रशियाचे अध्यक्ष यांच्याभोवती एक अदृश्य असं गुढ वातावरणाची आहे. या गुढ वातावरणाची चर्चा अधिक वाढते, जेव्हा पुतिन यांच्यावर टिका करणा-यांचा अचानक मृत्यू होतो. रशियाचे अध्यक्षपद सांभाळणारे पुतिन आपल्या विरोधकांना सहन करु शकत नाहीत, त्यामुळे ते त्यांना आपल्या मार्गातून दूर करतात, अशी फक्त चर्चा होते. अर्थात या सर्व घटनांमध्ये व्लादिमीर पुतिन हेच आहेत, असं जाहीरपणे सांगण्याची हिम्मत मात्र कोणीही करु शकत नाही. गेल्या काही वर्षात पुतिन यांना विरोध केलेल्या अनेकांचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. नुकतीच यात एका प्रसिद्ध गायकाची भर पडली आहे. दिमा नोव्हा नावाच्या या गायकांनी काही दिवसापूर्वीच पुतिन यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून टिका केली होती. 35 वर्षीय या दिमा नावाच्या गायकांनं रशियांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा गाण्यातून निषेध केलाच पण त्यासाठी पुतिन यांना जबाबदार धरलं होतं. आता या गायकाचाही रहस्यमयरित्या मृत्यू झाला असून यासाठी पुतिन जबाबदार आहेत का, अशी दबक्या आवाजात चर्चा चालू झाली आहे.

प्रसिद्ध गायक दिमा नोव्हाच्या मृत्यूची माहिती एका मिडीयापोस्टच्या आधारानं जाहीर करण्यात आली, आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. यासंदर्भात दिमाच्या मित्रानं सांगितलं की, दिमा गाडी चालवत असतांना बर्फावर पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे सर्व अचानक झालं आणि आम्ही सर्वच दिमाच्या मृत्यूनं धास्तावलो आहोत. दिमा नोव्हा यानं क्रीम सोडा नावाचा ग्रुप स्थापन केला होता. हा गाण्याचा ग्रुप रशियामध्ये लोकप्रिय होता. दिमा नोव्हा त्यांच्या गाण्यांमधून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर टीका करत असे. त्याची गाणी रशियातील युद्धविरोधी निदर्शनांदरम्यान मोठ्या प्रमाणात गाजली. त्याचे एक्वा डिस्को हे गाणे अनेकदा युक्रेनवरील आक्रमणाच्या निषेधार्थ मास्कोमध्ये गायले गेले. आपल्या गाण्यात दिमाने रशियन राष्ट्राध्यक्षांच्या 1.3 अब्ज डॉलरच्या बंगल्यावरही टीका केली होती.
दिमाचा मृत्यू एका अपघातात झाला. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि काही मित्रही होते. यापैकीही एका मित्राचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र या सर्वानंतर व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधकांच्या मृत्यूची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षभरामध्येच पुतिन यांना विरोध करणारे अनेक मृत्यूच्या दारात गेले आहेत. त्यापैकी कुणी उंच बिल्डीगमधून खाली पडले तर कुणाच्या चहात विष सापडले, तर कुणी घरात कोणीही नसतांना मृत्यूच्या दारात गेले.
24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सुमारे डझनभर टीकाकारांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. यापैकी काही तर रशियन अब्जाधीश होते. अर्थात या सर्वांच्याच मृत्यूची चौकशी झाली, आणि ती करणा-या मॉस्को प्रशासनाने सर्वच मृत्यूंना नैसर्गिक मृत्यू असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
=======
हे देखील वाचा : महाराष्ट्रात सर्वाधिक गर्भपात; देशभरात १.४४ लाख प्रकरणे दाखल
=======
3 मार्च 2022 रोजी, रशियाचे सर्वात मोठे तेल व्यावसायिक आणि व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय रविल मॅगानोव्ह यांनी युक्रेनवरील हल्ल्यावर टीका केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यत, 31 ऑगस्ट रोजी 67 वर्षीय रविल यांचा मॉस्को येथील रुग्णालयात मृत्यू झाला. रविल यांनी खाली उडी मारल्याचे सांगण्यात आले, पण काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रविल एका खिडकीतून खाली पडले. यातील संशयाचा भाग म्हणजे, मृत्यूपूर्वी त्यांचे मित्र व्लादिमीर बुडानोव यांचा मृतदेहही तिथेच सापडला होता. बुडानोव यांचा मृत्यू स्ट्रोकमुळे झाल्याचे सांगण्यात आले. मरीना यांकिना या महिला संरक्षण अधिकाऱ्याचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मरीना यांना कुणीतरी 16 व्या मजल्यावरु खाली ढकलल्याचे स्पष्ट झाले. रशियाचे एक मंत्री मिखाईल लेसिन हे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राच्या खुणा होत्या. रशियाचे प्रसिद्ध उद्योगपती डॅन रॅपोपोर्ट वॉशिंग्टनमधील त्यांच्या अपार्टमेंटसमोर मृतावस्थेत आढळून आले. बोरिस बेरेझोव्स्की या गर्भश्रीमंत उद्योगपतीची अवस्थाही अशीच झाली. पुतिन यांच्याबरोब संबंध तोडून ते ब्रिटनला गेले. मात्र 2013 मध्ये त्यांच्या घरातच ते मृतावस्थेत आढळून आले. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर टिका करणा-यांच्या मृत्यूची ही यादी खूप मोठी आहे. आता त्यात 35 वर्षीय गायक दिमा नोव्हाची भर पडली आहे.
सई बने