Home » पवार साहेबांची मुलगी ते खासदार होण्यापर्यंतचा सुप्रिया सुळेंचा प्रवास

पवार साहेबांची मुलगी ते खासदार होण्यापर्यंतचा सुप्रिया सुळेंचा प्रवास

by Correspondent
0 comment
Supriya Sule | K Facts
Share

राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा ५१वा वाढदिवस. नेहमीच युवतींना राजकारणात येण्यास प्रोत्साहन देणाऱ्या, तरुण वर्गात लोकप्रिय असणाऱ्या, अभ्यासू खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय.

सुप्रिया सुळे यांचा जन्म शरद पवार (Sharad Pawar) व प्रतिभा पवार यांच्या पोटी दि. ३० जून १९६९ रोजी पुणे येथे झाला. पवार दाम्पत्याला सुप्रियाताई हे एकमेव आपत्य. का बरे सुप्रियताईंना सख्खे भाऊ बहीण नाहीत?

तर झाले असे की, सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी  क्रिकेटपटू यांच्या कन्या असणाऱ्या प्रतिभा शिंदे यांचा विवाह शरद पावरांसोबत दि. १ ऑगस्ट १९६७ साली बारामतीमध्ये झाला.

Supriya Sule Age, Caste, Husband, Children, Family, Biography & More »  StarsUnfolded

त्याकाळी समाज एवढा पुढारलेला नसतानाही शरद पवारांनी प्रतिभा पवार यांच्या समोर एक अट ठेवली. ती अट म्हणजे लग्नानंतर आपल्याला फक्त एकच आपत्य होईल. ते आपत्य मुलगा असो किंवा मुलगी असो आपल्याला ते मान्य करावे लागेल. असे शरद पवारांनी प्रतिभा पवारांना सांगितले. आणि त्यांनी पण ते मान्य केले!

सुप्रिया सुळेंचे बालपणासह संपूर्ण आयुष्य हे अगदी स्वतःच्या मर्जीने जगण्यात गेले. म्हणजेच त्यांना कोणत्याही गोष्टीची बंधने नसून आयुष्यातील निर्णय स्वतः घ्यायची मुभा होती. पवार घराण्याच्या रूपाने सुप्रिया सुळेंना जणू एक मुक्त विद्यापीठच मिळालेले होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सुप्रिया सुळेंचे शालेय शिक्षण पुण्यातील नाना चौकातील सेंट कोलंबस हायस्कूलमध्ये झाले. यावेळी शरद पवार जरी राज्याच्या राजकारणातील मोठे नेते असले, तरी देखील ते सुप्रियताईंच्या शाळेत कोणत्याही कार्यक्रमाला एक पालक म्हणूनच उपस्थित रहायचे. इतर पालकांप्रमाणे तेही रांगेत उभे राहायचे.

Supriya Sule Family

पुढे बारावीनंतर सुप्रिया सुळेंनी मायक्रोबायोलॉजी विषयात मुंबईच्या जयहिंद कॉलेजमधून बीएससी केले. त्यावेळीही शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. पण असे असतानाही सुप्रिया सुळे सर्वसामान्‍य मुलींप्रमाणे कॉलेजला बस ने प्रवास करायच्या. विशेष म्हणजे सुप्रियाताई एवढ्या मोठ्या नेत्यांची मुलगी असूनही, त्यांना घरून फक्त दहा रुपयांचा पॉकिट मनी दिला जायचा.

हे देखील वाचा: कोण आहे सुप्रिया ताईंच्या आवडता हिरो?

कॉलेज लाईफ मध्येच सुप्रियाताईंची ओळख सदानंद सुळेंशी एका कौटुंबिक कार्यक्रमात झाली. या ओळखी नंतर सुप्रियाताईंनी आणि सदानंद सुळेंनी एकमेकांना समजून घ्यायला सहा महिन्यांचा वेळ दिला.

नंतर पुढे तत्‍कालीन पंतप्रधान चंद्रशेखर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर सुप्रिया सुळे आपल्या नवऱ्यासोबत परदेशात गेल्या. त्यावेळी त्यांनी या संधीचा लाभ उचलत वॉटर पोल्युशन या विषयात कॅलिफोर्नियामध्ये बर्कले विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली. त्यानंतर त्या इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्या. आणि मग भारतात परतल्या. सुप्रिया सुळेंना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन आपत्य आहेत.

Winter Session Of Parliament: Latest News on Winter Session Of Parliament,  Winter Session Of Parliament Photos | Outlookindia

सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द पाहिली तर आपल्याला समजते की, सुप्रिया सुळे २००६ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. आणि त्यानंतर त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये ३.३६ लाख मतांनी विजयी झाल्या होत्या.

एवढेच काय तर त्यांच्या कार्यामुळे आणि खंबीर नेतृत्वामुळे त्या २०१४ आणि २०१९ मध्येही बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून आल्या. १६व्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांत संसदेत ११७६ प्रश्न विचारले होते.

२०११ मध्ये त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरूद्ध राज्यव्यापी मोहीम राबविली होती. १० जून २०१२ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १२ व्या वर्धापन दिवसानिमित्त तरुणींना राजकारणात येण्याची आवड निर्माण होण्यासाठी मुंबईत “राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस” नावाच व्यासपीठ सुरू करून तरुणींना राजकारणात येण्याचे आव्हाहन सुप्रिया सुळेंनी केले होते.

अशा या धाडसी आणि कार्यकुशल सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिलांची बाजू सरकारसमोर मंडण्याचा आणि समाजातील अनेक प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

Supriya Sule

सुप्रियताईंनी कधीही व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणातील ‘पवार’ या नावाचा वापर करून उपयोग किंवा गैरफायदा करून घेतला नाही. तर याउलट त्यांनी जी काही राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवली ती स्वतःच्या हिमतीवर मिळवली.

या संपूर्ण प्रवासात सुप्रिया सुळेंच्या मागे जसे प्रतिभा पवार आणि शरद पवार खंबीरपणे उभे होते तसेच त्यांच्या पाठीमागे आजून एक अदृश्य चेहरा अर्थात त्यांचे पती सदानंद सुळेंही खंबीरपणे उभे होते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील स्त्रीशक्तीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त टीम क-फॅक्टस तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

– निवास उद्धव गायकवाड

======

हे नक्की वाचा: जेव्हा खा. सुप्रिया सुळेंचा मोबाईल बिघडतो…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.