Travel Tips : भारतातील बहुतांशजणांना दुबईत जाण्याची इच्छा असते. तेथे जाऊन फिरण्याचा आनंद घ्यायचा असतो. पण काहीजण अशी देखील आहेत जे एखाद्या कारणास्तव दुबईत राहून नोकरी करत आहेत. दुबईतच जगातील सर्वाधिक उंच इमारत बुर्ज खलीफा आहे. पण दुबईतील असे काही नियम आहेत जे मोडल्यास तुम्हाला मोठी शिक्षा देखील होऊ शकते.
खरंतर, भारतात सर्व प्रकारचे कपडे परिधान करण्यास परवानगीआहे. पण दुबईत कपडे परिधान करण्यासंदर्भातील नियम फार वेगळे आहेत. तेथे खासकरून महिलांना कपडे परिधान करण्यासाठीचे काही नियम लागू केले आहेत त्याचे कठोरपणे पालन करावे लागते.
दुबईत कपड्यांसंदर्भातील नियम
सौदी देशांमध्ये महिलांना कपडे परिधान करण्यासंदर्भातील काही नियम आहेत. दुबईत इस्लामिक धर्माचे पालन केले जात असल्याने त्यानुसारच कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. त्या देशातील महिला आपले अंगप्रदर्शन होईल असे कपडे परिधान करू शकत नाहीत. महिलांचे संपूर्ण शरिर झाकलेले असावे असेच कपडे परिधान करण्याचा त्यांना सल्ला दिला जातो. एखाद्या महिलेला स्कर्ट अथवा शॉर्ट्स परिधान करायचा असल्यास तो गुडघ्यांखाली असावा असे सांगितले जाते. हा नियम सर्व महिलांना लागू केला जातो. (Travel Tips)
क्रॉप टॉप परिधान करण्यासही बंदी
दुबईत क्रॉप टॉप परिधान करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. येथील महिलांनी कपडे परिधान करण्यासंदर्भातील नियमांचे पालन न केल्यास त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. खरंतर टुरिस्टसाठी हे नियम लागू होत नाही. पण तेथे गेल्यानंतर कोणीही कपड्यांवरून अडवणूक करू शकतो.