काही दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनासोरचे अस्तित्व होते. या डायनासोरचेच राज्य पृथ्वीवर होते म्हणा ना. पण एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला आणि संपूर्ण पृथ्वीवर विनाश घडला. पृथ्वी कितीतरी वर्ष या विनाशाच्या विळख्यात राहिली. प्राणी नष्ट झाले. वनस्पती नामशेष झाल्या. या विनाशातून बाहेर येण्यासाठी पृथ्वीला हजारो वर्ष लागली. या डायनासोरच्या विनाशाचे कारण ठरलेल्या लघुग्रहासारखा एक लघुग्रह पुन्हा पृथ्वीला धमकावत आहे. पृथ्वीच्या दिशेनं वेगानं झेपावणा-या या लघुग्रहामुळे पुन्हा एकदा पृथ्वीवरील सजीवांना धोका निर्माण झाला आहे. (Threat to Earth)
पर्यायानं मानवीजीवनच संपुष्ठात येण्याचा धोका आहे. या लघुग्रहासंदर्भात अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था गेल्या काही वर्षापासून संशोधन करत आहे. नासानं यासंदर्भात जगातील मान्यवर संशोधकांची एक कार्यशाळाच घेतली होती. यात सहभागी झालेल्या संशोधकांनी आणि नासांना एक तारीख जाहीर केली आहे. ही तारीख आहे, १२ जुलै २०३८. आजपासून चौदा वर्षानी याच तारखेला धोकादायक असा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार असल्याचे नासानं जाहीर केले आहे. लघुग्रह आदळण्याची शक्यता ७२ टक्के असल्याचे नासाचे म्हणणे आहे. यासाठी नासानं एवढं संशोधन केलं आहे की, हा लघुग्रह किती वाजता पृथ्वीवर आदळणार आहे ही वेळही त्यांच्याकडे आली आहे. मात्र हा लघुग्रह खूप मोठा आहे. त्यामुळे त्याला पृथ्वीपासून कसे दूर न्यायचे, याचे उत्तर अद्याप नासाला सापडले नसल्याचेही सांगण्यात आले आहे. चौदा वर्षानंतर येणा-या या विनाशकारी संकटाला रोखण्यासाठी आता नासानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. (Threat to Earth)
पृथ्वीवर डायनासोर नावाचा अजस्त्र प्राणी एकेकाळी रहात होता. या डायनासोरच्या अनेक प्रजाती होत्या. अगदी पाण्यापासून आकाशापर्यंत त्यांचे राज्य होते. हे राज्य एक फटक्यात संपुष्ठात आले. पृथ्वीवर एक लघुग्रह आदळला. यामुळे पृथ्वीवर झालेल्या विनाशामध्ये हे डायनासोरही संपुष्ठात आले. तसाच लघुग्रह आता पुन्हा पृथ्वीवर आदळला तर काय होईल, हा विचार केला तर भीती वाटते. मात्र यासंदर्भात नासानं एक तारीखच जाहीर करुन पृथ्वीवरील संभाव्य संकटाची जाणीव करुन दिली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं पृथ्वीच्या विनाशाची तारीख जाहीर केली आहे. १२ जुलै २०३८ रोजी दुपारी २ वाजून २५ मिनीटांनी एक लघुग्रह आदळणार आहे. यामुळे हजारो वर्षापूर्वी जसा विनाश पृथ्वीवर घड़ला होता, तो होण्याची शक्यता आहे. नासा या लघुग्रहाला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तरीही हा लघुग्रह आदळण्याची शक्यता ७२ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नासाने यासंदर्भात एक कार्यशाळा आयोजित केली होती. यात १०० संशोधकांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यशाळेत लघुग्रह जेव्हा पृथ्वीच्या कक्षात येतो, आणि पृथ्वीवर तो आदळतो, त्या घटनेचा कृत्रिम देखावा करण्यात आला होता. यात लघुग्रहाला पृथ्वापासून दूर करण्यासाठी काय प्रयत्न करावेत, याचीही चाचपणी करण्यात आली. मात्र यातून संशोधकांच्या पदरी निराशा आली आहे. कारण कितीही प्रयत्न केले तरी हा लघुग्रह पृथ्वीला मोठे नुकसान करणार असल्याचे संशोधकांचे मत आहे. (Threat to Earth)
==============
हे देखील वाचा : जगातील सर्वाधिक महागडी शहरे, भारतातील ‘या’ ठिकाणाचाही समावेश
==============
काही दिवसापूर्वी नासानं हा अहवाला जाहीर केला आहे. त्यासाठी नासानं डिफेन्स इंटरएजन्सीच्या सहयोगातून एक कार्यशाळा घेतली होती. त्यात अमेरिकेच्या सरकारी संस्था आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधकांचा समावेश होता. यातून आलेले निष्कर्ष मेरीलँडमधील जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स प्रयोगशाळेत प्रसिद्ध झाले. या संशोधकांनी लघुग्रहाच्या धोक्याला कमी करण्यासाठी काही प्रयोगही करुन बघितले, पण त्यात त्यांना यश आले नाही. मात्र हा लघुग्रह कधी आणि किती वाजता पृथ्वीच्या कक्षेत येणार आणि त्याची पृथ्वीबरोबर किती वाजता टक्कर होणार याची वेळ मात्र त्यांनी जाहीर केली आहे. ही वेळ आणि तारीख अचूक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. नासाचे वरिष्ठ संशोधक लिंडली जॉन्सनयांनी सांगितले की, लघुग्रह ही एकमेव नैसर्गिक आपत्ती आहे, ज्याची अचूक तारीख सांगण्याचे तंत्रज्ञान मानवाकडे आहे. त्यामुळे बरोबर चौदा वर्षांनी पृथ्वीवर येणा-या या संकटासाठी तयार होण्यासाठी आत्तापासूनच तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सई बने