एक वेळ अशी होती की, टिक टॉकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. याच्या माध्यमातून लाखो लोक जगात टिक टॉक स्टार म्हणून ओळखले जात आहेत. परंतु भारतासह कोणत्या देशात त्यावर बंदी घातली आहे आणि अन्य काही गोष्टींबद्दल चर्चा केल्या जात आहेत. सध्या टिक टॉक याच संबंधित आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहे. याचे कारण असे की, त्याचे सीईओ शो जी च्यू. अमेरिकेतील कायदे निर्मात्यांनी च्यू यांना कठोर प्रश्न विचारले आणि त्यांच्या उत्तरामुळे असंतुष्ट झाल्याने त्यांना काही तास कैद करु ठेवले गेले आणि याच कारणास्तव च्यू आता सर्व जगभरात चर्चेत आले आहेत. (TikTok CEO)
टिकटॉक बद्दल बोलायचे झाल्यास त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. हे अॅप चीनच्या युजर्सची माहिती एकत्रित करण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि अशा प्रकारे हे अॅप चीनच्या गुप्त उपकरणाशी संबंधित असून जे कोणत्याही देशासाठी आणि युजर्ससाठी धोकादायक ठरु शकते. स्वत: अमेरिकेमध्ये याचे १५ कोटींहून अधिक युजर्स आहेत.
टिक टॉक पूर्णपणे चीनी कंपनी बाइट डांन्सचेच प्रोडक्ट आहे. यावर अमेरिकेत सातत्याने गेल्या काही काळापासून राष्ट्रीय सुरक्षिततेच्या नावावर चिंता व्यक्त केली जात आहे. ही नाराजी वारंवार व्यक्त केली जात असून चीनी या अॅपच्या माध्यमातून कोटींच्या संख्येने अमेरिकेतील युजर्सपर्यंत पोहचू शकतात. याच मुद्द्यावर अमेरिकेचे खासदार च्यू यांना प्रश्न विचारत होते.
हे प्रकरण ऐवढे गंभीर होते की, च्यु अमेरिकेच्या संसदेत आपली बाजू मांडत होते तेव्हा प्रतिनिधींनी त्यांना मध्येच थांबवत दावा केला की, अॅप अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी मोठा धोका आहे. च्यु यांना अशा प्रकारचे आक्रमक पद्धतीने प्रश्न करण्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रेट दोन्ही पक्षाचे खासदार उपस्थितीत होते. च्यु यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये टिक टॉकच्या कंटेन्टमध्ये बदल करण्यासंदर्भातील सुविधेसंदर्भातील मुद्द्यांचा सुद्धा समावेश होता.
४० वर्षीय के शो जी च्यू हे मुळत: सिंगापूरचे एक व्यावसायिक आणि उद्योगपती आहेत. जे २०२१ पासून टिक टॉकचे सीईओ पद सांभाळत आहेत. सिंगापुरमध्ये जन्मलेले च्यु यांचे वडिल बांधकाम क्षेत्रात करायचे आणि आई एक बुककिपरचे काम करायची. पदवी पर्यंत अभ्यास केल्यानंतर ते सिंगापुर आर्म्ड फोर्सेमध्ये कमीश्नर अधिकारी झाले.(TikTok CEO)
सैन्यात सेवा दिल्यानंतर च्यु अभ्यासासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनला आले. येथून त्यांनी अर्थशास्रात पदवी मिळवली आणि २०१० मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून मास्टर्स ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची डिग्री मिळवली. त्यानंतर तीन वर्ष फेसबुकमध्ये इंटर्नशिप सुद्धा केली.
हे देखील वाचा- नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात रोबोट, माणसांसाठी धोका… बिल गेट्स यांनी AI बद्दल दिला इशारा
शिक्षणानंतर च्यु यांनी लंडनमध्ये गोल्डमॅन सॅश मध्ये दोन वर्ष बँकर म्हणून काम केले. त्यानंतर डीएसटी ग्लोबलमध्ये काम केले. २०१३ मध्ये त्यांनी बाइटडांन्सच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांच्या टीमचे नेतृत्व केले. त्यानंतर २०१५ मध्ये च्यु यांनी शाओमीच्या चीफ फाइनेंशियल ऑफिसर पदावर काम केले आणि २०१९ मध्ये त्यांनी त्याच कंपनीच्या इंटरनॅशनल बिझनेस प्रेसिंडट म्हणून कमान सांभाळली. त्याच्या दोन वर्षानंतर ते बाइटडांन्सच्या सीईओ पदावर नियुक्त झाले.