लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अटॅक’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज केला आहे. जॉन अब्राहम हा भारताचा पहिला सुपर सोल्जर म्हणजेच कमांडो ऑफिसर बनल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्यात दहशतवादाचा मुकाबला करताना संगणक प्रोग्रामद्वारे बनवलेला अधिकारी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
अटॅकच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिसची झलकही आपल्याला पाहायला मिळत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम ‘भारताचा पहिला सुपर सोल्जर’ बनला आहे.
हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना हाॅलिवूड ‘ची आठवण होईल. येत्या १ एप्रिलला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. जॉन अब्राहमचे चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याच्या या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.
====
हे देखील वाचा: तापसी पन्नू स्टारर ‘शाबाश मिठू’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
====
जॉन अब्राहमच्या या चित्रपटात प्रेक्षकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ‘वॉर’ पाहायला मिळणार आहे. ‘अटॅक’च्या ट्रेलरमध्ये जॉन काही साहसी स्टंट करताना दिसत आहे. २.३० मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये अॅक्शनसोबतच रोमान्स आणि ड्रामाही आहे.
गेल्या आठवड्यात, चित्रपटाच्या टीमने आयआयटीच्या कॉलेज फेस्टिव्हल ‘मूड इंडिगो’मध्ये अटॅकचा संगीत अल्बम लाँच केला. या विशेष सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांव्यतिरिक्त संगीतकार शाश्वत सचदेव, गायक जुबिन नौटियाल, श्रेया जैन आणि गिरीश नाकोड हे देखील उपस्थित होते. या काळात तंत्रज्ञानाच्या विकासावर होत असलेल्या कामाचे कौतुक करून जॉनने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
जॉनचे आगामी चित्रपट
जॉनचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. अटॅक व्यतिरिक्त तो एक व्हिलन रिटर्न्स आणि पठाणमध्ये दिसणार आहे. पठाणचा टीझर नुकताच रिलीज झाला, ज्याला चांगलीच पसंती मिळाली आहे.
====
हे देखील वाचा: कॉमेडियन कपिल शर्मा दिसला डिलिव्हरी बॉयच्या गेटअपमध्ये, एका व्यक्तीने फोटो काढला तेव्हा म्हणाला…
====
या चित्रपटात जॉनसोबत दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे शाहरुख बऱ्याच वर्षांनी अभिनेता म्हणून पुनरागमन करत आहे.