मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर जेव्हापासून एलन मस्क यांच्या हाती गेले आहे तेव्हापासून काही ना काही कारणास्तव ते चर्चेत राहिले आहेत. कारण एलन समस्क यांनी या संदर्भात काही बदल केले आहेत. अशातच आता त्यांनी युजर्सला एक मोठे अपडेट दिले आहे. त्यानुसार ब्लू सब्सक्राइबर्स २ तासांचा व्हिडिओ त्यांच्या अकाउंटवरुन शेअर करु शकतात. मस्क यांनी याची माहिती ट्विट करत दिली. (Twitter Blue Users)
त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले होते की, ट्विटर ब्लू सब्सक्राइबर्सला २ तासांची ८ जीबी पर्यंतची व्हिडिओ क्लिप अपलोड करता येणार आहे. एकूणच जर तुम्ही ब्लू सब्सक्राइबर्स असाल तरच हे फिचर तु्म्हाला वापरता येणार आहे.
एलन मस्क यांनी गेल्या वर्षात ऑक्टोंबर मध्ये ट्विटर खरेदी केले. ही डील ४४ अरब डॉलरमध्ये झाली होती. त्यानंतर मस्क यांनी काही बदल केले. त्यानुसार त्यांनी ३ प्रकारचे टिक मार्क तयार केले. ज्यामध्ये ब्लू टिक सुद्धा आहे. भारतात ब्लू सब्सक्रिप्शनसाठी प्रत्येक महिन्याला ६५ रुपयांचे पेमेंट करावे लागेल. मोबाईल युजर्ससाठी यासाठी प्रत्येक महिन्याला ९०० रुपयांचे सब्सक्रिप्शन ठेवण्यात आले आहे. ब्लू टिक व्यतिरिक्त शासकीय अकाउंटसाठी ग्रे टिक आणि कंपन्यांसाठी गोल्डन टिक दिले गेले आहेत.
यापूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरचे नव्या सीईओची घोषणा केली होती. लिंडा याकारिनो यांना ट्विटरचे नवे सीईओ पद दिले गेले आहे. सध्या तरी तेच ट्विटरचे सीईओ आहेत. त्याचसोबत टेस्ला आणि स्पेसएक्सचे सुद्धा सीईओ आहेत.
जेव्हा लिंडा याकारिनो यांना सीईओ पदासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी असे म्हटले की, प्लॅटफॉर्मच्या बिझनेस ऑपरेशन्सवर फोकस करणार आहोत. तर मस्क हे प्रोडक्ट डिझाइन आणि न्यू टेक्नॉलॉजी संदर्भात काम सांभाळणार आहेत. लिंडा याकारिनो यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार त्या २०११ पासून NBC युनिवर्सल कंपनी सोबत काम करत आहेत. (Twitter Blue Users)
हेही वाचा- Meta इंडियाचे हेड ऑफ पार्टनरशीप मनीष चोपडा यांचा राजीनामा
ट्विटरवरचे प्रेम हे अमेरिकेत मात्र कमी झाले आहे. प्यु रिसर्च सेंटरच्या ताज्या रिपोर्टनुसार गेल्या एका वर्षात अमेरिकेतील ट्विटर युजर्सची संख्या जवळजवळ ६० टक्के कमी झाली आहे. म्हणजेच अर्ध्यापेक्षा अधिक अमेरिकेन नागरिकांनी ट्विटर वापरणे बंद केले आहे. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील युजर्सने ट्विटर अकाउंट डिलिट केलेले नाही. पण ते वापरणे त्यांनी बंद केले आहे.