Home » राम मंदिराचा इतिहास आता चित्रपटाद्वारे पाहता येणार…

राम मंदिराचा इतिहास आता चित्रपटाद्वारे पाहता येणार…

by Team Gajawaja
0 comment
Ram Temple
Share

अयोध्येत होणा-या राम मंदिराची (Ram Temple) प्रतीक्षा देशभरातीलच नव्हे तर जगभरातील रामभक्तांना आहे.  या भव्य दिव्य राममंदिराची उभारणी कशी होत आहे, हे सुद्धा जाणण्यासारखे आहे.  यासाठीच राममंदिर ट्रस्टच्या पुढाकारानं राममंदिर निर्मितीवर चित्रपट काढण्यात येणार आहे.  या चित्रपटाची कथा प्रसिद्ध निर्माते प्रसून जोशी लिहित आहेत.  तर या चित्रपटाला महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज असणार आहे.  राममंदिरावर होणा-या या चित्रपटासाठी प्रसून जोशी आणि अमिताभ बच्चन हे दोघेही कुठलेही मानधन घेणार नाहीत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

राम मंदिराचा 500 वर्षाचा इतिहास हा नवीन पिढीला समजावा यासाठी श्री राम मंदिर(Ram Temple) ट्रस्टनं पुढाकार घेतला आहे.  यासाठी ट्रस्टनं निर्मिते प्रसून जोशी यांनी राममंदिर(Ram Temple) इतिहास आणि उभारणी अशा आशयाची कथा लिहायला सांगितली आहे.  यामध्ये राममंदिराचा 500 वर्षाचा इतिहास मांडण्यात येणार असून, राममंदिरासाठी झालेल्या संघर्षाची गाथाही यात असणार आहे.अयोध्येतील राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भाविकांसाठी तयार होईल.  हे राममंदिर तयार करण्याची अनेक पिढ्यांनी बलिदान दिले आहे.  या सर्वांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात येणार आहे.  त्याद्वारे नव्या पिढीलाही जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  

अयोध्येतील राममंदिराच्या(Ram Temple) उभारणीचा बांधकामाचा आढावा घेत आहेत. मंदिर ट्रस्ट्रतर्फेही मंदिर भक्तासाठी डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, असं जाहीर केलं आहे.  त्यामुळे अगदी कोरोना आणि आता झालेल्या वादळी पावसाच्या फटक्यानंतरही मंदिराच्या कामात कुठेही हयगय केली जात नाही.  मंदिरासाठी राजस्थानवरुन खास प्रकारचा दगड मागवण्यात येत आहे.  मात्र राजस्थानमध्येच या दगडावर कोरीव काम करुन तो मंदिरस्थळी आणण्यात येत आहे.  यामुळे मंदिर उभारणीतील वेळ वाचला जात आहे.  अशाचप्रकारे मंदिराच्या उभारणीमध्ये कामाची विभागणी करण्यात आली आहे.   त्यातून मंदिराचे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास ट्रस्ट्रला आहे.

हे सर्व काम अंत्यंत नियोजनबद्धरित्या होत आहे.   या सर्व कामावर दूरदर्शन चित्रपट सादर करणार आहे. चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य प्रसून जोशी कथा तयार करत आहेत.  त्यांच्यासोबत 6 सदस्य काम करत आहेत.  चित्रपटात मंदिराचा 1528 सालापासूनचा इतिहास मांडण्यात येणार आहे.  राम मंदिर निर्माण समितीच्या दोन दिवसीय बैठकीत या चित्रपटावर चर्चा झाली. निर्मिती समिती आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या चित्रपटाला मान्यता दिली आहे.  श्रीराम मंदिरावर होणा-या या चित्रपटात, मंदिर उभारणीसाठी झटणारे अभियंत,  राममंदिर ट्रस्ट्रचे पदाधिकारी आणि काही पत्रकारांचीही मते विचारात घेतली जाणार आहेत,  तसेच त्यांनाही या चित्रपटामध्ये घेण्यात येणार आहे.  

========

हे देखील वाचा : अमेरिकेतील ‘हा’ अभिनेता झाला चक्क १० मुलांचा बाबा

========

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी या चित्रपटामुळे नव्या पिढीला जोडण्यात येईल असे सांगितले. चित्रपट निर्मितीचे समन्वय इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सचिव सच्चिदानंद जोशी करणार आहेत. अयोध्या राज घराण्याचे युवराज आणि देशातील प्रसिद्ध लेखक यतींद्र मिश्रा हे देखील  या चित्रपटांच्या निर्मितीसाठी सहकार्य करणार असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली.  या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत, जे अनेक दशकांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या चाणक्य मालिकेचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.

सध्या अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या (Ram Temple) उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  मंदिराचा मुख्य मंडप 15 फूट उंच पाच थरांमध्ये तयार करण्यात आला आहे. याच्यावर मुख्य मंदिराच्या दगडांचा थर सुमारे 15 फूट उंच करण्यात आला आहे.  मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम जूनपासून सुरू झाले आहे.आता त्याचे संगमरवरी खांब उभे राहिले आहेत.  श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी अंदाजे 1,800 कोटी रुपये खर्च होणार आहेत.  मंदिराच्या आवारात प्रमुख हिंदू संत आणि रामायण काळातील मुख्य पात्रांच्या मूर्ती ठेवण्याचा निर्णयही ट्रस्टने घेतला आहे. त्यासाठी राजस्थानसोबत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील खदानींमधून दर्जेदार ग्रॅनाइट दगड खरेदी करण्यात आले आहेत.  राम मंदिराचे 45 टक्के काम पूर्ण झाले असून तळमजल्यावर मंदिरासह नृत्य मंडप, रंगमंडप आणि गुण मंडप आणि सिंह द्वार बांधले जात आहे. रामललाच्या मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाल्यानंतर 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी या भव्य मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे.

मंदिर बांधकाम क्षेत्र आणि त्याच्या प्रांगणाच्या क्षेत्रासह एकूण 8 एकर जागेत एक आयताकृती दुमजली प्रदक्षिणा मार्ग तयार केला जाणार आहे. याच्या पूर्वेला असलेले प्रवेशद्वार वाळूच्या दगडापासून बनवले जाणार आहे.  मंदिराचा तळमजल्यापासून 18 फूट उंच असून त्याची रुंदी 14 फूट असेल. नवरात्रीनंतर उद्यानाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.  या सर्वांचा सहभाग चित्रपटात असणार आहे.

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.