Home » MV Derbyshire : ते जहाज समुद्रात गायब झालं आणि २० वर्षानंतर…

MV Derbyshire : ते जहाज समुद्रात गायब झालं आणि २० वर्षानंतर…

by Team Gajawaja
0 comment
MV Derbyshire
Share

1980 जपान जवळचं साउथ चायना सी, रात्रीच्या अंधारात या समुद्रात भयंकर वादळ आलं आहे. लाटा इतक्या उंच उसळतायत की त्या काही मजली इमारती एवढ्या आहेत. पण या लाटांमध्ये सुद्धा एक जहाज जपानच्या दिशेने पुढे सरकतंय त्याचं नाव आहे एमव्ही डर्बीशायर. 1000 फूट लांबीचं हे जहाज टायटॅनिकपेक्षाही मोठं आहे. जपानच्या दिशेने निघालेलं हे कार्गो जहाज, ज्यामध्ये कॅप्टन जोफ्री अंडरहिल यांच्यासह 44 जण आहेत. जहाज वादळात मोठमोठ्या लाटांवर आदळतंय, पण त्याला अशा परिस्थितीसाठीच डिझाइन केलं होतं. त्यामुळे कुणालाही काळजी वाटत नव्हती. पण अचानक काहीतरी विचित्र घडतं.

असं काही, ज्यावर क्रू मेंबर्सपासून ते जगातल्या कोणत्याही माणसाला विश्वास ठेवणं अशक्य होतं. वादळाच्या मध्येच एक प्रचंड मोठी लाट तयार होते. जहाज त्या लाटेवर आदळताच, सगळं काही शांत होतं. कारण हे जहाज, त्यातल्या 44 जणांसह, रहस्यमय रीतीने कुठेतरी गायब होतं. ना कोणता SOS सिग्नल, ना कोणताही पुरावा. ब्रिटिश नेव्ही, जपानी कोस्ट गार्ड आणि अमेरिकन मिलिट्री मिळून कित्येक महिने या जहाजाचा शोध घेतात, पण काहीच सापडत नाही. पण सुमारे 20 वर्षांनंतर, 1994 मध्ये पुन्हा एक विचित्र घटना घडते. एका ओशन एक्सप्लोरर जहाजाच्या स्क्रीनवर अचानक एक जहाज दिसतं. आणि ते दुसरं-तिसरं कोणतं जहाज नसून एमव्ही डर्बीशायरच असतं. 20 वर्षांनी हे जहाज सापडतं. पण मग त्या रात्री या जहाजासोबत नेमकं काय झालं होतं? हे जाणून घेऊ. (MV Derbyshire)

9 सप्टेंबर 1980. साउथ चायना समुद्रात MV Derbyshire आपला प्रवास करत होतं. कॅनडाहून लोह खनिज घेऊन जपानकडे निघालेलं हे जहाज इतकं भव्य होतं की त्याचा प्रत्येक कार्गो होल्ड सात मजली इमारतीएवढ्या होत्या. त्याची एकूण लांबी तर आयफेल टॉवरपेक्षाही जास्त होती. कॅप्टन जोफ्री अंडरहिल यांच्या नेतृत्वाखाली 44 क्रू मेंबर्स या जहाजावर होते. सुरुवातीला सगळं शांत होतं – आकाश स्वच्छ, समुद्र शांत. पण जसजसं जहाज साउथ चायना समुद्रात पोहोचलं, तसं वातावरण बदललं. आकाश आंधारलं, आणि समुद्रात प्रचंड लाटा उसळू लागल्या. जसं की समुद्राला हे जहाज आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचूच द्यायचं नव्हतं.

या जहाजाच्या जवळ एक भयंकर चक्रीवादळ, येत होतं. हवेचा दाब वाढत होता, पाण्याचा रंग बदलत होता. कॅप्टन जोफ्री यांनी वातावरणाचा अंदाज घेतला. पण त्यांना त्यांच्या जहाजावर पूर्ण विश्वास होता. कारण MV Derbyshire कोणतं साधं जहाज नव्हतं. तरी कॅप्टननी सावधगिरी बाळगली. जहाजाचा स्पीड कमी केला आणि त्याचं टोक दक्षिण-पूर्वेकडे वळवलं, जेणेकरून जहाज वादळात तग धरेल. हा निर्णय अगदी मॅन्युअलप्रमाणे होता. पण समुद्र कधीच नियमांनुसार वागत नाही. लाटा आता इतक्या उंच होत्या की त्या इमारतींएवढ्या वाटत होत्या. प्रत्येक लाट जहाजावर आदळत होती, आणि जहाज पूर्ण थरथरत होतं. प्रत्येक धक्क्याने जहाजाच्या व्हेंटिलेटर्स आणि हॅच कव्हर्सवर ताण येत होता. खालच्या भागात स्टीलला तडे जाऊ लागले. पण याचा अंदाज कोणालाच नव्हता – ना कॅप्टनला, ना क्रू मेंबर्सना.(MV Derbyshire)

