Home » दारु व्यतिरिक्त ‘या’ गोष्टी सुद्धा तुमच्या किडनीवर करतात परिणाम

दारु व्यतिरिक्त ‘या’ गोष्टी सुद्धा तुमच्या किडनीवर करतात परिणाम

by Team Gajawaja
0 comment
Things that damage your liver
Share

किडनी आपल्या शरिरातील एक केमिकल फॅक्ट्री असल्याचे मानले जाते. कारण किडनी रक्तातील काही केमिकलचा स्तर संतुलित ठेवण्याचे वेळोवेळी काम करत राहते. त्याचसोबत शरिरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावते. कारण आपल्या शरिरातील सर्वाधिक मोठे अवयव म्हणजे किडनी. बहुतांश लोक हे आपल्या किडनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि अशा काही पदार्थांचे सेवन करतात ज्याचा थेट परिणाम त्यावर होतो. त्यामुळे हळूहळू किडनी खराब होऊ लागते. आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्हाला किडनीचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर काय खावे किंवा काय खाऊ नये, या सोबत काय खाणे फायदेशीर आहे हे तुम्हाला कळले पाहिजे. सर्वांना माहिती आहे की, दारुच्या अधिक सेवन आणि वजन वाढल्याने किडनी संबंधित आजार उद्भवण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे किडनीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पुढील काही गोष्टी खाण्याची चूक कधीच करु नका.(Things that damage your liver)

साखर
साखरेचे अधिक प्रमाणात सेवन करणे हे तुमच्या किडनीवर परिणाम करु शकतात. फॅट तयार करण्यासाठी किडनी फ्रुक्टोज नावाच्या एका प्रकारच्या साखरेचा वापर करते. अधिक प्रमाणात रिफाइंड शुगर आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपच्या कारणामुळे किडनीसंदर्भाती आजारांचा धोका वाढू शकतो. काही अभ्यासात असे ही समोर आले की, साखर किडनीला अशा प्रकारे खराब करते जसे दारु.

हे देखील वाचा- केस गळणे, वजन वाढणे हे तर थायरॉइडचे संकेत नाही ना?

Things that damage your liver
Things that damage your liver

-अधिक प्रमाणात विटामिन A चे सेवन
शरिराला काही प्रकारच्या विटामिन्सची गरज असते. त्यापैकीच एक असलेल्या विटामिन A हे तुम्हाला ताजी फळं, भाज्यांमधून मिळते. लाल, ऑरेजं किंवा पिवळ्या रंगाच्या फळं किंवा भाज्यांमध्ये विटामिन A अधिक प्रमाणात असते. परंतु बहुतांश लोक विटामिन A सप्लिमेंट्सचे सेवन करतात. विटामिन A सप्लिमेंट्सचे अधिक डोस घेतल्यास तुमच्या किडनीवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विटामिन ए असलेले सप्लिमेंट्स घेणार असाल तर डॉक्टरांचा आधी सल्ला घ्या.(Things that damage your liver)

-रेड मीट
रेड मीट मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते हे खरंय. परंतु रेड मीटचे पाचन करणे तुमच्या किडनीसाठी मुश्किल होऊ शकते. कारण प्रोटीनला तोडणे किडनीला सोप्पे नसते. अशातच अतिरिक्त प्रोटीन निर्माणासाठी किडनी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे फॅटी लिव्हरच्या आजारांचा सुद्धा सहभाग आहे जो तुमच्या मेंदू आणि किडनीला नुकसान पोहचवू शकतो.

-पेनकिलर्स
काही वेळेस आपले अंग किंवा डोके दुखते तेव्हा आपण पेनकिलर्स खातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, अधिक प्रमाणात पेनकिलर्स खाणे हे तुमच्या किडनीवर परिणाम करु शकते. तुमची किडनी खराब ही होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पेनकिलर्स खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.