पॅरिसमधल्या लूव्हर म्युझियमला जगातील सर्वात सिक्युर म्युझियम मानलं जायचं, पण १९ ऑक्टोबर २०२५ च्या सकाळी ४ जणांनी मिळून फक्त ८ मिनिटांत या म्युझियमधून तब्बल ८९६ कोटींच्या मौल्यवान गोष्टी चोरल्या आणि तेही दिवसाढवळ्या… कोणतंही हत्यार वापरलं नाही तरी त्यांनी इतकी मोठी चोरी कशी केली ? (True Crime Story)
तर १९ ऑक्टोबर २०२५ सकाळ होती , पॅरिस शहरात लूव्र म्युझियम नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता लोकांसाठी उघडलं. जगभरातून आलेले पर्यटक तिथे होतेच, गार्ड्स आपापल्या जागेवर उभे होते, सगळं रुटीनच चाललं होतं. पण म्युझियमच्या दुसऱ्या बाजूला, रिव्हर सेनला लागून असलेल्या भिंतीजवळ,काहीतरी वेगळंच सुरू होतं. एक ट्रक येऊन थांबला – असा ट्रक जो फर्निचर वरच्या मजल्यावर नेण्यासाठी वापरतात, पोहोचवण्यासाठी वापरला जातो, तो म्युझियमच्या भिंतीजवळ येऊन थांबला. या ट्रकवर एक मेकॅनिकल लिफ्ट बसवलेली होती. पण ना या ट्रकला फर्निचर वर चढवायचं होतं आणि ना त्यात बसलेले लोक शिफटिंग करणारे होते. (Trending News)
ट्रकमध्ये असलेल्या गँगमध्ये एकूण चार जण होते. सगळ्यांनी पिवळ्या-नारंगी रंगाच्या वेस्ट घातल्या होत्या, जसं कन्स्ट्रक्शन करणारे लोकं घालतात. पण यांचे चेहरे मात्र मास्कने झाकलेले होते. त्यातल्या दोघांनी एक क्षणही वाया न घालवता मेकॅनिकल लिफ्टचं एक्स्टेंशन केलं म्युझियमच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीपर्यंत. ही साधी-सुधी बाल्कनी नव्हती ती म्युझियमच्या सर्वात भव्य आणि ऐतिहासिक भागाची बाल्कनी होती. जिला गॅलरी ऑफ अपोलो म्हणतात. याच गॅलरीत फ्रान्सच्या राजघराण्याचे मौल्यवान शाही वस्तु ठेवलेल्या होत्या. पण आत जायला एक अडचण होती काचेची जाडजूड भिंत. या दोघांनी बॅगमधून एक डिस्क कटर काढलं आणि आणि काहीच सेकंदात गॅलरीच्या काचेत भोक पाडून ते आत शिरले. हे सगळं इतक्या पटापट घडलं की सिक्योरिटी गार्ड्सना याची कल्पना नव्हती. पण या हालचालीमुळे म्युझियमचा सिक्योरिटी अलार्म वाजला आणि गॅलरीत असलेल्या गार्ड्सनी चोरांना पाहिलं. पण चोरांना कसलीच भीती वाटत नव्हती. त्यांनी गार्ड्सना पॉवर टूल्स दाखवून धमकावलं आणि डिस्प्ले केसेसचे काच फोडायला सुरुवात केली. (True Crime Story)

आत पर्यटक होते त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गार्ड्सनी प्रोटोकॉल फॉलो करत पर्यटकांना बाहेर काढायला सुरुवात केली. लोकांना समजत नव्हतं की काय घडतंय. जेव्हा पोलिस आणि स्टाफ मेंबर्स घाबरलेल्या लोकांना म्युझियमबाहेर काढण्यात बिझी होते. त्या दोन चोरांनी एकदम शांतपणे गॅलरीत असलेल्या डिस्प्ले केसेसच्या काचा फोडल्या, नऊ मौल्यवान खजिने उचलले आणि मग त्या कापलेल्या काचेतून बाहेर पडून बाल्कनीत गेले. तिथे खाली त्यांचे दोन साथीदार आता स्कूटर्सवर त्यांची वाट पाहत होते. ते लिफ्टच्या जिन्यांनी धावत खाली उतरले, स्कूटर्सवर बसले आणि तिथून पळून गेले. कोणालाही काही समजण्या आधी त्यांनी ८२० कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तु लंपास केल्या. (Trending News)
पोलिसांच्या मते चोर म्युझियमच्या आत फक्त चार मिनिटं होते आणि पूर्ण ऑपरेशन म्हणजे ट्रक पार्क करणं, स्टेअर्स एक्स्टेंड करणं, काच कापणं आणि चोरी करून पळून जाणं. यात फक्त आणि फक्त आठ मिनिटांचा वेळ लागला. जाताना त्यांनी लिफ्टच्या ट्रकला आग लावण्याचा प्रयत्नही केला जेणेकरून पोलिसांना ट्रकवर कोणतेही पुरावे किंवा फिंगरप्रिंट्स मिळू नयेत. पण म्युझियमच्या एका स्टाफ मेंबरने धाडस करून त्यांना अडवलं. त्यांनी ट्रक जाळला नाही पण ते पळून गेले. (True Crime Story)
आता सवाल त्यांनी ८ मिनिटांत काय चोरलं होतं? पोलिस आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या मते लूव्ह म्युझियममधून एकूण आठ मौल्यवान गोष्टी चोरीला गेल्या होत्या. पण पळताना त्यांच्याकडून एक गोष्ट रस्त्यावरच पडली. १७० वर्ष जुना एम्प्रेस युजिनीचा Crown. जो नपोलियन थ्रीची बायको युजिनी हिच्यासाठी खास १८५५ मध्ये बनवलेला. आता त्या crown वर खूप स्क्रॅचेस पडले होते. बाकीच्या ज्या आठ वस्तू गेल्या त्यात होत्या: Empress Eugénie ची एक सुंदर Tiara आणि एक Brooch, नपोलियन बोनापार्टची दुसरी बायको एम्प्रेस मेरी लुईजचा Necklace आणि त्याच सेटच्या Earrings, क्वीन मेरी अमेली आणि क्वीन Hortense सॅफायर सेट मधील एक टियारा, Necklace आणि Earrings. त्यात एक खास ब्रोच ज्याला रेले क्वेरी ब्रोच.
