ग्रीन टी अलिकडील काही वर्षात या ग्रीन टी (Green Coffee) चे प्रस्थ खूप वाढले आहे. बारीक होण्यासाठी, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांचा हवाला देत या ग्रीन टी (Green Coffee)चे चाहते सर्वदूर झाले आहेत. मात्र आता या ग्रीन टी ला टक्कर देण्यासाठी ग्रीन कॉफीही बाजारात उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे ग्रीन टी सेवन करण्याचे जसे फायदे आहेत, तसेच फायदे या ग्रीन कॉफीचे सुद्धा आहेत. यासाठी सुरुवातीला ग्रीन कॉफी (Green Coffee) म्हणजे काय हे जाणून घेऊया. आपण जी कॉफी घेतो त्यासाठी कॉफीच्या बीया या ठराविक तापमानात भाजल्या जातात. या बीया भाजल्यावर त्या बारीक केल्या जातात आणि त्याची पावडर आपण कॉफी म्हणून वापरतो. या कॉफीचा रंग डार्क चॉकलेटी असतो. मात्र ग्रीन कॉफीसाठी या कॉफीच्या बीया भाजल्या जात नाहीत. त्याची तशीच पावडर केली जाते आणि ही पावडर गरम पाण्यात टाकून प्यायला दिली जाते. अर्थातच ग्रीन टी घेताना जसा मध, तुळस, पुदीना, आलं यांचा पुरक चव म्हणून वापर केला जातो, तसाच प्रकार या ग्रीन कॉफीमध्येही केला जातो. ही ग्रीन कॉफी अनेक रोगांवर गुणकारी असल्याचे सांगण्यात येते. मुख्य म्हणजे ग्रीन कॉफीचे (Green Coffee) सेवन केल्यास शरीरातील फॅक्टस कमी होतात, अशीही माहिती आहे.
ग्रीन कॉफीचे शरीरास अनेक फायदे आहेत. ग्रीन कॉफीमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे शरीरातील अनेक समस्यांपासून आराम मिळतो. त्याच्या या फायद्यामुळे ग्रीन टी (Green Coffee) बरोबर ग्रीन कॉफी सेवन करणा-यांचेही प्रमाण खूप वाढले आहे.
ज्याप्रमाणे फिट ठेवण्यासाठी ग्रीन टीचे सेवन केले जाते, त्याप्रमाणेच ही ग्रीन कॉफीही फायदेशीर ठरत आहेत. या ग्रीन कॉफीची लोकप्रियताही वाढत आहे. शरीरात वाढलेली चरबी वा फॅट्स कमी करण्यासाठी ग्रीन कॉफीचा उपयोग होतो. यामध्ये असे पोषक तत्व आहेत, की ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होईल. जर नियमीत ग्रीन कॉफीचे सेवन केले तर वजनावर नियंत्रण राहिल्याचे दिसून येते. काही संशोधकांनी ग्रीन कॉफी ही रक्तदाब रोखण्यासाठीही फायदेशीर असल्याचे मत नोंदवले आहे. शरीराचा रक्तदाब नियंत्रणात रहाण्यासाठी ग्रीन कॉफीचे सेवन मदत करते. कडक उन्हाळ्यात जेव्हा भूक मंदावते त्याचवेळी पोटाच्या समस्या उदभवतात. अपचन वाटू लागते. तोंडाची चव जाते. अशावेळी ग्रीन कॉफी चांगली पडते. ग्रीन कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असल्यामुळे, ते शरीरातील बाल्सॅमिक मेटाबॉलिक रेट सुधारण्यास मदत करते. त्यामुळे अन्नाचे पचन होते आणि भूकही लागते. अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे ग्रीन कॉफी त्वचेसाठी उत्तम ठरते. अनेकांना चेह-यावर पुरळ येते आणि काळे डाग पडतात. यापासून मुक्ती हवी असेल तर रोज ग्रीन कॉफीचा आहारात समावेश करावा. यामुळे त्वचा नितळ होते, तिला चकाकी येते. शिवाय चेह-यावरील सुरकुत्याही कमी झाल्याचे आढळते.
ग्रीन कॉफीचे (Green Coffee) सेवन केल्यावर ताजेतवाने वाटते. मन प्रसन्न होते. या कॉफीमध्ये कॉफीच्या बियांव्यतिरिक्त अन्य काहीही नसल्यामुळे त्यातून रक्तातील शुगर वाढण्याचा धोकाही कमी असतो. कॉफीच्या बिया भाजण्यासाठी त्यावर काही प्रक्रीया केली जाते. मात्र ग्रीन कॉफीमध्ये अशी कुठलीही प्रक्रीया केलेली नसते. थेट कॉफीच्या बिया बारीक करुन त्या वापरल्या जातात. त्यामुळे त्याचा फायदा अधिक होतो.
=======
हे देखील वाचा : हिट-स्ट्रोक ठरु शकतो जीवघेणा, बचाव करण्यासाठी कामी येतील ‘हे’ उपाय
=======
ग्रीन कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ऍसिडचा मुबलक पुरवठा आहे. त्याचे मानवी शरीराल अनेक फायदे होतात. 2012 मध्ये, अमेरिकन सेलिब्रिटी फिजिशियन आणि टॉक-शोचे होस्ट डॉ. ओझ यांनी ग्रीन कॉफी हे चमत्कारीक पेय असल्याचे सांगितले आहे. या कॉफीमुळे वजन कमी होते. शरीरात असलेल्या अनेक जुन्या आजारांनाही ही कॉफी रोखू शकते, मात्र यावर अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रीन कॉफीचे (Green Coffee) सेवन केल्यास उच्च रक्तदाब, रक्तातील साखर यावर नियंत्रण राहू शकते. मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका ज्यांना आहे, त्यांनी या कॉफीचे सेवन करावे, असे सांगण्यात येते. याशिवाय या कॉफीच्या सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारल्याची माहिती अमेरिकन संशोधकांनी दिली आहे. या सर्व गुणधर्मामुळे ग्रीन टी पाठोपाठ ही ग्रीन कॉफीही तेवढीच लोकप्रिय होत आहे.
सई बने