Home » मानवी अस्तित्वापेक्षा या देशांना वर्चस्वाची चिंता

मानवी अस्तित्वापेक्षा या देशांना वर्चस्वाची चिंता

by Team Gajawaja
0 comment
Country
Share

ग्रीनलँड हा बर्फाचा देश म्हणून ओळखला जातो.  कारण या देशाच्या ८५ टक्के भागात बर्फ आहे.  या देशाच्या २० लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये फक्त बर्फ पसरलेला आहे. ग्रीनलॅंड हा तेथील हिमनद्यांसाठीही ओळखला जातो.  या हिमनद्या बघण्यासाठी येथे जगभरातील पर्यटक भेट देतात. या देशात उन्हाळ्यात सूर्य मावळत नाही. मध्यरात्रीही येथे सूर्य दिसतो.(Country)

त्यानंतरही येथील तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान असते. ग्रीनलॅंड हा तेथील ध्रुवीय अस्वलांसाठीही ओळखला जातो.  बर्फाच्याच पांढऱ्या शुभ्र रंगाची ही ध्रवीय अस्वले फक्त ग्रीनलँडमध्येच आढळतात. याच बर्फाच्या देशाचे अस्तित्व आता जगाच्या नकाशावरुन पुसत जात आहे.  कारण येथील बर्फच वितळू लागला आहे. (Country)

ग्रीनलँडमध्ये इतका बर्फ आहे की,  ज्या दिवशी ते वितळण्यास सुरुवात होईल, समुद्राची पातळी 7 मीटरने वाढण्याचा धोका आहे.  मात्र हा धोका बाजुला ठेऊन आणि ग्रीनलॅंडचे संपणारे अस्तित्वही बाजुला ठेऊन जगातील दोन प्रबळ देश या देशातील बर्फावर नजर ठेऊन आहेत. या बर्फापासून होणारे पाणी आपल्याच देशाला मिळावे, आणि बर्फाखाली दडलेली अमुल्य खनिजे आपल्याला मिळावी म्हणून हे दोन देश प्रयत्न करीत आहेत.  त्यापैकी एक देश म्हणजे अमेरिका, तर दुसरा चीन आहे.  

ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बर्फाचे बेट आहे.  या देशात एवढा बर्फ आहे, तो जर वितळला तर जगातील सर्वच समुद्रकिना-यावरील असणारे देश धोक्यात येतील.  मात्र  याच ग्रीनलँडमधील वितळणाऱ्या बर्फावरून अमेरिका आणि चीन या दोन देशात वाद सुरु झाला आहे.   ग्लोबल वॉर्मिंगच्या फटका या सुंदर देशाला बसला आहे. (Country)

त्यामुळे २० व्या शतकाच्या तुलनेत ग्रीनलँडमधील हिमनद्या तिप्पट वेगाने वितळत आहेत.  अशाच वेगानं हा बर्फ वितळत राहिला तर त्यापासून समुद्राची पातळी वाढणार आहे.  ग्रीनलॅंडमधील बर्फापासून पाणी होण्याचे प्रमाण वाढल्याचे १९८० च्या आसपास अभ्यासकांच्या लक्षात आले.  तेव्हापासून ग्रीनलॅंडच्या बर्फाचे निरिक्षण चालू आहे.  त्या अभ्यासकांनी हा बर्फ आता मोठ्याप्रमाणात वितळणार असल्याचे स्पष्ट केले.  यामुळे एकेकाळी संपूर्ण बर्फाचा असलेला ग्रीनलॅंड बर्फविरहीत होण्यास सुरुवात होणार आहे.