हे सर्व फक्त दागिने नव्हते तर फ्रान्सच्या रॉयल हिस्ट्रीचा भाग होते. या सर्व गोष्टींच्या फक्त किंमत १०२ मिलियन डॉलर्स म्हणजे ८९६ कोटी डॉलर्स इतकी होती, पण राजघराण्याची ऐतिहासिक वारसा म्हणून ते खरंतर प्राइसलेस! आश्चर्याची गोष्ट ही होती की चोरांनी त्या गॅलरीत असलेल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टींना हातही लावला नाही. जसं की तिथला जगप्रसिद्ध रीजेंट डायमंड ज्याची एकट्याची किंमत 522 कोटी ते 530 कोटी होती. याशिवाय सॅन्सी आणि हॉर्टेंशिया नावाचे डायमंड्सही तिथे ठेवलेले होते. पण चोरांनी त्याला दुर्लक्षित केलं. याच कारणामुळे असं मानलं जातंय की त्या चोरांना खास ऑर्डर होती की हेच चोरलं जावं. (True Crime Story)
पण प्रश्न निर्माण होतो की जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध म्युझियम जिथे दरवर्षी कोट्यवधी लोक येतात. इतकी सिक्योरिटी असतानाही नेमकी कुठे चूक झाली? तपासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या. म्युझियमच्या त्या भागात जिथे चोरी झाली तिथे प्रत्येक तीन खोल्यांपैकी एका खोलीत सीसीटीव्ही कॅमेराच नव्हता. जे बाहेरील कॅमेरे लावलेले होते तेही त्या बाल्कनीला पूर्णपणे कव्हर करत नव्हते जिथून चोर काच कापून आत शिरले. (Trending News)
पण याहून मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा फ्रेंच सेनेटची मेंबर नॅटली गूले यांनी मीडियाला सांगितलं की जो अलार्म वाजला तो खरं तर म्युझियमचा जनरल अलार्म होता. त्या बाल्कनीत एक लोकलाइज्ड अलार्म सिस्टमही लावलेली होती पण ती काही दिवसांपूर्वीच खराब झाली होती. जर तो अलार्म नीट असता तर सिक्योरिटीला बाल्कनीत चोर शिरलेत हे लवकर कळालं असतं. म्युझियम डायरेक्टरने सिक्युरिटी फेलियर मान्य करून कल्चर मिनिस्ट्रीला राजीनामा दिला, पण तो स्वीकारला नाही.
================
हे देखील वाचा : Rohit Arya : १७ मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य आहे तरी कोण? काय आहे संपूर्ण प्रकरण
================
ही लूट फ्रान्सच्या म्युझियम सिक्युरिटीवर मोठा प्रश्नचिन्ह! आणि हे पहिलं नाही. १९११ मध्ये म्युझियममधुन मोना लिसाची पेंटिंगहीचोरी झाली होती – एका जुन्या कर्मचाऱ्याने कोटखाली कोटच्या खाली लपवली आणि सहज बाहेर पडला. दोन वर्षांनी ती पेंटिग इटलीत सापडली. यानंतर १९७६ मध्ये याच म्युझियममधून किंग चार्ल्स दहाव्याची तलवारही चोरी झाली होती. तीन चोरांनी म्युझियमची खिडकी तोडली आणि आत घुसून किंग चार्ल्स दहाव्याची तलवार चोरली जी आजपर्यंत सापडली नाही. १९९८ मध्ये एक पेंटिंग फ्रेममधून काढून दिवसाढवळ्या नेली गेली होती, तीही आजपर्यंत बेपत्ता आहे. आता २७ वर्षांनंतर ही घटना.
आता तपास सुरू आहे ६० ते १०० पेक्षा जास्त इन्व्हेस्टिगेटर्स काम करतायत. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे — आणि असं दिसतं की हे लोक या लुटीशी खोलपणे जोडलेले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे १५० DNA सॅम्पल आणि फिंगरप्रिंट्स गोळा केले होते — हे सॅम्पल्स चोरांच्या वस्तूंवरून घेतले गेले होते, जसे हेल्मेट, ग्लोव्हज आणि ट्रकच्या आतून. बाकीचे चोर आणि मास्टरमाइंड सुद्धा लवकरच पकडले जातील किंवा ही बातमी तुमच्यापर्यंत पोहचेपर्यंत त्यांना अटकसुद्धा झालेली असेल.
