पावसाळ्याची चाहूल लागली की, सर्वच लोकं शक्य तितक्या प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात करतात. पावसाळा जरी वातावरण थंड, ताजेतवाने करत असला तरी याच पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढवतो. या ऋतूत वातावरण दमट होते, ज्यामुळे जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग पसरण्याची शक्यता सर्वाधिक वाढते. त्यामुळे आपण आपल्या शरीराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. खासकरून आपल्या डोळ्यांची. कारण डोळे हा आपल्या शरीरातील अतिशय संवेदशील आणि महत्वाचा अवयव आहे. त्यामुळे त्यांची निगा राखणे खूपच आवश्यक आहे. (Eye Care)
आजच्या काळात चष्मा लागणे खूपच सामान्य झाले आहे. कॉम्प्युटर – लॅपटॉपचा, मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेकांना चष्मा लागताना दिसत आहे. असे असले तरी बऱ्याच लोकांना चष्मा लावायला अजिबातच आवडत नाही. पण चष्मा लावणे देखील आवश्यक असते. अशावेळी कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याचा पर्याय अनेक जणं निवडतात. कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याचा पर्याय जरी सोपा आणि साधा असला तरी थोडा रिस्की असतो. कॉन्टॅक्ट लेन्स लावताना कायम आपण काळजी घेतली पाहिजे. खासकरून पावसाळ्यामध्ये या लेन्स लावताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स लावणे डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. पाऊस, माती, वारा आणि धूळ आणि आर्द्रता हे सर्व कॉन्टॅक्ट लेन्स लावणाऱ्यांसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. जाणून घेऊया कॉन्टॅक्ट लेन्स लावताना कोणती काळजी घ्यावी. (Marathi News)

> पावसाळ्यात सतत ओलावा असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिया सक्रिय असतात. त्यामुळे लेन्स लावण्यापुर्वी किंवा काढण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे आणि कोरडे करावे. ओल्या किंवा खराब हातांनी लेन्सला स्पर्श केल्याने बॅक्टेरिया डोळ्यांपर्यंत पोहोचू शकतात, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. (Top Stories)
> जर तुम्हाला पावसात बाहेर जावे लागत असेल तर लेन्स लावणे टाळा. लेन्स ऐवजी तुम्ही चष्मा लावून जाऊ शकता. पावसाचे पाणी दूषित असते आणि जर ते लेन्सवर आले तर डोळ्यांमध्ये जळजळ, सूज आणि संसर्ग होऊ शकतो.
> लेन्स डोळ्यात लावताना चुकून जर जमिनीवर पडली तर ती चुकूनही तशीच डोळ्यांत घालू नका. कारण जमिनीवर पडल्याने अनेक प्रकारचे जंतू त्यात प्रवेश करतात, ज्यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. ती सोल्युशनमध्ये क्लीन करून मग घाला. (Marathi Latest NEws)
> स्विमिंग, डोळ्यांचा संसर्ग, डोकेदुखी, आगीजवळ असताना कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नका. जर तुम्ही सायकल चालवताना लेन्स घालत असाल तर सनग्लासेस आणि हेल्मेट यांचा नक्की वापरा.
> कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यात ठेवून झोपू नका. झोपण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्सेस काढणे खूप गरजेचे आहे. शॉवर घेताना, पोहताना किंवा हॉट टब बाथ घेताना कॉन्टॅक्ट लेन्सेस डोळ्यात असणे योग्य नाही. (Top Marathi Headline)
> पावसाळ्यात आर्द्रतेमुळे बुरशी आणि जीवाणू वेगाने पसरतात. त्यामुळे लेन्स केस दररोज धुवा आणि वाळवा आणि त्यात रोज ताजे सॉल्युशन टाका. जुन्या किंवा वारंवार वापरल्या जाणाऱ्या सॉल्युशनमुळे संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.

> डोळ्यांना लेन्स लावल्यानंतर जर तुम्हाला डोळ्यांत जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवत असेल तर ताबडतोब लेन्स काढा आणि स्वच्छ पाण्याने डोळे धुवा. तरीही बरे न वाटल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. (Todays Marathi Headline)
> पाऊस आणि वाऱ्यापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस घालणे फायद्याचे ठरेल. पावसाळ्यात तुम्ही जर सनग्लासेस वापरलेत तर पावसाच्या सरींमुळे डोळ्यांचे लेन्स खराब होणार नाहीत. (Social Updates)
> कॉन्टॉक्ट लेन्स वापरताना तुम्ही कुठेही जाताना त्याचे केस सोबत ठेवावे. कारण कॉन्टॉक्ट लेन्स खराब झाल्यास आपल्याला त्या केसमध्ये सुरक्षित ठेवता येतात. पावसाळ्यात कॉन्टॉक्ट लेन्स वापरताना ते भिजणार नाहीत, याची काळजी घ्यावी. (Marathi Top NEws)
> सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉन्टॉक्ट लेन्सच्या एक्सपायरीकडे लक्ष द्यावे. कारण एक्सपायर झालेल्या डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.
> जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर चुकूनही त्या घालून झोपू नका. असे केल्याने डोळ्यांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे संसर्गाचा धोका वाढतो.
=========
हे देखील वाचा : Jayanti Kale : 80 व्या वर्षीही स्विमिंग करणाऱ्या आजींची प्रेरणादायी कथा
=========
> कॉन्टॅक्ट लेन्स दीर्घकाळ घालून वावरू नका. तुमचे काम पूर्ण झाल्यावर लेन्स काढून ठेवा. त्याचा दीर्घकाळ वापर करणे डोळ्यांसाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. (Top Trending News)
> तुम्ही लेन्स वापरत असाल, तर वेळोवेळी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या लेन्स डोळ्यांसाठी योग्य आहे की नाही हे त्यांच्याकडून वेळोवेळी तपासून घ्या. लेन्सच्या एक्सपायरी डेट बद्दल काळजी घ्या कारण कालबाह्य झालेल्या लेन्स तुमच्या डोळ्याससाठी हानिकारक असू शकतात.