तसेच त्यावरील बर्फाचे पाणी समुद्रात सामील होणार असून त्यामुळे समुद्राची पातळी वाढणार आहे.  यासंदर्भात पर्यावरण विषयक मासिकात अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.  त्यानुसार ग्रीनलँडमध्ये दर तासाला सुमारे ३० दशलक्ष टन बर्फ वितळत आहे. म्हणजेच दर तासाला ३० दशलक्ष टन बर्फ ग्रीनलॅंडमध्ये वितळून त्याचे पाणी होत आहे.  ग्रीनलॅंडच्या बर्फाचा प्रमाणाचा १९८० ते २०२२ पर्यंतचा अभ्यास यासाठी करण्यात आला आहे. त्यातून ग्रीनलॅंडमधील हिमनद्यांमधील बर्फाची चादर ही पातळ झालेली असून त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. हा बर्फ येवढ्या मोठ्या प्रमाणात वितळला आणि त्याचे पाणी समुद्रात मिसळले, तर त्याचा सागरी जीवनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.  (Country)

संशोधकांच्या अहवालानुसार  ग्रीनलँडमधील वितळणा-या बर्फामुळे येत्या काही वर्षात अनेक किनारी देश धोक्यात येणार आहेत.  ग्रीनलँड उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ आहे.  त्याच्या एका बाजूला अमेरिका, कॅनडासारखे देश आहेत. दुसऱ्या बाजूला रशिया, नॉर्वे आणि स्वीडनसारखे देश आहेत.  या देशांना या वितळणा-या बर्फाचा फटका बसू शकतो.  संशोधकांच्या मते, गेल्या तीन दशकांत ग्रीनलँडच्या क्षेत्रफळावरील सुमारे २८,७०७ चौरस किलोमीटरवरील बर्फ वितळला आहे. हा वितळणारा बर्फ ग्रीनलँडच्या एकूण बर्फ आणि हिमनद्यांपैकी १.६ टक्के आहे. हे प्रमाण कमी असले तरी तेथील बर्फाची घनताही विरळ होत चालली आहे.  भविष्यात अशीच विरळ होणारी बर्फाची घनता धोकादायक ठरणार आहे.  सद्यपरिस्थितीत ग्रीनलॅंडच्या ज्या भागात वर्षानुवर्ष बर्फवृष्टी व्हायची, पण त्याच भागात आता झुडपे दिसू लागली आहेत.  जगासाठी हा ग्रीनलॅंडचा वितळणारा बर्फ धोकायदायक असला तरी त्याच्या शेजारी असलेले देश त्यातही स्वतःचा फायदा शोधत आहेत.  

ग्रीनलँडच्या वितळणा-या हिमनद्यांमुळे तिथे नवीन व्यापार मार्ग सुरु करण्याचा या देशांचा उद्देश आहे.  या मार्गावर असलेल्या बर्फामुळे मोठ्या जहाजांना कायम अडसर होत होता.  आता हाच बर्फ वितळल्यास जहाजांचा प्रवास वेळ कमी होईल. यासोबतच या भागात खाणकामही करता येईल,  अशी अपेक्षा अमेरिकेकडून व्यक्त करण्यात येत आहेत.  त्यासोबत चीननेही याकामी पुढाकार घेतला आहे.  त्यातही ग्रीनलँडमध्ये मोठ्या समुद्रकिनाऱ्यामुळे, येथील मासेमारी उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत.  तसेच तेथील बर्फाखाली खनिज साठे असल्याचाही अंदाज संशोधकांना आहे. (Country)

===========

हे देखील वाचा :असे कोणते देश आहेत जेथे एकही भारतीय नागरिक नाही 

===========

या सर्वांमध्ये व्यापारी फायदा बघून चीनही ग्रीनलॅंडच्या बर्फाच्या मागे लागला आहे.  काही वर्षापूर्वी ग्रीनलँडमध्ये १७ घटकांनी बनलेले एक दुर्मिळ खनिज सापडले आहे. त्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स आणि शस्त्रे बनवण्यासाठी केला जातो.  याशिवाय युरेनियमचा सहावा सर्वात मोठा साठा ग्रीनलँडमध्ये आहे. या सर्वांमुळे ग्रीनलॅंडमधील वितळत असलेल्या बर्फामुळे काही देशांना धोका असला तरी चीन, अमेरिका सारखे देश आपला व्यापारी फायदा शोधत आहेत.  या देशांच्या पाठोपाठ  ऑस्ट्रेलियन कंपनी ग्रीनलँड मिनरल्सही येथे करोडोची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे.  या स्पर्धेकडे बघता भविष्यात ग्रीनलॅंडची ओळख बर्फाचा देश अशी पुसून खनिज पदार्थांचा देश अशी होण्याची शक्यता अधिक आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.