MV Derbyshire

आणि मग आली ती भयंकर लाट. कित्येक मीटर उंच. जहाज त्या लाटेवर चढलं आणि खाली समुद्रात आदळलं. या धक्क्याने जहाजाच्या पुढच्या भागात एक मोठा तडा गेला. पाणी आत शिरू लागलं. जहाजाचा तो भाग, जो त्याला तारणारा बॅलेन्स देतो, आता पाण्याने भरत होता. जहाज हळूहळू एका बाजूला झुकू लागलं. क्रू मेंबर्सना अजूनही वाटत होतं की ते या वादळातून बाहेर पडतील. पण त्यांना काय माहीत, त्यांचं हे वर्ल्ड फेमस जहाज आता समुद्राच्या तळाशी जाणार आहे. (Top Stories)

जसजसं पाणी आत शिरत गेलं, तसं जहाजाच्या हॅच कव्हर्सवर दबाव वाढत गेला. अचानक नंबर वन हॅच, जे टेनिस कोर्टएवढं होतं, आतल्या दबावाने तुटलं. समुद्राचं पाणी सुनामीसारखं जहाजात घुसलं. एकापाठोपाठ एक होल्ड्स तुटत गेले. इंजन रूम, इतर कंपार्टमेंट्स पाण्याने भरले. कॅप्टननी शक्य तितक्या युक्त्या करून पाहिल्या, पण आता जहाज इतक्या विचित्र प्रकारे समुद्रात झुकलं होतं की त्याला वाचवणं अशक्य होतं. आणि मग, एका क्षणात सगळं शांत झालं. कोणताही डिस्ट्रेस कॉल नाही, कोणताही फ्लेअर नाही. फक्त एक शांत समुद्र आणि त्यात गायब झालेलं एक भव्य जहाज. MV Derbyshire, 44 क्रू मेंबर्ससह, जगाच्या नकाशावरून गायब झालं.(MV Derbyshire)

जपानमध्ये, कॅप्टन अंडरहिल यांच्या पत्नी खिडकीतून समुद्राकडे पाहत होत्या. त्यांना याची कल्पना नव्हती की त्यांचे पती ज्या जहाजावर आहेत ते जहाज समुद्राच्या तळाशी अंतिम प्रवासाला निघालं आहे. सहा दिवस कोणालाच काहीच कळलं नाही. कारण सर्वांना MV Derbyshireवर इतका विश्वास होता की ते असं समुद्रात हरवणं अशक्य होतं. पण सातव्या दिवशी, जेव्हा जहाज कोणत्याही रडारवर दिसलं नाही, तेव्हा मोठी शोध मोहीम सुरू झाली.

जपानचे कोस्ट गार्ड्स, अमेरिकन नेव्ही आणि ब्रिटिश सैन्य यांनी मिळून शोधमोहीम सुरू केली. हेलिकॉप्टर्स, विमानं, जहाजं या सगळ्यांनी सर्व समुद्र पिंजून काढला. पण काहीच सापडलं नाही. जसं की MV Derbyshire कधी अस्तित्वातच नव्हतं. सहा आठवड्यांनंतर, एका तेल टँकर जहाजाला समुद्रात एक लाइफबोट दिसली, ज्यावर लिहिलं होतं – Derbyshire. पण तरीही प्रश्न कायम होता – हे जहाज कुठे गेलं?(Top Stories)

याचवेळी, पीटर रेडयार्ड नावाच्या एका माणसाची कहाणी सुरू झाली. त्यांनी या हादसात आपला मुलगा गमावला होता. पीटर हे अनुभवी मरीन इन्स्पेक्टर होते. त्यांनी MV Derbyshire सारख्या जहाजांच्या डिझाईनचा आणि रेकॉर्ड्सचा अभ्यास केला. आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट सापडली. MV Derbyshire ही ब्रिज क्लास जहाज होतं. आणि याच क्लासच्या दुसऱ्या जहाजांना – जसं की MV Tyne Bridge – वादळात तडे गेले होते. पीटरला एक पॅटर्न दिसला – प्रत्येक जहाजाच्या सुपरस्ट्रक्चरच्या पुढच्या भागात, जिथे सर्वात जास्त दबाव येतो, तिथे क्रॅक्स पडत होते.

