Home » उन्हाळ्यामध्ये ‘स्टमक फ्लू’पासून स्वतःला जपा, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

उन्हाळ्यामध्ये ‘स्टमक फ्लू’पासून स्वतःला जपा, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

by Team Gajawaja
0 comment
Health Care During Holi
Share

उन्हाळ्यामध्ये पोटदुखीच्या कारणांचा विचार केल्यास सामान्यतः खूप कोरडा आणि तिखट आहार घेणं, जेवणाची वेळ अनियमित असणं, पाणी कमी पिणं, ब्रेड-पाव, शिळं अन्न, इ. अधिक प्रमाणात खाणं, पोट साफ नसणं, लघवीला जाण्याचा कंटाळा करणं, हात स्वच्छ न धुणं, खूप गोड खाणं अशा अनेक कारणांनी पोटात जंत होऊन पोट दुखू शकतं.

 Stomach flu

अयोग्य आहारामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. यापैकी एक म्हणजे ‘स्टमक फ्लू (Stomach flu)’, ज्याला वैद्यकीय भाषेत गॅस्ट्रोएन्टेरिटिस (gastroenteritis) म्हणतात. पचनसंस्थेला सूज आल्यामुळे किंवा पोटात संसर्ग झाल्यामुळे पोटाचा फ्लू होऊ शकतो. 

हा आजार फारसा गंभीर नसतो, पण त्याकडे दुर्लक्ष करणेही महागात पडू शकते. ‘स्टमक फ्लू’ होण्याचे कारण सामान्यतः विषाणू, जीवाणू, परजीवी किंवा औषधांच्या प्रतिक्रिया देखील असू शकतात.

‘स्टमक फ्लू’ (Stomach flu)  म्हणजे काय?

‘स्टमक फ्लू’ मध्ये रुग्णाला पोटदुखी, जुलाब आणि उलट्या होण्याची तक्रार असते. ‘स्टमक फ्लू’ बाधित व्यक्तीला गॅसही होऊ शकतो. नोरोव्हायरस, रोटाव्हायरस, ॲस्ट्रोव्हायरस इ. सारखे विषाणू अनेकदा दूषित अन्न किंवा पाण्यात आढळतात. 

हे विषाणू अन्न किंवा पाण्याने शरीरात प्रवेश करतात आणि संसर्ग पसरवण्यास सुरुवात करतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना याचा जास्त धोका असतो.

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त धोका

साधारणपणे, उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात स्टमक फ्लूची प्रकरणे अधिक दिसतात. कारण या ऋतूतील उष्णता आणि आर्द्रता या रोगाच्या जिवाणूंच्या वाढीस पोषक वातावरण देते. या सीझनमध्ये फळे, भाज्या आणि शिजवलेले अन्नही लवकर खराब होते. त्याचबरोबर माश्या आणि डास हे जीवाणू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात.

‘स्टमक फ्लू’ (Stomach flu) – मुख्य लक्षणे

१. भूक न लागणे

२. पोटदुखी

३. अतिसार

४. मळमळ

५. उलट्या होणे

६. थंडी वाजणे किंवा थरथरणे

७. ताप

८. सांधे कडक होणे

९. स्नायू दुखणे

१०. सौम्य त्वचेची जळजळ

११. भरपूर घाम येणे

=====

हे देखील वाचा – उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

स्टमक फ्लू (Stomach flu) टाळण्यासाठी काय करावे?

विशेषतः उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. याशिवाय ताज्या फळांचा रस, लिंबूपाणी, सत्तू, ओआरएस इत्यादी गोष्टींचे सेवन करा. कडक उन्हात अजिबात बाहेर पडू नका. लक्षणे अधिक तीव्र होण्याची वाट पाहू नका आणि लवकर डॉक्टरांना भेटा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.