Home » भुतांच्या अड्ड्यासारखा आहे ‘हा’ किल्ला

भुतांच्या अड्ड्यासारखा आहे ‘हा’ किल्ला

by Team Gajawaja
0 comment
Rajasthan Fort
Share

राजस्थान हे राज्य तेथील भव्य किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे.  राजस्थानमधील किल्ले आताही पर्यटकांसाठी मोठं आकर्षण आहे.  दरवर्षी या राजस्थानमधील किल्ले आणि महालांना भेटी द्यायला देशोविदेशीचे पर्यटक येतात. राजस्थानमधील अनेक राजेशाही महालांमध्ये हॉटेलही सुरु करण्यात आले आहेत.  या सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.  मात्र याच राजस्थानमध्ये एक अशी जागा आहे, आणि किल्ली आहे, जिथे जायला पर्यटक फारसे उत्सुक ऩसतात आणि जे पर्यटक फक्त एक वेगळा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात तेच या किल्ल्याला भेट देतात.  पण या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर वेळेचं काटेकोरपण पालन करावे लागते.  कारण या किल्ल्यात सायंकाळी कोणालाही राहता येत नाही.  कारण या किल्ल्यात रात्री चक्क भुतांचा वावर असतो, अशी चर्चा आहे.  हा किल्ला म्हणजे, भानगड किल्ला. (Rajasthan Fort)  

राजस्थानमध्ये भानगड किल्ला (Rajasthan Fort) हा 17 व्या शतकात बांधण्यात आला.  हा किल्ला मानसिंग यांनी त्यांचा धाकटा भाऊ माधो सिंह प्रथम यांच्यासाठी बांधला.  माधो सिंह यांचे आजोबा भान सिंह यांच्या नावावरून या किल्ल्याचे नाव भानगड किल्ला असे पडले.  राजा माधो सिंह हे त्यावेळी अकबराच्या सैन्यात जनरल म्हणून तैनात होते. त्यावेळी भानगडची लोकसंख्या 10,000 च्या आसपास होती.  भानगड किल्ला अलवर जिल्ह्यात आहे.  हाच भानगड किल्ला (Rajasthan Fort) भारतातील सर्वात रहस्यमय किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणून आता ओळखला जातो. या किल्ल्यात सायंकाळी पाच नंतर प्रवेश बंदी आहे.  या किल्ल्यात रात्री कोणी प्रवेश केला तर ती व्यक्ती परत येऊ शकत नाहीत, असे स्थानिक सांगतात.  फक्त स्थनिकच नाही तर सरकारतर्फेही या भानगड किल्ल्यात सूर्यास्तानंतर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.  

राजस्थानमधील किल्ले (Rajasthan Fort) हे त्यांची भव्यता आणि नक्षीकाम यासाठी ओळखले जातात.  यातील अनेक किल्ल्यांमध्ये नक्षीकामावर सोन्याचा मुलामा लावण्यात आलेला आहे.  हे सर्व काम बघण्यासाठी आणि त्याची भव्यता अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पण काही पर्यटकांना थ्रिलींगचा अनुभव घ्यायचा असेल असे पर्यटक हमखास राजस्थानच्या भानगड किल्ल्याला भेट देतात.  या किल्ल्याला सायंकाळी पूर्णपणे बंद करण्यात येते.  रात्री किल्ल्यातून चित्रविचित्र आवाज येतात, असे किल्ल्याच्या बाहेर राहणारे नागरिक सांगतात.  या किल्ल्याचा बराचसा भाग हा वनराईनं व्यापलेला आहे.  या वनराईमध्ये अनेक हिंस्त्र पशू आहेत. सायंकाळी या हिंस्त्र श्वापदांचा वावरही या भानगड किल्ल्यात मोठ्या प्रमाणात असतो. या प्राण्यांचा आवाजही रात्रभर किल्ल्याच्या परिसरात असतो. अशा साहसी वातावरणातील किल्ल्याला भेट देणा-या पर्यटकांची संख्या सध्या वाढत आहे.  

भानगड किल्ल्यासंदर्भात एक कथा सांगण्यात येते.  काकणवाडीच्या पठारावर भानगड किल्ला (Rajasthan Fort) आहे.  हा किल्ला होण्यापूर्वी किल्ल्याच्या जागेत, बाळूनाथ नावाचे साधू तपश्चर्या करत होते.  सम्राट माधो सिंग यांनी त्यांच्या जागेत किल्ला बांधला.  तेव्हा त्यांनी  सम्राट माधो सिंग समोर एक अट ठेवली.  ती म्हणजे, राजानं किल्ला कसाही बांधला तरी त्याची सावली मात्र या साधुच्या निवासस्थानावर राजवाड्याची सावली पडता कामा नये.  जर ही सावली साधूच्या निवासस्थानी पडली तर सर्व नष्ट होईल, असा इशारा साधूनं राजाला दिला. 

पण खूप प्रयत्न करुनही किल्ल्याची सावली साधूच्या निवासस्थानी पडली. त्याचवेळी साधूने दिलेला शाप खरा ठरला.  साधुच्या  शापामुळे हा भानगड किल्ला ढिगाऱ्यात रुपांतरीत झाला.  त्यानंतरही किल्ला परत बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला.  पण किल्ला कधीच बांधता आला नाही.  आता हा असाच पडलेला, भग्न अवस्थेतील किल्ला बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.  याशिवाय  किल्ल्यासंदर्भात राजाला इशारा देणारे साधू,  बाळूनाथ यांचे तपश्चर्यस्थान आजही अवशेषांच्या रूपात आहे. या किल्ल्यातून स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महिलांचा ओरडण्याचा, बांगड्या फुटल्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो.  या किल्ल्यात सायंकाळ नंतर आत जाण्यास बंदी आहे.  मात्र जे पर्यटक दिवसा जातात, त्यांनाही विचित्र अनुभव आल्याचे सांगितले जाते.

========

हे देखील वाचा : हलाल हॉलिडेज म्हणजे काय?

=======

अनेकांनीही त्यांचा कोणतरी अज्ञात शक्ती पाठलाग करत असल्याचा भास झाल्याचे सांगितले.  काहींना कोणीतरी मागून थप्पड मारल्याचा अनुभव आला. त्यामुळेच सूर्यास्तानंतर या भानगड गडाचे दरवाजे बंद होतात. कोणालाही आत जाण्यास बंदी आहे.   या किल्ल्याच्या बाहेर एक गाव आहे.  त्यात साधारण 200 च्या आसपास घरे असून येथील अनेक रहिवासी हा भानगड किल्ला बघण्यास जे पर्यटक येतात, त्यांच्यासाठी गाईड म्हणून काम करतात.  भानगड किल्ला (Rajasthan Fort) आता भग्नअवस्थेत असला तरी या चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या किल्ल्यामध्ये उत्तम कलाकुसरीचा वापर करण्यात आला आहे.  किल्ल्यात शिव, हनुमान यांची प्राचीन मंदिरे आहेत. या किल्ल्याला एकूण पाच दरवाजे तसेच मुख्य भिंत आहे. 

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.