पीटरला खात्री झाली की MV Derbyshire च्या गायब होण्याचं कारण वादळ नव्हतं, तर डिझाईनमधली कमतरता होती. त्यांनी ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा केले. त्यांनी ब्रिटिश सरकारकडे इन्क्वायरीची मागणी केली. पण पहिल्या इन्क्वायरीत त्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. 1989 मध्ये सरकारने सांगितलं की कंपनीची कोणतीही चूक नव्हती, आणि डिझाईनमध्ये काहीच दोष नव्हता. पण पीटर आणि इतर कुटुंबांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःची स्वतंत्र तपासणी सुरू केली. फोटोग्राफिक सिम्युलेशन्स, स्ट्रेस लोड मॉडेल्स, स्टीलची मायक्रोस्कोपिक तपासणी – सगळं केलं. आणि प्रत्येकवेळी एकच उत्तर मिळालं – स्ट्रक्चरल कमजोरी. पीटर आणि इतर कुटुंबांनी 47,000 सह्यांसह यूके पार्लमेंटमध्ये पिटीशन सादर केलं. (Top Stories)

==================

हे देखील वाचा : Arunachaleshwar Temple : अग्नी रुपातील भगवान शंकराची पूजा होते या मंदिरात !

==================

आणि मग, 8 जून 1994 रोजी, एक चमत्कार घडला. जपानच्या दक्षिण समुद्रात Ocean Explorer 6000 नावाचं एक संशोधन जहाज समुद्राच्या तळाशी काहीतरी शोधत होतं. त्यांच्या सोनारवर एक विचित्र सावली दिसली. जेव्हा त्यांनी रिमोट ऑपरेटेड व्हेइकल्स पाण्यात सोडलं, तेव्हा समुद्राच्या 4000 मीटर खोलीत त्यांना एक मेटलची बॉडी दिसली. ते होतं MV Derbyshire – काही भागांमध्ये तुटलेलं, विखुरलेलं पण तरीही ओळखता येणारं. या शोधानंतर एक फॉरेंसिक तपासणी सुरू झाली आणि यातून सत्य समोर आलं. जहाजाच्या पुढच्या भागातले व्हेंटिलेटर कॅप्स गायब होते. तिथूनच पाणी आत शिरलं आणि हे सगळं डिझाईनच्या कमजोरीमुळे झालं.(MV Derbyshire)

1998 मध्ये एक लीक झालेली रिपोर्ट म्हणाली की कदाचित क्रू मेंबर्सनी हॅच कव्हर नीट बंद केलं नसेल. यामुळे क्रू मेंबर्सवर दोष टाकला गेला, जे आता जिवंत नव्हते. हे ऐकून कुटुंबांना धक्का बसला. पण जॉन प्रेस्कॉट, जे आता यूके चे डेप्युटी प्राइम मिनिस्टर होते, यांनी एक खुली आणि पब्लिक इन्क्वायरी जाहीर केली. (Top Stories)

एप्रिल 2000 मध्ये, लंडनच्या रॉयल कोर्ट्समध्ये इन्क्वायरी सुरू झाली. सर्व पुरावे तपासल्यानंतर पॅनलने ठरवलं की या अपघातासाठी डिझाईनचाच दोष होता. पाण्याचा प्रवाह थांबवणं अशक्य होतं. क्रू मेंबर्सनी सर्व सेफ्टी प्रोटोकॉल्स पाळले होते. त्यांची कोणतीही चूक नव्हती. तब्बल 20 वर्षांच्या लढाईनंतर, MV Derbyshire च्या क्रू मेंबर्सना आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला. ही होती MV Derbyshire ची कहाणी – एक जहाज, ज्याला जगातील सर्वात मजबूत बल्क कॅरियर म्हटलं जात होतं, पण ज्याच्या डिझाईनमधल्या कमजोरीने 44 जणांचा जीव घेतला. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये सांगा!

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.