Home » आलं खाण्याचे जितके फायदे तितकेच तोटे! पाच नंबरचा तोटा गर्भवती महिलांना ठरू शकतो सर्वात घातक

आलं खाण्याचे जितके फायदे तितकेच तोटे! पाच नंबरचा तोटा गर्भवती महिलांना ठरू शकतो सर्वात घातक

by Correspondent
0 comment
Ginger | K Facts
Share

पावसाची सर चालू झाली की आठवण होते ती गरमा-गरम भजी आणि आलं घातलेल्या कडक अशा चहाची. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक गोष्टींमध्ये आल्यासारखा कडकपणा असावा असे प्रत्येकाला वाटत असते.

एकंदरीत काय तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या दोन ऋतूंमध्ये आल्याचा (Ginger) वापर खुप जास्त प्रमाणामध्ये केला जातो. कारण ते आले आपल्या स्वयंपाक घरात मिळणाऱ्या मसाल्याच्या पदार्थापैकीच अशी गोष्ट झालेली आहे.

पण एखाद्या गोष्टीचे अतिरिक्त सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे आपल्याला माहीतच आहे. तसंच आल्याचे सुद्धा जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीराला हानी पोचू शकते.

आल्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे बी ३ आणि बी ६, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक असतात या व्यतिरिक्त, आले औषधी गुणधर्मांमुळे देखील मानवासाठी एक वरदान आहे. आले आपल्या शरीराला जेवढे पौष्टिक आहे तितकेच त्याचे अतिरिक्त सेवन हे घातक आहे.

त्यामुळे आजच्या लेखात आपण आले खाण्याचे दुष्परिणाम पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात आले खाल्ल्याने आपल्या शरीराला होणाऱ्या हानी आणि तोटे.

Ginger

१) जास्त प्रमाणात आले खाल्यास तोंड येणे, ओठांना छाले पडणे, सूज येणे आणि शरीराला खाज सुटणे अशा अँलर्जी सारख्या समस्या उद्भवू शकतात.

२) मेरीलॅंड यूनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटर वेबसाइटनुसार, आले हे उष्णतेचे स्रोत आहे. त्याच्या अधिक सेवनाने पोटासंबधित विकार, ऍसिडीटी, छातीत जळजळ होणे, पोटदुखी या समस्या होऊ शकतात असे सांगण्यात आले आहे.

३) आलं हळूहळू ब्लड शुगरला कमी करते. याने रक्तात शुगरची कमतरता होण्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात, तर आल्याचं सेवन कमी प्रमाणात करा.

४) आल्याचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यास डोकेदुखी, मायग्रेन, निद्रानाश अशी समस्या उद्भवू शकते. तसेच, पोट साफ व्हावे म्हणून जास्त प्रमाणात आले खाल्ले तर लगेचच जुलाब होण्याची शक्यता असते.

५) गर्भवती महिलांना आल्यापासून योग्य अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण आल्याचं जास्त सेवन केल्यास गर्भपाताचा धोकाही वाढतो.

६) रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आल्याचा वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आल्यामुळे रक्त पातळ होते. जलदगतीने रक्त पातळ होणे हे धोक्याचे आहे. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आल्याचा वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

७) आल्याचं अधिक सेवन केल्यास हृदयाला योग्यप्रकारे काम करण्यास अडचण निर्माण होते. सोबतच तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास ही जाणवू शकतो.

Ginger Tea
Ginger Tea

८) जास्त आल्याचा चहा पिण्यामुळे छातीत आणि पोटात जळजळ होते. त्यामुळे आपल्याला पित्त होण्याची शक्यता जास्त असते.

९) मॅरीलॅंड यूनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटरनुसार, आल्याचं जास्त सेवन केल्याने गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

१०) एका दिवसात ५ ते ६ ग्रॅम आले आपल्यासाठी पुरेसे आहे. जर आपण यापेक्षा जास्त आल्याचे सेवन केले तर ते आपल्यास इजा करण्यास सुरवात करते.

तर हे होते जास्त प्रमाणात आले खाण्याचे तोटे. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा नक्की आल्याचे सेवन कसे करायचे ते.

– निवास उद्धव गायकवाड

======

टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.