ट्विटरने कथित रुपात हजारो कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले आहे. प्लॅटफॉर्मरनुसार ५५०० कॉन्ट्रॅक कर्मचाऱ्यांपैकी जवळजवळ ४४०० जणांना कामावरुन काढले. एक्सियोस आणि सीएनबीसीसह अन्य आउटलेट्स यांनी दावा केला आहे की, कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यापूर्वी कोणतीही नोटीस सुद्धा दिली नव्हती. (Twitter Fired Contract Employees)
सीएनबीसीने सांगितले की, काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सिस्टिममध्ये एक्सेस मिळत नव्हता आणि नंतर त्यांना आपल्याला कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवल्याचे कळले. भारतात सुद्धा अशा काही कर्मचाऱ्यांना नोटीसशिवाय काढून टाकले आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्ट्सनुसार, कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या अखेरच्या मेल मध्ये ट्विटरने असे म्हटले की, नोकरीत कपात करण्यात येत आहे. सुत्रांनी असे म्हटले की, ट्विटरच्या इंटरनल नेटवर्क टीमने कथित रुपात काम करणे बंद केले आहे.
एलन मस्क यांनी उचलली मोठी पावलं
जेव्हा पासून एलन मस्क यांनी ट्विटरचे संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात घेतले आहे तेव्हा पासून कार्यबळ कमी करण्यासाठी त्यांनी काही मोठी पावलं उचलली आहेत. सोशल नेटवर्क कंपनीने नुकत्याच अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कोणत्याही नोटीसशिवाय बाहेर काढले. ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी गेल्या आठवड्यात यासाठी माफी सुद्धा मागितली आणि म्हटले की, यासाठी ते जबाबदार आहेत.
CEO सह प्रमुख अधिकऱ्यांना सुद्धा काढले बाहेर
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मस्क यांनी ट्विटरची सुत्र आपल्या हाती घेतल्यानंतर सर्वात प्रथम ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. अग्रवाल यांच्यानंतर मुख्य आर्थिक अधिकारी नेड सहगल यांच्यासह कायद्याचे रणनितीकार, ट्र्स्ट आणि सुरक्षाचे प्रमुख विजय गड्डे यांना सुद्धा काढले. मस्क यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांना सुद्धा बाहेरचा मार्ग दाखवला.(Twitter Fired Contract Employees)
हे देखील वाचा- Twitter, Meta मधून हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांना भारतातील हे CEO देणार नोकरी
दिवाळखोर होणार का ट्विटर?
मीडिया रिपोर्ट्सनसार एलन मस्क यांनी एका संभाव्य दिवाळखोरपणापासून कंपनीचा बचावण्यासाठी असे पाऊल उचलले आहे. त्यांनी आधीच स्पष्ट केले की, वर्कफोर्सच्या कारणास्तव कंपनीला दररोज ४ मिलियन अमेरिकन डॉलरचे नुकसान होत आहे. त्यांच्याकडे लोक कमी करण्याऐवजी दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. या व्यतिरिक्त मेटाने सुद्धा आफल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. अशा पद्धतीने जगातील काही दिग्गज कंपन्यांमध्ये सुद्धा सध्या कर्मचाऱ्यांची कपात करणे सुरु आहे.