हिंदू धर्मात काही परंपरा आणि मान्यता वर्षानुवर्षे पाळल्या जात आहेत. त्याच्या लाभाबद्दल ही शास्रांमध्ये सांगण्यात आले आहे. डोकं झाकणे, पायाला स्पर्श करणे, शंख वाजवणे, जमिनीवर बसून जेवण करणे, हात जोडून नमस्कार करणे आणि टिळा लावणे, अशा काही मान्यता हिंदू धर्मात वेळोवेळी पाळताना दिसून येतात. आज ही लोक पूर्ण निष्ठेने याचे पालन करताना दिसतात. आता डोक्यावर टिळा लावण्याबद्दल बोलायचे झाल्यास तर हिंदू धर्मात ही एक जुनी धार्मिक परंपरा आहे. मात्र यासोबत वैज्ञानिक दृष्टीकोनातून सुद्धा याच्या काही लाभांबद्दल सांगितले गेले आहे. तर जाणून घेऊयात डोक्यावर टिळा लावण्याचे धार्मिक महत्व, लाभ आणि त्याच्या नियमाबद्दल अधिक. (Tilak Benefits)
कपाळाला टिळा लावण्याचे धार्मिक महत्व
-धार्मिक मान्यतेनुसार कपाळावर टिळा लावल्याने ग्रहांच्या स्थितीत सुधारणा होते. तसेच कुंडलीतील उग्र ग्रह ही शांत होतात.
-कपाळाला कुमकुम, सिंदूर, पिवळे चंदन, हळद किंवा सफेद चंदन किंवा भस्मचा टिळा लावण्याची परंपरा आहे.
-मान्यता अशी आहे की, डोक्याला टिला लावल्याने व्यक्तीचे डोकं हे शांत राहते. त्याचसोबत त्याच्या स्वभावात ही मधुरता येते.
-धार्मिक मान्यतेनुसार जर तु्म्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल तर डोक्याला टिळा आवश्यक लावावा. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते.
-टिळा हा देवाच्या प्रति असलेली भावना मानली जाते. त्यामुळेच टिळा लावण्याचे विशेष धार्मिक महत्व आहे. यामुळे शांति आणि उर्जा मिळते.
-कपाळावर टिळा लावण्याचे लाभ
जेथे धार्मिक दृष्टीने टिळा लावण्याच्या महत्वाबद्दल सांगितले गेले आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीकोनातून सुद्धा कपाळावर टिळा लावण्याच्या काही लाभांबद्दल सांगितले गेले आहे. (Tilak Benefits)
-टिळा लावल्याने डोक शांत राहतेच पण व्यक्ती यामुळे कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करु शकतो.
-टिळा हा दोन्ही भुवयांच्या मधोमध लावला जातो. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आज्ञा चक्र असते. या आज्ञा चक्रावर टिळा लावल्याने एकाग्रता वाढते.
-बोटांनी कपाळाला टिला लावतेवेळी दबाव निर्माण होतो. यामुळे शिरांमधील रक्तसंचार स्थिर राहतो.
-वैज्ञानिक मतानुसार टिळा लावल्याने डोक्यातील सेरोटोनिन आणि बीटा-एंडोर्फिनचा स्राव संतुलित राहतो.
-हळदीचा टिळा लावल्याने त्वचेसंबंधित समस्या दूर होतात. कारण यामध्ये अँन्टी-बॅक्टेरियल फॅक्टर्स असतात.
हे देखील वाचा- धार्मिक स्थळांच्या ठिकाणी डोक्यावर ओढणी किंवा पदर का घेतात? जाणून घ्या कारण
टिळा लावण्याचे नियम
ज्योतिष शास्रात टिळा लावण्याच्या काही नियमांबद्दल सांगितले गेले आहे. डोक्यावर टिळा लावताना नेहमीच अनामिका या बोटाने लावला पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही अंगठ्याने सुद्धा टिळा लावू शकता. या दोन्ही बोटांनी डोक्यावर टिळा लावणे शुभ मानले जाते. जेव्हा तुम्ही स्वत: टिळा लावता तेव्हा अनामिका या बोटाने तो लावाला. मात्र जेव्हा दुसऱ्याच्या कपाळाला टिळा लावत असाल तर तो अंगठ्याने लावा. नेहमीच लक्षात असू द्या, स्नान केल्याशिवाय कधीच टिळा लावू नका.