समजा पृथ्वी तिच्या नेहमीच्या स्पीडपेक्षा हळूहळू स्लो फिरायला लागली तर? पण ही फक्त जर तरची गोष्ट नाही आहे. या एका धरणामुळे पृथ्वीची फिरण्याचा स्पीड कमी झाली आहे. पण हे धरण म्हणजे एक टाइमबॉम्बसुद्धा आहे. तर हा आहे चायनाचा थ्री गॉर्जेस डॅम ज्याने पृथ्वीचं रोटेशन स्लो केलंय. हा डॅम बनवण्यासाठी इतकं काँक्रीट वापरलं आहे की जर ते concrete मुंबई सारख्या शहरात पसरवलं तर पूर्ण शहरात concreteची २ फुट लेयर तयार होईल आणि बरंच concrete उरेल. पण हा इतका मोठा डॅम बांधायची गरज का पडली? तर आशियातील सर्वात लांब नदी म्हणजे चीनमधील यांगत्झे नदी. हजारो वर्षे या नदीने चीनला सुपीक जमीन आणि पाणी दिलं आणि समृद्धी दिली. पण दुसऱ्या बाजूला ही नदी चीनसाठी तेवढीच खतरनाकसुद्धा ठरत होती. (Three Gorges Dam)

१९११ मध्ये या नदीला प्रचंड पुर आला ज्यात जवळजवळ २ लाख लोक मृत्युमुखी पडले, पण २० वर्षानंतर या पेक्षा पन्नास पट जास्त जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा पुर या नदीला आला. ज्यात जवळपास ३० लाख लोकांचा मृत्यू झाला. नुकसान एवढं झालं होतं की ते मोजता सुद्धा येत नव्हतं. काही काही वर्षांनी अशाप्रकारे पुर या नदीला येतंच राहिला. (International News)
१९१९ मध्येच या नदीवर धरण बांधून नदीला नियंत्रणात आणायचा विचार केला गेला होता. पण तेव्हा तशी टेक्नॉलॉजी नव्हती, पैसा नव्हता की या नदीवर धरण बांधलं जाऊ शकेल. त्यामुळे ही एक फक्त आयडियाच राहिली. मग पुढे १९७०–८० च्या दशकात चीनने आपली अर्थव्यवस्था मजबूत करायला सुरुवात केली आणि तेव्हा सरकारने या धरणाचा विचार पुन्हा केला. एक असं धरण बांधायचं जे पुर थांबवेल आणि ज्यातून वीजसुद्धा तयार केली जाऊ शकेल. (Three Gorges Dam)
१९९४ मध्ये चीनने Three Gorges Dam बांधायला सुरुवात केली. रोज जवळपास ४०,००० मजूर काम करत १७ वर्षे सतत काम झालं आणि अखेर २०११ मध्ये हे जगातील सर्वात मोठं धरण बांधून पूर्ण झालं. चीनचा थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठं हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आहे! जर ते पूर्ण क्षमतेने वापरलं तर ते एका दिवसात ५.४ कोटी किलोवॉट वीज तासाला तयार करू शकतं. याचं नुसतं पाण्याचं जलशय 40 अब्ज क्यूबिक मीटर्सचं आहे. ज्यात जवळपास 39 लाख 30 हजार करोड लिटर पाण्याचा साठा आहे. (International News)
आता हे एवढं प्रचंड पाणी एका जागी साठवलं की काय होतं? पृथ्वीच्या मासचं – म्हणजे वजनाचं – वितरण बदलतं. म्हणजे जास्त वजन एकाच ठिकाणी येतं. यामुळेच नासाच्या सायंटिस्ट्सनी सांगितलंय की या डॅममुळे पृथ्वीचं रोटेशन 0.06 मायक्रोसेकंदांनी स्लो झालंय. आता मायक्रोसेकंद म्हणजे खूपच कमी वेळ आहे, पण हा बदल मोजता येतोय हे महत्त्वाचं आहे! एवढं प्रचंड वजन एका जागी आलं, म्हणून पृथ्वीचं फिरणं जरा स्लो झालंय. (Three Gorges Dam)

आणि विचार करा जर इतका भव्य डॅम फुटला तर? १९७५ मध्ये चीनमधील दोन छोटे धरणं फुटले होते तेव्हा २,४०,००० लोकांचा मृत्यू झाला होता. थ्री गोरजेस त्यांच्यापेक्षा अनेकपट मोठा आहे. म्हणूनच काही शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ या डॅमला “Time Bomb” म्हणतात. हा डॅम फुटला तर ती इतिहासातील सर्वात भीषण घटना ठरेल. काही मिनिटांतच नदीच्या जवळील शहरं आणि गावं पूर्णपणे नष्ट होतील, ३ ते ४ कोटी लोक बेघर होतील. म्हणजे जवळ जवळ एखद्या छोट्या देशाची लोकसंख्याच. नुकसान किती होईल याचा तर अंदाज सुद्धा कोणी लावू शकत नाही. (International News)
========
हे देखील वाचा : Vladimir Putin: पुतिन आणि त्यांचे अभेद्य सुरक्षा पथक !
========
यांगत्झे नदी चीनची आर्थिक “लाइफलाइन” मानली जाते. त्यामुळे त्यांची अर्थ व्यवस्था सुद्धा ढासळू शकते. काही तज्ज्ञ तर म्हणतात की अशी घटना जागतिक मंदीला सुरुवात करू शकते. (Three Gorges Dam)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
