Travel : फिरण्याची आवड कोणाला नसते. महिन्यातून एकदातरी बहुतांशजण फिरायला जातात. पण फिरायला जाताना बजेटसह राहण्यापिण्याची व्यवस्था कशी असेल याकडेही लक्ष द्यावे लागते. अशातच तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर भारतातील काही ठिकाणी तुम्हाला फुकटात फिरण्यासह खातापिता येईल. याबद्दल जाणून घेऊया…
मणिकर्ण साहिब
हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक फेव्हरेट ठिकाण म्हणजे मणिकर्ण साहिब आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात. याशिवाय परदेशातील पर्यटकही येतात. मणिकर्ण साहिब ठिकाण आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओखळली जाते. जर तुम्ही हिमाचल प्रदेशात फिरायला जात असल्यास गुरुद्वारा मणिकर्ण साहिब येथे नक्की भेट देऊ शकता. येथे तुम्हाला खाण्यापिण्यासह राहण्याची उत्तम व्यवस्था होईल. या ठिकाणी पैसे देखील द्यावे लागत नाही.
भारत हेरिटेज सर्विसेज
भारत हेरिटेज सर्विसेज ऋषिकेशमधील सर्वाधिक सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथील वातावरण अतिशय शांत असून तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. खास गोष्ट अशी की, भारत हेरिटेज सर्विसेजमध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था मोफत आहे. दरम्यान, तुम्हाला काही वॉलिंटिएरच्या रुपात काम करावे लागते. याशिवाय ऋषिकेशमधील काी मंदिरांमध्ये दर्शनही करता येईल. (Travel)
परमार्थ निकेतन
परमार्थ निकेतन देखील ऋषिकेशमधील सुंदर आश्रमांपैकी एक आहे. येथे गंगा आरती होते. जर तुम्ही एखाद्या धार्मिक कामासाठी येत असाल तर फुकटात राहण्याची व्यवस्था होते. येथे तुम्हाला खाण्यापिण्याचे पैसे द्यावे लागत नाही. याशिवाय तमिळनाडूतील रामानाश्रामम येथे जाऊ शकता. येथेही राहण्यासह खाण्यापिण्याची सुविधा मोफत आहे.
