Home » यंदाच्या उन्हाळ्यामुळे होऊ शकतो ‘हा’ परिणाम

यंदाच्या उन्हाळ्यामुळे होऊ शकतो ‘हा’ परिणाम

by Team Gajawaja
0 comment
Summer Result
Share

यंदाचा उन्हाळा जरा कडकच आहे. दरवर्षी मार्च महिना चालू झाला की, हे वाक्य सर्वदूर पसरतं. मात्र आता हे वाक्य खरोखरचं प्रत्यक्षात येणार आहे. कारण 2023 आणि त्यापुढची काही वर्ष संपूर्ण जगाला उन्हाचा जास्तीचा तडाखा बसणार आहे. परिणामी तापमानातही वाढ होणार असून त्याचा फटका सर्वदूर पसरणार आहे. एल निनोमुळे ही तापमानातील वाढ होणार आहे. यामुळे जसा माणसाला त्रास होणार आहे, तसाच त्रास पर्यावरणालाही होणार आहे. परिणामी जंगलांमध्ये वणव्यांचे प्रमाण वाढणार आहे. दुष्काळही पडू शकतो. पाण्याचे साठे संपणार आहेत. एकूण काय पुढची काही वर्ष अशीच गरमीची आणि त्यामुळे होणा-या दाहकतेची असणार आहेत.(Summer Result) 

युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेटचे संचालक कार्लो बुओन टेम्पो यांनी या सर्वांबाबत एक अहवाल स्पष्ट केला आहे.  त्यानुसार वाढती उष्णता म्हणजे एल निनोचा प्रभाव आहे. यामुळे संपूर्ण जगावर वाढत्या तापमानाचे संकट उभे राहिले आहे. 2023 आणि 2024 सालापर्यंत तापमानात विक्रमी वाढ (Summer Result) होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ही वाढ फक्त मानवी जीवनावरच परिणाम करणार नाही तर पशू पक्षी आणि पर्यावरणाचीही. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. हे वर्ष आणि पुढची काही वर्ष तीव्र उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. (Summer Result)  

दरवर्षी उष्णता वाढत (Summer Result) जात असल्याचे सांगितले जाते. मात्र आता हवामानतज्ञांनी त्याचे मूळ कारण स्पष्ट केले आहे. सध्या संपूर्ण जग वाढत्या तापमानाचा सामना करत आहे. एल निनोच्या पुनरागमनामुळे हा हवामानाचा प्रभाव झाला आहे. सूर्याचे तापमान वाढले आहे. हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, तापमान असेच वाढत जाणार असून दरवर्षी वाढत्या तापमानाचा नवा उच्चांक होणार आहे. काही भागात तर हे तापमान मानवी वस्तीसाठी मारक ठरणार आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरातील ला निना हवामानाच्या तीन वर्षानंतर, आता या वर्षाच्या अखेरीस जगाला एल निनोच्या पुनरागमनाचा फटका बसणार आहे. ला निनामुळे जागतिक तापमान किंचित कमी होते. त्याच्या उलट  एल निनोमुळे होते.  एल निनोमुळे तापमान चढे राहते. अगदी पर्यावरणाला हानी पोहचेपर्यंत मान वाढते. (Summer Result)

युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेटचे संचालक कार्लो बुओनटेम्पो यांनी याबाबत माहिती दिली आहे.  कार्लो यांच्या मते, एल निनोचा परिणाम म्हणजेच जागतिक तापमानात वाढ संभवीत आहे. ही वाढ 2023 आणि 2024 सालापासून दिसून येणार आहे. त्यामुळे उष्णतेचे नवीन विक्रम होणार आहेत. अर्थात हे विक्रम मानवी जीवनाला घातक ठरणार आहेत.  

आतापर्यंतच्या जगातील सर्वात विक्रमी उष्ण (Summer Result) वर्ष 2016 हे नोंदवण्यात आले आहे.  तेव्हाही या एल निनोचा प्रभाव होता. त्यानंतर आठ वर्ष तापमानात वाढ नोंदवण्यात आली होती. आता यावर्षीही पुन्हा या एल निनोचे नाव पुढे करण्यात येत आहे. म्हणजे पुढची काही वर्ष असाच उष्मा सहन करावा लागेल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.   

अर्थात याआधी हे एल निनो म्हणजे काय आहे, हे जाणून घेऊया, पॅसिफिक महासागरातील पेरूजवळील किनारपट्टीच्या तापमानवाढीच्या घटनेला एल-निनो म्हणतात.  समुद्राचे तापमान आणि वातावरणातील बदल, त्या समुद्रातील घटनेला एल निनो असे नाव देण्यात आले आहे. या बदलामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा 4-5 अंश जास्त होते. एल निनोमुळे पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त गरम होते. या बदलामुळे हवामान चक्रावर वाईट परिणाम होत आहे. एल निनोचा प्रभाव संपूर्ण जगावर जाणवत जाणवतो.  त्यामुळे पाऊस, थंडी, उष्मा या सर्वात परिणाम होतो. परिणामी सर्व जगातील पर्यावरणाचे चक्रच बिघडते.  

=======

हे देखील वाचा : भर उन्हात ठेवता येणार तेजस्वी चेहरा

=======

या एल निनोचा प्रभा व आता दिसू लागला आहे. अनेक भागात उन्हाच्या झळांनी वणवे लागल्याची माहिती आहे. तर काही ठिकाणी पूर आल्याची परिस्थितीही निर्माण झाली आहे. ज्या वर्षी एल निनो सक्रिय होतो, त्याचा नैऋत्य मान्सूनवर परिणाम होतो. त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात मुसळधार पाऊस पडतो तर काही भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होतो. काहीवेळा जिथे अजिबात पाऊस पडला नाही तिथेही पाऊस पडतो, परिणामी त्या भागाला दिलासा मिळतो.  मात्र या एल निनोमुळे निसर्गाचे चक्र बिघडते. सध्या आपल्या राज्यातही काही भागात भर उन्हाळ्यात गारांचा पाऊस पडत आहे, हा सर्व एल निनोचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येते.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.