Home » “प्रत्येक कथेला दोन बाजू असतात” : जयंती चौहान 

“प्रत्येक कथेला दोन बाजू असतात” : जयंती चौहान 

by Team Gajawaja
0 comment
Jayanti Chauhan
Share

गेल्या आठवडाभरात भारतातल्या उद्योगजगात एका मुलीची चर्चा आहे.  ही मुलगी म्हणजे जयंती चौहान(Jayanti Chauhan).  ज्यांनी पाण्याला नाव दिलं त्या रमेश चौहान यांची मुलगी.  हे रमेश चौहान म्हणजे बिसलरी या बाटलीबंद पाणी विकणा-या कंपनीचे मालक.  जेव्हा पाणी विकलं जाऊ शकतं, ही कल्पनाच स्वप्नवत वाटावं तेव्हा रमेश चौहान यांनी बिसलरी कंपनी स्थापन केली. आता चौहान यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान हिला या व्यवसायात विशेष रस नसल्यामुळे बिसलरी कंपनी विकण्याची वेळ चौहान यांच्यावर आली.  सुमारे 7000 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेली ही कंपनी आता टाटा कंपनीकडे गेली आहे.  मात्र या सर्व व्यवहारात जयंती चौहान हिच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली.  वडीलांची 7000 कोटी रुपयांची कंपनी पुढे चालवायची सोडून ती विकायला काढायला लावल्याबद्दल जयंतीवर टिका करण्यात आली. या सर्व टिकाकारांना उत्तर न देता जयंतीन आपल्याला आणखी काही नवं करायचं असल्याचं सुचित केलं आहे.  

जयंती चौहान(Jayanti Chauhan), यांना उद्योग जगतात जेआरसी नावाने ओळखले जाते.  गेली काही वर्ष जयंती बिसलरीच्या व्यवस्थापनात लक्ष देत आहेत.  त्यामुळे बिसलरीचा व्यवहार जयंती सांभाळेल अशी अटकळ होती.  मात्र  जयंतीच्या एका निर्णयाने संपूर्ण उद्योग विश्वाला आश्चर्यचकीत केले. सुमारे 7,000 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या कंपनीची जयंती एकमेव वारस होती. परंतु तिने हा व्यवसाय ताब्यात घेण्यास नकार दिला. जयंती चौहानचे बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क शहरात गेले आहे.   जयंतीने फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडायझिंग, लॉस एंजेलिसमधून उत्पादन विकासामध्ये अभ्यास पूर्ण केला आहे. याशिवाय जयंतीने इस्टिटूटो मॅरागोनी मिलानो येथून फॅशन स्टायलिंग आणि लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे.  जयंतीने(Jayanti Chauhan) वयाच्या 24 व्या वर्षी वडिलांच्या देखरेखीखाली बिसलरीमधून आपली कारकीर्द सुरू केली. दिल्ली येथील कार्यालयाचे काम त्या सांभाळत असत आणि कारखान्याच्या नूतनीकरणासह ऑटोमेशनच्या अनेक प्रक्रिया त्यांनी करुन घेतल्या आहेत.  जयंतीने (Jayanti Chauhan) बिसरलीमध्ये नोकरी स्वीकारताच कंपनीत अनेक बदल केले. एचआर, सेल्स आणि मार्केटिंगसह अनेक विभागांमध्ये बदल करून एक मजबूत टीम तयार केली.  जयंतीने 2011 मध्ये मुंबई कार्यालयाचे कामही हाती घेतले.  बिसलरी मिनरल वॉटर, वेदिका नॅचरल मिनरल वॉटर आणि फिजी फ्रूट डिंक आणि बिसलरी हँड प्युरिफायर यांचेही कामकाज जयंती सांभाळत होत्या.  मात्र, त्यांनी संपूर्ण व्यवसाय चालवण्यास नकार दिल्यानंतर ही कंपनी विकण्यावाचून रमेश चौहान यांच्याकडे पर्याय राहिला नाही.  

जयंतीनं(Jayanti Chauhan) आपला हा निर्णय जाहीर करताना आपल्या सोशल अकाऊंटचा वापर केला. जयंतीने, “प्रत्येक कथेला दोन बाजू असतात”.  या एका वाक्यानं आपला निर्णय जाहीर केला.  या वाक्याचे अनेक अर्थ निघाले, आणि काहींनी जयंतीवर टिकाही केली. काहींनी तर तिला खलनायिकाही म्हणाले.  यावर दुःखी झालेल्या जयंतीनं आपल्या वडिलांसोबतच फोटो शेअर करत, माझी स्वतःची काही मतं आहेत, ती जाणून न घेता माझ्यावर टिका करु नका. मला वडिलांबद्दल प्रचंड आदर आहे.  त्यांनी बिसलरी कंपनी उभी करण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी सुद्धा या कंपनीसाठी मेहनत घेतली आहे. पण माझी स्वप्न वेगळी आहेत. हा व्यवसाय उत्तम असला तरी मला माझे विश्व स्वतः उभे करायचे आहे.  माझ्या आवडी वेगळ्या आहेत, आणि माझा व्यवसायही वेगळा असणार आहे.   त्यामुळे माझ्यावर टिका न करता माझी भूमिका समजून घ्या म्हणून तिनं आवाहन केलं आहे.  जयंतीच्या या आवाहनाला मात्र सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.  जयंती फॅशन इंडस्ट्रीमध्ये उत्सुक आहे.  तिने घेतलेले शिक्षण बघता जयंती(Jayanti Chauhan) टेक्साटाईल आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करेल असा अंदाज आहे.   

=====

हे देखील वाचा : भारतात पहिल्यांदा कधी झाली होती नार्को चाचणी? आफताबच्या आधी सुद्धा या गुन्हेगारांनी कबुल केलेत गुन्हे

=====

बिसलरी कंपनी विकत घेण्यासाठी नेस्ले आणि रिलायन्ससारख्या कंपन्याही रांगेत होत्या.  पण, बिसलरीचे मालक रमेश चौहान यांनी आपली कंपनी टाटाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.  1969 मध्ये सुरु केलेल्या या कंपनीला विकण्याचा निर्णय घेतांना रमेश चौहान यांना खूप दुःख झाले. 82 वर्षीय रमेश चौहान या क्षणी अतिशय भावूक झाले होते. आता बिसलरीवर टाटाचे नाव येणार आहे.  मात्र या सर्वात जयंती चौहान यांची पुढची कंपनी कुठली याकडे लक्ष लागले आहे

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.