भारतात वाघांचा बचाव करण्यासाठी Save Tigers नावाचे अभियान खुप काळापासून सुरु आहे. प्रोजेक्ट टाइगर अंतर्गत देशातील बहुतांश ठिकाणी टायगर रिजर्वची स्थापना सुद्धा झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत देशभरात जवळजवळ ५० खास क्षेत्र हे वाघांसाठी संरक्षित ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी आपल्याला पर्यटनाची सुद्धा संधी दिली जाते. तर वाघांची काळजी घेण्यासाठी पर्यावरण विभागाकडून त्यांची ट्रॅकिंग आणि त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते. त्याचसोबत व्याघ्र प्रकल्पातील वाघांची विविध नावे सुद्धा ठेवली जातात. मात्र ही नावं कशी ठेवली जातात हे तुम्हाला माहितेय का? जाणून घेऊयात याबद्दलच अधिक.(Tiger names in India)
वाघांची माणसांसारखीच नावे
जर तुम्ही एखाद्या व्याघ्र प्रकल्पाला किंवा नॅशल पार्कच्या सफारीसाठी जाता तेथे तुम्हाला वाघांसंदर्भातील नावांची चर्चा सहज केल्याचे दिसून येते. त्यांची नावे ही माणसांच्या नावाप्रमाणेच ठेवली जातात. खरंतर ही नावे माणसांची असली तरीही ती वाघ किंवा वाघिणीसाठी सुद्धा वापरली जातात.
गाइड ते पर्यटक सुद्धा माणसांच्या नावाने बोलतात
माणसांच्या नावाने वाघाचे नाव ठेवल्याने जरी एखादा व्यक्ती दुसऱ्याशी बोलत असेल तरी आपल्याला सुरुवातील एखाद्या तिसऱ्याच व्यक्ती बद्दल बोलतोय असे जाणवेल. परंतु जेव्हा एखाद्या नॅशल पार्क किंवा व्याघ्र प्रकल्पाला तुम्ही भेट देता तेव्हा तेथील वनाधिकारी, टुरिस्ट गाइड किंवा आसपासच्या गावातील लोक ही आपल्या बोलण्यात वाघ-वाघिणींची नावे रुपात घेतात. भारतात वाघांसाठी टी१२, टी १५ सारखे कोड नसतात. खरंतर त्यांची नावे ही आपण जशी आपल्या पाळीव प्राण्यांची ठेवतो तशी असतात.
विविध कारणांवरुन ठेवली जातात नावं
काही वेळेस वाघ-वाघिणींच्या शरिरावर असलेल्या निशाणीवरुन त्यांची नावे ठरवली जातात. याच माध्यमातून वन विभागातील कर्मचारी त्यांना ओळखलात. काही वाघांमध्ये असेल्या विशेष गुणांवरुन सुद्धा त्यांचे नाव ठेवले जाते. काही नावे ही माणसांसारखी असतात तर काही विचित्र पद्धतीची असतात.

वाघिणीचे-बछड्याचे एकच नाव
भारतात वाघांची नाव ठेवण्याची सुरुवात ही राजस्थानमधील रणथम्बोर नॅशनल पार्कातील वाघिण मछली हिच्यापासून झाली. वाघिणीचे नाव हे मछली ठेवण्यामागील काऱण थोडे मजेशीर आहे. कारण तिने एका मगरीला मारले होते. त्याचसोबत तिच्या आईच्या गालावर माश्याचे निशाण सुद्धा होते त्यामुळेच तिचे नाव मछली असे ठेवले गेले.
कपाळावरील निशाण
मछली या वाघिणीचा २०१८ मध्ये मृत्यू झाला. परंतु ऐरोहेड उर्फ ज्युनियर मछलीला तिच्या नावे आता ओळख मिळाली आहे. या वाघिणीच्या कपाळावर धनुष्याचा सारखी निशाणी आहे. त्यामुळेच हिला हे नाव मिळाले आहे. तिच्या आईचे नाव कृष्णा होते आणि काही ठिकाणी तिला ज्युनियर मछली म्हणून नावाने संबोधित करण्यात येत आहे. आता तिच्या ठिकाणावर तिची मुलगी ऋद्धि हिचे वर्चस्व आहे.(Tiger names in India)
हे देखील वाचा- हत्तीला दिली सर्वांसमोर फाशी, त्याला कोणत्या गुन्ह्याची मिळाली होती शिक्षा?
नावात केला जातो बदल
मध्य प्रदेशातील पेंच टायगर रिजर्वमध्ये टी१५ वाघिणीचे नाव कॉलरवाली असे ठेवण्यात आले होते. कारण तिच्या गळ्याभोवती रेडियो कॉलर लावण्यात आले होते. जेणेकरुन तिला ट्रॅक करणे किंवा तिच्यावर नजर ठेवणे सोप्पे जाईल. तिने आपल्या आयुष्यात ८ वेळा एकूण २९ बछड्यांना जन्म दिला आहे. जो एक जागतिक रेकॉर्ड असल्याचे सांगितले जाते. वाढत्या वयासह पेंचमध्ये तिला माताराम असे बोलले जाऊ लागले.
अशाच प्रकारे महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील माया ही प्रसिद्ध आहे. टी१२ वाघिणीचे नाव माया अशा कारणास्तव ठेवण्यात आले की, तिच्या खांद्यावर एम नावाच्या अक्षराची आकृती आहे. माया ही पर्यटकांचे आकर्षण आहे. प्रत्येकाला तिला पाहण्याची इच्छा असते. अशाच प्रकारे मटकासुर वाघाबद्दल परिसरातील आदिवासी लोकांनी अशी अफवा पसरवली होती की, तो मटक्यातील दारु पिण्यासाठी येतो. त्यामुळेच त्याचे नाव मटकासुर असे ठेवले गेले. अशा प्रकारे वाघांची नावे ही भारतात ठेवली जातात पण त्यामागे सुद्धा काही तथ्य आहेत.