अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे सुरु आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन या पदासाठी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावेळी पुन्हा एकदा जो बिडेन यांच्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ८१ वर्षाचे जो बिडेन आणि ७८ वर्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नुकतीच एक जाहीर अध्यक्षीय चर्चा झाली. यात जो बिडेन यांच्यावर ट्रम्प यांनी उघडपणे मात केली. ८१ वर्षाचे जो बिडेन हे आत्तापर्यंत अनेकवेळा जाहीर कार्यक्रमात अडखळले आहेत. अगदी जागतिक स्तरावरील कार्यक्रमातही जो बिडेन यांना सावरावे लागले आहे. अशावेळी ते पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय डिबेटमध्ये ट्रम्प यांनी त्यांच्यावर सहजपणे मात केली. अशावेळी जो बिडेन यांच्या पाठिराख्यांनाही, बिडेन यांनी स्वतःहून माघार घ्यावी असे वाटते.
अमेरिकेसारख्या शक्तीशाली देशाचे राष्ट्रध्यक्ष हे शारीरिक दृष्ट्याही फिट असावेत अशी सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांची अपेक्षा आहे. जो बिडेन यांच्यासंदर्भात असाच एक सर्वे घेण्यात आला. त्यात बहुतांश अमेरिकन नागरिकांनी जो बिडेन यांना निवृत्तीचा सल्ला दिला आहे. त्यातच बिडेन फक्त काही तास काम करतात, बाकीचा वेळ त्यांना आराम करावा लागतो, असा खुलासा थेट व्हाईट हाऊसमधील कर्मचा-यांनी केल्यामुळे आता अमेरिकेत जो बिडेन यांच्या तब्बेतीबद्दल चर्चा चालू झाली आहे. त्यामळेच जो बिडेन यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. (Joe Biden)
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली. त्यात अध्यक्ष जो बिडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेनं मोठं वादळ उठलं आहे. या अध्यक्षीय चर्चेत बिडेन बऱ्याचवेळा मुद्दे विरसले. काही काळ शांत राहिले, त्यावरुन त्यांच्या विसरण्याच्या आजाराबाबत चर्चा चालू झाली आहे. बिडेन यांच्या स्मरणशक्तीच्या बातम्या पुन्हा एकदा अमेरिकेच्या सोशल मिडियात जोरात सुरु झाल्या आहेत. त्यातच व्हाईट हाऊसच्या सहाय्यकांनी ८१ वर्षीय बिडेन फक्त सकाळी १० ते ४ या वेळेतच काम करु शकत असल्याचे सांगितले. तसेच यापेक्षा जास्तवेळ काम केल्यास त्यांना प्रचंड थकवा येतो. (Joe Biden)
परदेशी प्रवासादरम्यानही त्यांना थकवा येतो, त्यासाठी त्यांना औषधांचा सहारा घ्यावा लागतो, थेट व्हाईट हाऊसमधून ही बातमी आल्यानं असा उमेदवार अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी योग्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. बिडेन सध्या ८१ वर्षांचे आहेत, जर ते जिंकले तर त्यांचा दुसरा कार्यकाळ अंदाजे ८६ वर्षांनी संपेल. आत्ताच बिडेन ब-याचवेळा भर स्टेजवर मुद्दे विसरतात. त्यात आणखी वय वाढल्यावर भर होईल, असं तज्ञांचे म्हणणे आहे.
माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. त्यांच्याबरोबर झालेल्या ९० मिनिटांच्या चर्चेत बिडेन अनेक चुका करताना दिसले. ट्रम्प यांनी या संधींचा फायदा घेऊन बिडेनच्या दुसऱ्या कार्यकाळाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या चर्चेनंतर जो बिडेन यांच्या मानसिक आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तेथील मान्यवर वृत्तपत्रांनी केलेल्या सर्वेत मतदारांपैकी ७२ टक्के मतदारांनी अध्यक्ष बिडेन नवीन अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे सांगितले आहे. यामुळे जो बिडेन यांच्या डेमोक्रेटिक पार्टी कडूनही आता नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात झालेल्या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ४५ टक्के मतदारांनी ध्यक्षांनी दुसऱ्या उमेदवारासाठी पद सोडले पाहिजे असे नमुद केले आहे. त्यांच्याच पक्षाकडून बिडेन यांना आता पायउतार होण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मुख्यम्हणजे, ट्रम्प यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही जो बिडेन यांची कामगिरी वाईट असल्याचे मान्य केले आहे. (Joe Biden)
===================
हे देखील वाचा : राजकारण म्हणजे वेड्यांचा बाजार
===================
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आपला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. पण अमेरिकेच्या सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षापुढे बिडेन यांच्यासंदर्भात येणारे अहवाल चिंतेत टाकणारे आहेत. बिडेन यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे पक्षातील तरुणांचे मत आहे. अमेरिकेतील निवडणुकील ही पहिली रंगत आहे.
सई बने