सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाडीनं निर्णय घ्यायला सुरु केली आहे. त्यांच्या या धडाडीची चर्चा होत असतांना त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या विधानानंही आता खळबळ उडू लागली आहे. अमेरिकेचे खासदार टिम बर्चेट हे त्यापैकीच एक आहेत. टिम बर्चेट यांनी अमेरिकेच्या आसपास परग्रही रहात असल्याचा दावा केला आहे. टिम बर्चेट यांच्या मते खोल समुद्रात एलियन रहात आहेत. त्यांची जहाजे, म्हणजेच युएफओ ही पाण्यातही सहजपणे फिरु शकतात. हे युएफओ अवाढव्य, म्हणजे एका फुटबॉल मैदानाच्या आकाराएवढे असतात. (America)
पाण्यात सहजपणे त्यांचा वावर असून याची सर्व माहिती अमेरिकेतील गुप्तचर विभागाला आहे. आत्तापर्यंत अमेरिकन सरकारनं ही माहिती जनतेपासून लपवली आहे. मात्र ही माहिती आता जाहीर करण्याची वेळ आल्याचे टिम बर्चेट यांनी सांगितले आहे. एका मुलाखतीदरम्यान एलियन बाबतचा हा दावा त्यांनी केला आहे. यापूर्वीही टिम बर्चेट यांनी एलियन संदर्भात असेच वादग्रस्त दावे केले आहेत. त्यांच्यामते पृथ्वीवर विशिषतः अमेरिकेत एलियनचा वावर खुलेपणानं सुरु आहे. अमेरिकेभोवती असलेल्या समुद्राच्या खोल भागात या एलियनचे तळ असल्याचे विधान त्यांनी यापूर्वीही केले आहे. (International News)
मात्र आता टिम बर्चेट हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रीमंडळात असल्यानं त्यांच्या या दाव्याची अधिक चर्चा होत आहे. तसेच आत्तापर्यंत अमेरिकन सरकारवर एलियनची माहिती लपवण्याचा आरोप करणारे टिम आता सरकारमध्ये गेल्यावर ही माहिती खुली करणार का, असा प्रश्नही त्यांनी विचारण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये दर पंधरा दिवसांनी युएफओ बघितल्याचा दावा कऱण्यात येतो. तिथे एलियन आहेत, असे मानणारे अनेक गट असून त्यांच्यामार्फत अमेरिकन सरकारवर एलियनला लपवण्याचा आरोपही करण्यात येतो. मात्र आता त्यात एका खासदाराचाही समावेश झाल्यानं ट्रम्प याबाबत काय मत व्यक्त करत आहेत, याकडे लक्ष लागले आहे. अमेरिकेमध्ये कायम एलियन आणि युएफओ दिसल्याचा दावा कऱण्यात येतो. आता हा दावा खुद्द एका खासदारानंच केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या टिम बर्चेट या खासदाराने एलियन्सबद्दल मोठा दावा केला आहे. (America)
टिम यांनी एका मुलाखतीमध्ये एलियन खोल समुद्रात रहात असल्याचे सांगितले आहे. एलियनचे जहाज असलेल्या युएफओमध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ही जहाजे आकाशात, अंतराळात जशी चालू शकतात, तशीच ती जमिनीवर आणि पाण्यामध्ये सुद्धा चालू शकतात असेही टिम यांनी सांगितले. ही जहाजे अवाढव्या असून एखाद्या फुटबॉल मैदानाएवढा त्यांचा आकार असल्याची माहितीही टिम यांनी या मुलाखतीमध्ये दिली. याशिवाय अमेरिकन सरकारकडे यासंदर्भात सर्व माहिती लेखी स्वरुपात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. टिम यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, एका अॅडमिरलने ही माहिती मला सांगितली आहे. अर्थात त्या अॅडमिरलचे नाव टिम यांनी मुलाखतीमध्ये उघड केले नाही. या युएफओंचा वावर समुद्रातील खोल भागात आहे. तिथे अद्याप मानवाला पोहचात आलेले नाही. एलियनकडे मानवाला नष्ट कऱण्याची क्षमता आहे, मात्र एलियन असे कधीही करणार नाहीत असेही टिम यांनी सांगितले आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
टिम यांनी यापूर्वीही असेच वादग्रस्त दावे केले आहेत. बर्चेट हाऊस ओव्हरसाईट कमिटीवरही टिम बर्चेह होते. युएफओ बाबत सरकारी भूमिका स्पष्ट कऱण्यासाठी या कमिटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र या कमिटीवर असतांनाही टिम यांनी वारंवार युएफओ आणि एलियन असल्याचा दावा केला होता. अमेरिकन सरकार युएफओची माहिती लपवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेमध्ये अनेकवेळा एलियन संदर्भात दावे करण्यात येतात. 2023 मध्ये अमेरिकेच्या हवाई दलाच्या एका माजी गुप्तचर अधिकाऱ्याने तर पेंटागॉनमध्ये एलियन्सचे मृतदेह असून त्यांचा अभ्यास करण्यात येत असल्याचा दावा केला होता. मात्र अमेरिकन सरकारनं हा दावा फेटाळला होता. आता एका खासदारानंचया दाव्याला पाठिंबा दिल्यामुळे अमेरिकेतील सोशल मिडायमध्ये पुन्हा एलियन आणि युएफओ यांचा वावर वाढला आहे. (America)
सई बने