com ठेवायचे होते. मात्र त्यांना तसे करता आले नाही. अशातच मस्क यांचे एक्स अक्षरावरील प्रेम कळू शकते.

ट्विटरला एलन मस्क यांनी ऑक्टोंबर २०२२ मध्ये ४४ बिलियन डॉलरच्या डीलमध्ये खरेदी केले होते. त्यानंतर सातत्याने कंपनीत फार मोठे फेरबदल केले गेले. याचा परिणाम युजर्स आणि कर्मचाऱ्यांवर झाला. मस्क यांनी ट्विटरची कमान सांभाळत ट्विटरमधील काही बड्या एक्झिक्युटिव्हसला बाहेरचा मार्ग दाखवला. त्यामध्ये कंपनीचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांचे सुद्धा नाव होते. कॉस्ट कटिंग करण्याच्या नावाखाली मस्क यांनी जगभरातील काही देशात ट्विटरच्या कार्यालयांना ही टाळं लावले आणि कंपनीच्या पॉलिसीत ही बदल केले.

हेही वाचा- फोन चार्जिंग करताना तुम्ही सुद्धा ‘ही’ चुक करता का?

या व्यतिरिक्त ट्विटर लीगेसी अकाउंटला सुद्धा वेरिफाइड टॅगसाठी पैसे द्यावे लागतात. त्याचसोबत ट्विटरच्या अन्य फिचर्ससाठी सुद्धा ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन घ्यावे लागते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.