Home » Uluru : तुम्हाला माहित आहे का…? चमत्कारिक रंग बदलणाऱ्या डोंगराबद्दल

Uluru : तुम्हाला माहित आहे का…? चमत्कारिक रंग बदलणाऱ्या डोंगराबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Uluru
Share

जर आम्ही तुम्हाला सांगितले की, या जगामध्ये एक असा डोंगर आहे, जो रंग बदलतो. तर तुम्ही म्हणाल काहीही काय सांगता….? रंग बदलणाऱ्या सरड्याबद्दल तर आम्ही ऐकले मात्र डोंगर कसा काय रंग बदलेल? खेचताय का आमची? मात्र हे खरे आहे, या जगात असा एक डोंगर आहे, जो दिवसातून अनेकवेळा रंग बदलतो. सारडा जसे त्याचे रंग बदलतो अगदी तसेच रंग हा डोंगर बदलत असतो. हा डोंगर आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. हा डोंगर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला रंग बदलत असतो, याचा रंग प्रत्येक ऋतूत बदलत आणि आपल्याला हा बदल दिसून देखील येतो. (Mountain)

या रंग बदलणाऱ्या डोंगराच्या भागात आदिवासी लोकांची वस्ती आहे. जवळपास १५० वर्षांपूर्वी या पर्वताचा शोध लागला होता. १८७३ मध्ये डब्लू जी गोसे या इंग्रज व्यक्तीने या डोंगराचा शोध लावला. त्यावेळी हेन्री आर्यस पंतप्रधान असल्याने या डोंगराला आर्यस रॉक हे नाव देण्यात आले, पण स्थानिक लोकं त्याला उलुरु डोंगर म्हणून ओळखतात. या डोंगराला उलुरु डोंगर किंवा आर्यस रॉक असे देखील म्हणतात. (uluru)

या डोंगराचा आकार अंडाकृती असून त्याची उंची ३३५ मीटर आहे. तर डोंगराचा परिघ ७ किलोमीटर असून, रुंदी २.४ किलोमीटर आहे. या डोंगराचा मूळ रंग साधारणपणे लाल आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी या डोंगराच्या रंगात अतिशय चमत्कारिक बदल होतात. सकाळी जेव्हा सूर्याची किरणं त्यावर पडतात, तेव्हा डोंगर जणू आगीने पेटला असून, त्यातून जांभळे आणि गडद लाल ज्वाला बाहेर पडत असल्याचाच भास होतो.(Colour Changing Mountain)

Uluru

जेव्हा संध्याकाळी सूर्य मावळायला सुरुवात होते, तेव्हा लाल रंगात चमकणाऱ्या या मोठ्या खडकाच्या डोंगरावर अनोख्या जांभळ्या रंगाच्या छटा दिसायला लागतात. शिवाय दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत या डोंगराचा रंग कधी पिवळा, कधी नारंगी आणि कधी लाल होतो. तर कधीकधी हा डोंगर जांभळा देखील दिसतो. मात्र हा कोणताही चमत्कार नाही. या डोंगराच्या विशेष रचनेमुळे डोंगराच्या रंगात आपल्याला बदल दिसतात. डोंगराच्या दगडाची रचना खास प्रकारची आहे. दिवसभर सूर्याच्या किरणांचा कोन बदलल्यामुळे आणि हवामानातील बदलामुळे त्याचे रंग बदलत राहतात. हा डोंगर वालुकामय खडकापासून बनलेला आहे. (Social News)

=======

हे देखील वाचा : Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!

=======

सकाळ आणि संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात या डोंगराचा रंग मुख्यत्वे लाल आणि नारंगी रंग दिसून येतो. कारण इतर रंग वातावरणात विखुरलेले असतात. या दोन रंगांमुळे आणि वालुकामय खडकाच्या विशेष रचनेमुळे हा डोंगर लाल आणि नारंगी दिसतो. तर दुपारच्या वेळी, सूर्यप्रकाशात इतर काही रंग सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसू लागतात, तेव्हा या डोंगराचा रंग पुन्हा बदलतो. प्राचीन काळी येथे राहणारे आदिवासी लोकं डोंगरावर होणाऱ्या रंगांमधील या बदलांमुळे, याला देवाचे घर मानायचे. ते लोकं डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गुहांमध्ये पूजा करायचे. मात्र आता या डोंगरावर जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. हा डोंगर एक मोठे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून मोठ्या वेगाने प्रचलित होत आहे. (Top Trending Marathi News)

ऑस्ट्रेलिया सरकारने देखील या डोंगराची लोकप्रियता बघून, डोंगराजवळ ४८७ चौरस मैलांच्या क्षेत्रात माउंट ओल्गा राष्ट्रीय उद्यान बांधले असून, या उद्यानात कांगारू, बँडिकूट, वॉलबी आणि युरो यांसारखे प्राणी ठेवण्यात आले आहेत. शिवाय येथे विविध प्रकारची झाडं देखील लावण्यात आली आहेत. दरवर्षी देशविदेशातून लाखो लोकं हा डोंगर पाहण्यासाठी येथे येतात. काही लोकं अनेक किलोमीटर दूर बसून दिवसभर त्याचा रंग बदलताना पाहतात. तर काही लोकं त्यावर ट्रेकिंग देखील करतात.(Marathi Latest News)

Uluru

रंग बदलणारा हा एकमेव डोंगर नाही. चीनमधील रेनबो माउंटन देखील काही प्रमाणात रंग बदलतो. वालुकामय खडक आणि खनिजांपासून बनलेला असल्याने, येथील डोंगर इंद्रधनुष्याच्या रंगांसारखे दिसतात. सूर्याची किरणं बदलल्यामुळे या डोंगराचे देखील रंग बदलतात. पेरूचा विनिकुंका किंवा रेनबो माउंटन देखील असाच आहे, या डोंगरावर अनेक प्रकारचे खनिजे आहेत, त्यामुळे तो लाल, हिरवा, पिवळा आणि सोनेरी रंगात बदलत राहतो.(Latest News)

==========

हे देखील वाचा : Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

==========

अमेरिकेचा अँटेलोप कॅनियन देखील दिवसातून अनेकदा रंग बदलतो. जेव्हा अरुंद भेगांमधून सूर्याची किरणं पडतात, तेव्हा वालुकामय खडकांच्या भिंती सोनेरी, नारंगी आणि लाल होतात. कॅलिफोर्नियाचा बिग सड सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी रंग बदलतो, विशेषतः जेव्हा समुद्राच्या लाटा त्याला ओलावतात.(Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.