आपण अनेकदा रागाच्या भरात मनुष्याच्या हातून मोठे गुन्हे झाल्याच्या बातम्या, ऐकत असतो, वाचत असतो. राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. तसे पाहायला गेले तर राग ही एक भावना आहे. प्रत्येक व्यक्तीलाच कमी अधिक प्रमाणात राग येत असतो. मात्र जास्त राग येणे हे मानसिक, शारीरिक आरोग्यच्या दृष्टीने अतिशय घातक ठरतो. राग ही मनुष्याच्या आयुष्यातील अत्यंत तीव्र भावना मानली जाते. रागामुळे मनुष्यचे मोठे नुकसान होऊ शकते. याचे अनेक उदाहरणं आपण बघत असतो. राग या एका भावनेने होत्याचे नव्हते होऊ शकते. (Mental Health)
परंतु कधी कधी अशी परिस्थिती उदभवते ज्यामुळे राग अनावर होऊ शकतो. त्यावेळी जर राग योग्य प्रकारे हाताळला नाही, तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वांत मोठा अडथळा आहे. राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो. त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही. राग आल्यावर मानवी शरिरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात. शरीराची लवचिकता कमी होते. राग आल्यामुळे माणसाची स्वाभाविक गती आणि सुलभता नष्ट होते. (Health Care)
काही लोकांना प्रत्येक गोष्टीवर राग येतो. अशा लोकांची नाती रागामुळे अनेकदा तुटतात. रागामुळे आपल्या ह्रदयाच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होत असतो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण कधीकधी रागाच्या भरात अशा काही गोष्टी करतो ज्याचा आपल्याला नंतर पश्चात्ताप होतो. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्याही कारणामुळे राग येतो तेव्हा क्षणभर थांबा आणि तुम्हाला कशामुळे राग आला याचा नीट विचार करा. रागामुळे काहीतरी विपरित घडण्याआधी त्याच्यावर नियंत्रण कसे मिळवावे, हे जाणून घ्या. (Marathi News)
श्वसन तंत्रांचा उपयोग
राग अनावर होत असताना शांत राहण्यासाठी श्वसन तंत्राचा उपयोग करा. यासाठी हळूहळू आणि खोलवर श्वास घ्या. ४-५ सेकंद श्वास आत धरून ठेवा आणि नंतर हळूहळू सोडा. या प्रक्रियेमुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो. योगामध्ये वापरले जाणारे प्राणायाम तंत्र राग कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. (Todays Marathi Headline)
शांत ठिकाणी जा
राग आला तर शांत ठिकाणी जा. कुणाशीही काहीही न बोलता शांत बसता येईल, अशा ठिकाणी जाऊन बसा. असे केल्याने तुमचा राग शांत होईल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता येईल. परिस्थितीवर विचार करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. काही मिनिटांसाठी शांत ठिकाणी बसून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मनःशांती मिळेल. (Top Marathi Headline)
विचार करुन बोला
राग येतोय असं जाणवले तर काही बोलण्याआधी दीर्घ श्वास घ्या आणि १० पासून उलटे आकडे मोजायला सुरुवात करा. थोड्या वेळाने तुमचा राग आपोआप मग कमी होईल. (Top Stories)
आपल्या भावना व्यक्त करा
राग मनात ठेवण्याऐवजी योग्य प्रकारे व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. आपल्या भावना ज्या व्यक्तीमुळे दुखावल्या आहेत, त्या व्यक्तीसोबत शांतपणे बोला. परंतु बोलताना शब्दांची निवड विचारपूर्वक करा. शब्दांनी परिस्थिती आणखी बिघडणार नाही, याची काळजी घ्या. (Top Trending Headline)
व्यायामाचा आधार घ्या
नियमित व्यायाम केल्याने तणाव आणि राग कमी होतो. रनिंग, सायकलिंग, किंवा योगासारख्या शारीरिक क्रियांमुळे मन शांत होते आणि शरीरात आनंद निर्माण करणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे कठीण प्रसंगांमध्ये रागावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. (Top Marathi News)
जवळच्या व्यक्तीसोबत संवाद साधा
अनेक वेळा मनात एखादी गोष्ट राहिल्याने आपल्याला राग येत असतो. भावना व्यक्त करणे खूप आवश्यक असते. तुमच्या जवळच्या मित्र -मैत्रिणीसोबत किंवा कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने बोला. तुमच्या मनावरचे दडपण यामुळे कमी होईल. तुमच्या मनावरचा ताण कमी होईल. (Latest Marathi Headline)
=============
Health : ‘हे’ सोपे उपाय करून ॲसिडिटीचा त्रास करा कमी
=============
स्वतःशी सकारात्मक संवाद साधा
रागाच्या क्षणी स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. स्वतःला समजावल्याने तुमचं मन ताणमुक्त होतं आणि राग कमी होतो. ही सवय आत्मविश्वास वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरते. (Top Trending News)
व्यवस्थित झोप घ्या
झोपेचा अभाव हा रागाच्या कारणांपैकी एक असतो. झोप पूर्ण झाली नाही, तर मन अस्थिर होते आणि राग लवकर अनावर होतो. दररोज ७-८ तासांची व्यवस्थित झोप घ्या, ज्यामुळे तुमच्या मनाला आणि शरीराला विश्रांती मिळेल. (Social Media)
(टीप : वरील सर्व आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्क्की घ्या)