Home » हॅकिंगपासून दूर राहण्यासाठी पासवर्ड सेट करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

हॅकिंगपासून दूर राहण्यासाठी पासवर्ड सेट करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

आजकाल बहुतांशजण एकापेक्षा अधिक सोशल मीडिया अकाउंटचा वापर करतात. अशातच अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी आपण पासवर्डचा वापर करतो. प्रत्येक अकाउंटसाठी वेगवेगळा पासवर्ड असावा असे सांगितले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Hacking Password
Share

Tips for Password :  आजकाल बहुतांशजण एकापेक्षा अधिक सोशल मीडिया अकाउंटचा वापर करतात. अशातच अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी आपण पासवर्डचा वापर करतो. प्रत्येक अकाउंटसाठी वेगवेगळा पासवर्ड असावा असे सांगितले जाते. परंतु काहीजण आपण पासवर्ड विसरू या भीतीने एकच सामान्य पासवर्ड विविध अकाउंटसाठी ठेवतात. मात्र सामान्य आणि एकच पासवर्ड सर्व अकाउंटससाठी वापरणे धोकादायक ठरू शकते.

Nord Press च्या एका रिपोर्ट्नुसार भारतातील लोक ऐवढा सोपा पासवर्ड ठेवतात की, हॅकर्स त्यांचा पासवर्ड लगेच क्रॅक करू शकतात. सर्वसामान्यपणे पासवर्ड 123456 अथवा 123456789 असा ठेवतात. तुम्ही देखील अशा प्रकारचा पासवर्ड ठेवता का? अशातच पासवर्ड कसा असावा याबद्दल जाणून घेऊया अधिक….

मोठा आणि मजबूत पासवर्ड
एक्सपर्ट्सनुसार, एक मजबूत पासवर्डमध्ये 12 कॅरेक्टर्स असावेत. यामध्ये तुम्ही अक्षर आणि अंकांचा वापर करून पासवर्ड तयार करू शकता. तुमचा पासवर्ड जेवढा गुंतागुंतीचा असेल तेवढेच तुमचे खाते अधिक सुरक्षित राहण्याची शक्यता अधिक वाढली जाते. पण लक्षात ठेवा पासवर्ड असा ठेवा जो तुम्हालाही आठवेल.

वेगवेगळ्या अकाउंटसाठी पासवर्ड
वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटसाठी एकच पासवर्ड सेट करणे भारतात सर्वसामान्य बाब आहे. यामुळेच सायबर हल्लेखोर अत्यंत सहज तुमच्या अकाउंटचे पासवर्ड हॅक करू शकतात. खरंतर वेगवेगळ्या अकाउंटसाठी वेगवेगळा पासवर्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. (Tips for Password)

याशिवाय तुम्हाला सध्या पासवर्ड संदर्भातील दुसरी टर्म जी ट्रेण्डमध्ये आहे ती माहितेय का? खरंतर Passkey असे त्याचे नाव आहे. ही सिस्टिम अशी आहे ज्यामध्ये तुम्ही पासवर्डशिवाय कोणत्याही साइटवर लॉगइन करू शकता. पासकी हे बायोमॅट्रिकवर काम करते. यामुळे तुम्ही पासकी जनरेट करण्यासाठी Web Authentication चा वापर करू शकता.

पासकी दोन स्टेपमध्ये सेट केली जाऊ शकते. एक म्हणजे खासगी आणि दुसरी म्हणजे पब्लिक. पब्लिक key वेबसाइटवर स्टोअर असते. तर खासगी key युजरच्या डिवाइसवर स्टोअर केली जाते. पासकीचा वापर अशाच वेबसाइट आणि अॅपसाठी करू शकता ज्यामध्ये हे फिचर दिले जाते.


आणखी वाचा :
वैज्ञानिकांनी तयार केली इलेक्ट्रॉनिक माती…
RBI कडून ॲलर्ट! ट्रेडिंगसाठी हे ॲप वापरत असाल तर लगेच करा Delete
स्मार्टफोनची स्क्रिन स्वच्छ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.