ट्रम्प इज डेड, या नावानं सोशल मिडियावर ट्रेंड चालू असून त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मृतावस्थेत दाखवण्यात आले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांच्या पदाची जबाबदारी घेण्यास आपण सक्षम असल्याचे उत्तर दिल्यावर लगेच ट्रम्प इज डेड हा ट्रेंड चालू झाला. अर्थात या मुलाखतीमध्ये व्हान्स यांनी ट्रम्प पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची ग्वाही दिली. पण याकडे दुर्लक्ष करत सोशल मिडियावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दलची चर्चा पुन्हा सुरु झाली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून चर्चेत आहेत. राष्ट्रपती झाल्यापासून त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले ते वादात आहेत. आता अमेरिकेतील न्यायालयानंही त्यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका करत हे निर्णय चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. (Donald Trump)
या सर्वात डोनाल्ड ट्रम्प हे आजारी असल्याची एक बातमी आली, आणि त्यात जेडी व्हान्स यांच्या वक्तव्याची भर पडली. त्यामुळे सोशल मिडियावर ट्रम्प इज डेड हा ट्रेंड इतका व्हायरल झाला की, अमेरिकेच्या प्रशासनानं एक खुलासा करत अध्यक्ष ट्रम्प यांची तब्बेत उत्तम असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील नागरिक प्रचंड कंटाळले आहेत, की काय अशी शंका निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेतील सोशल मिडियावर सध्या ट्रम्प इज डेड नावाचा ट्रेंड सर्वाधिक व्हायरल होत आहे. याला कारण झाले आहेत, ते अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स. (Social News)
व्हान्स यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, जर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली तर ते राष्ट्रपतीची भूमिका बजावण्यास तयार आहेत. व्हान्स यांच्या या वक्तव्यानंतर ट्रम्प यांची तब्बेत ठिक नसल्याची माहिती पुढे आली आणि ट्रम्प इज डेड हा ट्रेंड सुरु झाला. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या आरोग्याविषयक अनेक बातम्या पुढे येत आहेत. या वर्षी जुलै महिन्यात व्हाईट हाऊसने डोनाल्ड ट्रम्प क्रॉनिक व्हेनस इनसफीशियन्सी असल्याची पुष्टी केली. पायांच्या शिरांना होणारा हा आजार असून यात पायांना सूज येते. ट्रम्प यांचे वय ऐंशीच्या घरात आहे. या वयात असे आजार सर्वसामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तरी ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत चर्चा कमी झाली नाही. अर्थात ट्रम्प यांच्या बाबतीत 2023 मध्येही असाच ट्रेंड व्हायरल झाला होता. 2023 मध्ये डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, म्हणजेच ट्रम्प यांच्या मोठ्या मुलाचे सोशल अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यात हॅकरने एक बनावट पोस्ट शेअर करुन असा दावा केला की, ट्रम्प यांच्या निधनामुळे ज्युनियर ट्रम्प अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शपथ घेत आहेत. (Donald Trump)
त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मिडियावर पोस्ट करत आपण जिवंत असल्याचे सांगितले होते. आत्ताही अशीच वेळ आली आहे. यावेळी ट्रम्प प्रशासनातील अधिका-यांनी पुढे येत, डोनाल्ड ट्रम्प यांची तब्बेत उत्तम असल्याचे आहे. असे असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्बेतीवरुन सुरु झालेला ट्रेंड काही कमी झालेला नाही. डोनाल्ड ट्रम्प गेल्या 24 तासांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. त्यामुळे ट्रम्प इज डेड या ट्रेंड नंतर ‘डोनाल्ड ट्रम्प कुठे आहेत?’ ‘तो जिवंत आहे का?’ असे प्रश्न उपस्थित करुन सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस सुरु झाला आहे. ट्रम्प यांच्या हातावर असलेल्या काळ्या डागांचे फोटो काही दिवसापूर्वी व्हायरल झाले होते. हेच फोटो पुन्हा शेअर करण्यात येत आहेत. (Social News)
=======
Donald Trump : RIC ची ताकद ट्रम्पना रोखणार !
=======
एका वापरकर्त्याने तर ट्रम्पच्या मृत्यूची प्रार्थना करत असल्याचा मेसेज या फोटोखाली शेअर केला आहे. तर आणखी एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, मला लवकर झोपायचे आहे जेणेकरून मी ट्रम्पच्या मृत्यूची बातमी ऐकून जागे होऊ शकेन. या दोघांच्याही पुढे जात एका वापरकर्त्यांने, जर ट्रम्प यांचे निधन झाले तर मी हे ट्विट लाईक करणाऱ्या व्यक्तीला 1000 डॉलर्स देईन, असे जाहीर केले आहे. ट्रम्प यांच्यावरील हा मिम्सचा पाऊस एवढा वाढला आहे की, त्यांच्याच देशात त्यांना किती विरोध होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प प्रशासनातील अधिका-यांनी पुढे येत ट्रम्प यांची तब्बेत ठिक असल्याचे सांगितल्यावरही ट्रम्प इज डेड या ट्रेंडला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेमध्ये कमलीची घट झाल्याचेही स्पष्ट होत आहे. (Donald Trump)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics