ट्विटरने रेवेन्यू शेअरिंग प्रोग्राम सुरु केला आहे. या अंतर्गत आता हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता कॉन्टेट क्रिएटर्सला त्यांच्या पोस्ट आणि त्यावर आलेल्या रिप्लाय मध्ये दिसण्याऱ्या जाहिरांतींमधून होणाऱ्या कमाईचा काही अंशी हिस्सा देणार आहे. ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी असे म्हटले होते की, पहिल्या राउंडच्या पेआउटमध्ये ५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ ४१ कोटी रुपये जारी केले जाणार आहेत. (Twitter Ad Revenue Sharing)
ट्विटरच्या अधिकृत अकाउंटवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की,Surprise! Today we launched our Creator Ads Revenue Sharing program. तसेच आता क्रिएटर्सा जाहिरातींमधून होणाऱ्या कमाईतील काही हिस्सा दिला जाणार आहे. आमचे हे पाउल अधिक लोकांना पैसे कमावण्यास मदत करणार आहे. येणाऱ्या काळात या प्रोग्रामला अधिक वाढवले जाईल. जेणेकरुन सर्व एलिजिबल क्रिएटर्स यासाठी अर्ज करु शकतील.
या ट्विटला एलन मस्क यांनी रिट्विट केले आहे. ट्विटरवर काही युजर्सने त्यांना पैसे मिळाल्याची सुद्धा माहिती शेअर केली आहे. त्यामध्ये फ्लोरिडातील टेक व्यवसायिक ब्रायन क्रैसेस्टीनचा सुद्धा समावेश आहे. त्याने ट्विट करत म्हटले की, ट्विटरने मला आताच २५ हजार डॉलरची रक्कम पेमेंट केली आहे.
अॅड रेवेन्यू शेअरिंग नक्की काय आहे?
ट्विटरवर तुम्ही काही पोस्ट पाहिल्या असतील किंवा त्यांच्या रिप्लायसह जाहिरात पाहिल्या असतील. याच जाहिरातींमधून ट्विटरची कमाई होते. आता ट्विटर अशा युजर्सच्या कमाईला विभागणार आहे. त्यामध्ये ज्याच्या पोस्टवर अधिक लोक इंटरॅक्ट करतील त्याला पैसे दिले जातील.
अॅड रेवेन्यू शेअर कोणाला मिळणार?
-या प्रोग्रामचा हिस्सा बनण्यासाठी तुमच्याकडे ट्विटरवर ब्लू चे सब्सक्रिप्शन असावे. त्याचसोबत तुमची संस्था वेरिफाइड असणे गरजेचे आहे.
-सातत्याने तीन महिन्यापर्यंत तुमच्या अकाउंटवर ५ मिलियन इंम्प्रेशन म्हणचेज व्यू, लाइक्स, रिट्विट, कोट ट्विट आणि रिप्लाय यांची संख्या एकूण ५ मिलियन असावी (Twitter Ad Revenue Sharing)
-क्रिएटर मोनेटाइजेशन स्टँन्डर्डसाठी ह्यूमन रिव्यू पास करावा लागतो
म्हणजेच ट्विटरवर ब्लू टीकसाठी पैसे खर्च करायचेच आहेत. त्याचसोबत फोलोअर्स असणे ही आवश्यक आहे. ज्या युजर्सचे १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत त्यांना ट्विटरवर ब्लू टीकसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याचसोबत ५० लाख इंम्प्रेशन असेच येतील.
दरम्यान, हा प्रोग्राम त्याच देशांसाठी आहे जेथे स्ट्राइप पेमेंटला सपोर्ट केले जाते. हा एक पेमेंट प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म आहे. भारतात ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र ही पेमेंट सिस्टिम भारतीय करेंसीवर काम करत नाही. याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त डॉक्युमेंटेशन करावे लागणार आहे. कारण यामध्ये केलेले ट्रांजेक्शन भारतात एक्सपोर्टच्या श्रेणीत येतात. ट्विटरच्या अप्रुवलनंतर तुम्हाला स्ट्राइप अकाउंट ट्विटरवरुन लिंक करावे लागेल.
हेही वाचा- Threads आणि Twitter मधील नेमका फरक काय?
जर तुम्हाला ट्विटरवरुन पैसे कमवायचे असतील तर कॉन्टेट पोस्ट करताना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. जर तुमचा कॉन्टेंट बेकायदेशीर असेल किंवा नुकसान पोहचवणारा असेल किंवा अन्य काही गोष्टी त्यात असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. अशाच प्रकारे ग्राफिक्स, हिंसाचारासंबंधित आणि संवेदनशील कॉन्टेंटसाठी सुद्धा पैसे दिले जाणार नाहीत.