Home » Healh : जिभेच्या रंगांवरून समजतो शरीरातील आजार

Healh : जिभेच्या रंगांवरून समजतो शरीरातील आजार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

आपल्याला कोणी भेटले की, आपला चेहरा पाहून लगेच विचारतात, अरे बरे नाही का?, थकली का?, आज एकदम फ्रेश आहे चेहरा? याचाच अर्थ आपला चेहरा बोलतो. अनेकदा डोळे बघून देखील समोरच्या व्यक्तीला आपल्यामधील बदल जाणवतात. एकूणच काय तर आपल्या शरीरातील काही अवयव हे आपले शरीर कसे आहे? रोगी निरोगी याचे संकेत देतात. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आपल्याला चेक करताना आपली जीभ दाखवण्यास देखील सांगतात. (Marathi News)

जीभ पाहून आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल डॉक्टरांना पूर्ण आपला त्रास लक्षात येत नसला तरी त्यांना एक अंदाज तर नक्की येतो की, आपल्याला कोणता त्रास होत असावा. याचे कारण म्हणजे आपली जीभ आणि तिचा रंग आपल्या आरोग्याबद्दल भाष्य करते. सामान्यपणे फिकट किंवा गडद गुलाबी रंगाची जीभ ही निरोगी मानली जाते. मात्र जर तुमच्या जिभेचा रंग वेगळा असेल तर तुम्हाला नक्की कोणता त्रास होत असावा हे समजते. तुम्ही देखील आरशामध्ये पाहून तुमची जीभ आणि तिचा रंग तपासू शकता. मग नक्की जिभेचा कोणता रंग असल्यावर काय त्रास असू शकते हे पाहूया. (Marathi Latest News)

पांढऱ्या कोटिंगची जीभ
जीभेवर पांढऱ्या रंगाचा थर किंवा पांढरट रंग दिसत असेल तर तुमच्या शरीरात पाणी कमी असल्याचा हा एक संकेत आहे. शरीर डिहायड्रेट झाल्यावर हा रंग जिभेवर दिसतो. यावर उपाय म्हणून थंड पदार्थांचे सेवन करणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे आवश्यक असते. शिवाय पांढरी जीभ म्हणजे तुमच्या शरीरात कफ असल्याचे देखील लक्षण आहे. (Todays Marathi News)

Health

पिवळी जीभ
तुमची जीभ फिकट पिवळी असेल तर याचा अर्थ तुम्हाला पचन किंवा पोटाशी संबंधित काही समस्या आहेत. पिवळी जीभ मधुमेह आणि कावीळचे लक्षण देखील असू शकते. तसंच काही प्रकरणांमध्ये हे यकृत किंवा पित्ताशयाच्या समस्या दर्शवते. जीभ पिवळी पडणे हे जीवाणूंमुळे होते. जर तोंडाचे आरोग्य नीट राखले गेले नाही तसेच तोंड कोरडे पडले तर जिभेवर बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे पिवळी जीभ हे मधुमेहाचे लक्षणदेखील असू शकते. याव्यतिरिक्त शरीरात रक्ताची कमतरता, लोहतत्त्वाचा अभाव, किंवा व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचेही हे संकेत असतात. यामुळे थकवा, कमजोरी, आणि अन्य पोषण समस्यांचे निदान होते. या अवस्थेत लोहतत्त्वयुक्त आहार घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (Latest Marathi Headline)

लालसर किंवा गडद लाल जीभ
जीभेचा रंग गडद लाल किंवा जळजळीत लाल असल्यास शरीरातील उष्णतेची पातळी वाढल्याचे संकेत असतात. यामुळे शरीरात दाहक प्रक्रिया सुरू झाली असण्याची शक्यता असते. ताप, संक्रमण किंवा डिहायड्रेशनमुळे जीभेचा रंग लालसर होतो. शिवाय शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि फॉलिक अॅसिडची कमतरता असल्यावर जीभेचा रंग असा होतो. आहारात लगेचच व्हिटॅमिन बी१२ चे पदार्थ समाविष्ट करा. (Top Marathi News)

तपकीरी किंवा काळी जीभ
जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त चहा, कॉफी आणि सिगारेट पीत असाल तर तुमच्या जीभेचा रंग दिवसेंदिवस काळा किंवा तपकिरी होत जातो. असा रंग दिसला की जे व्यसन असेल ते लगेच कमी करा.

=======

Health : एक महिना गहू बंद केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ फरक

=======

निळसर किंवा जांभळी जीभ
जीभेचा रंग निळसर किंवा जांभळट दिसल्यास हृदय व श्वसन समस्यांची शक्यता असते. अशावेळी ओळखून जावे की शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे. याचा अर्थ रक्ताभिसरणात अडथळा येत आहे किंवा शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. ही स्थिती गंभीर असू शकते आणि त्वरित वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते. (Trending News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.