Home » The Sleeping Prophet : त्याला झोपेत भविष्य दिसायचं!

The Sleeping Prophet : त्याला झोपेत भविष्य दिसायचं!

by Team Gajawaja
0 comment
The Sleeping Prophet
Share

तुम्हाला फुकरे सिनेमा आठवतोय का? ज्यात चूचा सकाळी उठतो आणि हनीला स्वप्न सांगतो की, त्याला स्वप्नात जंगली प्राणी दिसतात. मग हनी त्या स्वप्नाचा अर्थ लावतो तेव्हा त्यांना लॉटरीचा नंबर मिळतो आणि ती लॉटरी त्यांना लागते. म्हणजे स्वप्नात त्याला चक्क भविष्याची लक्षणं दिसतात आता तो सिनेमा होता त्यात काहीही दाखवलं जाऊ शकतं. हे फक्त फिल्म मध्ये शक्य आहे.. खऱ्या आयुष्यात कुठे नाही का? पण मंडळी कसंय काही वेळेस खऱ्या आयुष्यात असे चमत्कार घडतात, जे विज्ञानालासुद्धा मागे टाकतात. आजची गोष्ट अशाच माणसाची जो “स्लीपिंग प्रॉफिट” म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे अशी दिव्य शक्ती होती की, तो स्वप्नात भविष्य बघायचा. त्याने या आपल्या शक्तीचा वापर करून ३०,००० पेक्षा जास्त लोकांचा जीव वाचवला. म्हणजे गमंत अशी की, तो डॉक्टर नव्हता, ना त्याने मेडिकलचं शिक्षण घेतलं होतं. त्याला ही दिव्य शक्ति मिळण्यामागे एक मोठा किस्सा आहे. त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. ती घटना काय होती आणि त्याला ही दैवी शक्ती कशी मिळाली? (The Sleeping Prophet)

एडगर कायसी. हा एका शेतकरी कुटुंबातला मुलगा ज्याला पाच भावंडं होती, १९०५ साली एडगर अचानक आजारी पडला. बेशुद्ध झाला आणि तब्बल तीन दिवस कोमात गेला. डॉक्टरांनी तर आशाच सोडली होती आणि म्हणाले, “ह्याला कोमातून बाहेर काढायचा काही उपायच नाही. इतका डेंजरस कोमा आहे की, हा परत शुद्धीत येईल असं वाटत नाही.” तिसऱ्या दिवशी तो जगेल की नाही अशी आशाच उरली नव्हती. तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणाले की, “आम्ही खूप प्रयत्न केले, ही केस आमच्या हाताबाहेर गेली आहे आणि जरी हा वाचला तरी तो कायमचा वेडा बनेल ” यानंतर तिथे गंभीर वातावरण तयार झालं. कोणी काहीच बोलत नव्हतं आणि अचानक एडगर बोलायला लागला. तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. हे बघून सगळे शॉक झाले. एडगर जरी पुटपुटत होता तरी तो कोमातून बाहेर नव्हता आला. बोलायला लागला तरी त्याचं शरीर अजूनही पूर्ण कोमात होतं. एडगर म्हणाला, “घाई करा! मी झाडावरून पडलो होतो, माझ्या पाठीला आणि डोक्याला जखम झाली आहे. त्यामुळेच मी बेशुद्ध आहे. जर का सहा तासांत मला ठीक केलं नाही, तर मी जिवंत राहू शकत नाही. मी सांगतो ते औषध आणा आणि मला द्या. मी काही तासांत बरा होईन.”(The Sleeping Prophet)

The Sleeping Prophet

हे बोलून एडगर पुन्हा बेशुद्ध झाला. आता ज्या औषधाचं नावं त्याने सांगितलं, ते सापडणं तर दूर, एडगरला ते औषध माहित असणंच शक्य नव्हतं. त्याचा मेडिकल फील्डशी काहीच संबंधच नव्हता. तर त्याला हे कुठून कळणार? तरीही एडगरने सांगितल्याप्रमाणे ते आणलं गेलं आणि त्याला देण्यात आलं. काही तासात त्याला शुद्ध आली आणि तो बरा झाला. जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हतं. या घटनेनंतर एडगर फेमस झाला.

एकदा काय झालं की, अमेरिकेत एका मोठ्या करोडपती कुटुंबातली एक बाई खूप आजारी होती. सगळे इलाज केले, पण काही फायदा नाही. मग तिला एडगरकडे आणलं गेलं. तो नेहमीसारखा बेशुद्ध झाला आणि त्याने एका औषधाचं नाव सांगितलं. त्याने डोळे बंद केले, बेशुद्ध झाला, आणि एक औषधाचं नाव सांगितलं. त्या कुटुंबाने अख्खी अमेरिका पालथी घातली पण त्याना ते औषध कुठेच मिळालं नाही. मग त्यांनी पेपरमध्ये जाहिराती दिल्या. २० व्या दिवशी स्वीडनमधून एक माणूस आला आणि म्हणाला, “ह्या नावाचं औषध नाही. पण २० वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी असं औषध पेटंट केलं होतं. पण ते कधी बनलं नाही, बाजारातही आली नाही. फक्त फॉर्म्युला आहे.” मग तो फॉर्म्युला मागवला गेला आणि औषध बनवलं आणि ती बाई ठीक झाली.

त्याने अमेरिकेत त्याच्या आयुष्यात जवळपास ३०००० लोकांना अशा प्रकारे बरं केलं. तो जे काही औषध सांगायचा त्याच्यामुळे, ते लोक ठीक व्हायचे. पण त्याला स्वतःला कळायचं नाही की हे सगळं कसं होतंय. तो फक्त एवढंच म्हणायचा, “जेव्हा मी डोळे बंद करतो, आणि काही सोल्यूशन शोधायचा विचार करतो, तेव्हा मला वाटतं, कोणीतरी माझे डोळे आतून वर खेचतंय. मग काय होतं, मला काही कळत नाही. पण जोपर्यंत मी सगळं विसरत नाही, तोपर्यंत मला सोल्यूशन सुचत नाही.”

================

हे देखील वाचा : World Luckiest Man : तो सात वेळा मरणाच्या दारात होता.. पण वाचला कसा ?

================

कायसीने ट्रान्स अवस्थेत, म्हणजे झोपेसारख्या अवस्थेत, हजारो भविष्यवाण्या केल्या. त्याने अटलांटिस नावाच्या एका खऱ्या जागेबद्दल सांगितलं, जिची रहस्यं समुद्राखाली आणि स्फिंक्सच्या खाली दडलेली आहेत. त्याने भविष्यात येणाऱ्या आपत्ती, पोल शिफ्टिंग, युद्धं आणि जगातले मोठे बदल याबद्दल इशारे दिले आणि यातलं बरंच काही आजच्या घटनांशी जुळतं! आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शास्त्रज्ञांना नंतर स्फिंक्सच्या खाली आणि समुद्रात काही अनॉमलस स्ट्रक्चर्स आणि अनएक्सप्लेन्ड रुइन्स सापडले अगदी तिथेच जिथे एडगरने सांगितलं होतं. त्याने अशीही भविष्यवाणी केली होती की, तिसरं महायुद्ध इजिप्त, लिबिया या परिसरात होईल. (The Sleeping Prophet)

३ फेब्रुवारी १९४५ ला, अमेरिकेत व्हर्जिनिया बीच जवळ एडगर कायसीचा मृत्यू झाला. तरीही त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या त्याला दिसारणाऱ्या भविष्यावर रिसर्च सुरू आहे. तुम्हाला या एडगर कायसीच्या रहस्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.