ब्रिटनमध्ये 6 मे रोजी राजा चार्ल्स (King Charles) यांचा राज्यभिषेक होत आहे. या राज्यभिषेकानिमित्तानं अवघ्या इंग्लडमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सजावट करण्यात आली आहे. या राज्यभिषेकाचा एक भाग म्हणूनच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण याचा शोध घेण्यात आला. याचे उत्तर राजा चार्ल्स (King Charles) असे हवे होते. मात्र राजा चार्ल्स यांना मागे टाकत त्यांची सूनबाई, प्रिन्सेस केट मिडलटन राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती ठरली आहे. तर राजा चार्ल्स यांची धाकटी सूनबाई मेगन मार्कल हिला इंग्लडच्या नागरिकांनी नापसंत केले आहे. कॅमिला यांनाही राज्याभिषेकाच्या दरम्यान राणीपदाचा मान मिळणार आहे. पण सर्वेक्षणानुसार अद्यापही कॅमिला या पदासाठी नागरिकांना योग्य वाटत नाही. त्यांच्या मते ही जागा चार्ल्स यांची पहिली पत्नी लेडी डायनाची होती.
ब्रिटनमध्ये 6 मे रोजी राजा चार्ल्स (King Charles) आणि राणी कॅमिला यांच्या राज्याभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. चार्ल्स आणि कॅमिला राज्यभिषेकाच्या दिवशी बकिंगहॅम पॅलेसमधून वेस्टमिन्स्टर अॅबी येथे पोहोचतील. हा सोहळा जगभर थेट पाहता येणार आहे. या सोहळ्याची तयारी सुरु असतानाच त्यासाठी आवश्यक अशा अन्य कार्यक्रमांचे आयोजन राजघराण्यात सुरु झाले आहे. तसेच विशेष आमंत्रितांचे आगमनही सुरु झाले आहे. याच दरम्यान राजघराण्यात सर्वाधिक लोकप्रिय सदस्य कोण असा अहवालही काढण्यात आला. त्यात इंग्लडमधील जनतेची मते घेण्यात आली. या अहवालात राजघराण्याची मोठी सून प्रिन्स विल्मयमची पत्नी केट मिडलटन ही पहिल्या क्रमांकावर असून राजा चार्ल्स (King Charles) यांचा द्वितीय पुत्र राजकमार हॅरी याची पत्नी मेगन मार्कल शेवटच्या क्रमांकावर आहे. इंग्लडच्या नवीन राजाच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणानं मात्र खळबळ उडाली आहे. या सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, 49% ब्रिटनचा असा विश्वास आहे की, राजा चार्ल्स (King Charles) चांगले काम करत आहेत. राजा चार्ल्स (King Charles) यांच्यापेक्षा प्रिन्स विल्यमची पत्नी केट मिडलटनला जास्त गुण मिळाले आहेत. केट ही सर्वाधिक लाडकी असून ती इंग्डजच्या जनतेसाठी जास्त काम करत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केट राजघराण्यातील सर्वाधिक पसंतीची सदस्य म्हणून समोर आली आहे. इप्सॉस या संस्थेनं केलेल्या दुसर्या सर्वेक्षणातही केट मिडलटनला सर्वात जास्त पसंत केले गेले. केट नंतर अन्य सदस्यांचा नंबर लागला आहे. केट नंतर प्रिन्स विल्यम आणि किंग चार्ल्सची बहीण राजकुमारी अॅन यांना रेटिंग देण्यात आले आहे. या सर्वेक्षणात प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल यांना जवळपास लोकांनी नाकारलेच आहे. धक्कादायक म्हणजे, राजा चार्ल्सची दुसरी पत्नी, कॅमिला हिलाही इंग्लडच्या नागरिकांनी नाकारले आहे. 6 मे रोजी राजा चार्ल्स यांच्यासोबत कॅमिलाही क्वीन कॉन्सॉर्ट होणार आहे. पण इंग्लडच्या बहुतांशी नागरिकांच्या मते कॅमिला या पदासाठी योग्य नाही.
========
हे देखील वाचा : राममंदिरात प्रभू रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर
========
गेल्या आठवड्यातच माजी राणी एलिझाबेथ यांचा 97 वा वाढदिवस होता. यावेळी प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटनने राणी एलिझाबेथचा एक अनोखा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये राणी तिच्या सर्व नातवंडासोबत दिसत आहे. हे चित्र राणी एलिझाबेथच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी, गेल्या वर्षी बालमोरल येथे कौटुंबिक सहलीदरम्यान काढण्यात आले होते. हे चित्र शेअर केल्यावर केटला इंग्लडच्या नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत. राणी एलिझाबेथचा वारसा केटच चालवू शकते अशीही पोस्ट काही नागरिकांनी या फोटोवर व्यक्त केली होती. दरम्यान इंग्लडमध्ये राज्यभिषेकाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकात सहा हजार ब्रिटिश सैनिक सहभागी होणार आहेत. गेल्या 70 वर्षांतील ब्रिटनमधील सैन्याची ही सर्वात मोठी तैनाती असेल. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 6 मे रोजी ब्रिटीश युद्धनौका आणि देशभरातील लष्करी तळांवरून नव्या राजाला तोफांची सलामी दिली जाणार आहे. यानंतर दुसऱ्या महायुद्धातील लष्करी विमान ‘स्पिट फायर’ आणि आधुनिक लढाऊ विमानेही राजाला अभिवादन करणार आहेत. वास्तविक, ब्रिटनमध्ये केवळ राजा किंवा राणी हे सशस्त्र दलांचे कमांडर इन चीफ असतात. राजाच्या राज्याभिषेकात केवळ ब्रिटीशच नाही तर 35 राष्ट्रकुल देशांचे सैनिकही सहभागी होणार आहेत.
सई बने