Thailand : थायलँडमध्ये ‘थाय मसाज’ ही एक प्राचीन आणि प्रभावी उपचारपद्धत म्हणून ओळखली जाते. संपूर्ण जगभर याला लोकप्रियता मिळाली असून, ही पद्धत केवळ शरीराच्या वेदनांवर उपाय म्हणूनच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त मानली जाते. पण या शास्त्राची मूळ सुरुवात कुठून झाली? यामागे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे .डॉ. शिवगो कोमारपाज (Dr. Jivaka Kumarabhacca), ज्यांना थाय मसाजचे जनक मानले जाते. त्यांचा शोध, ज्ञान आणि वैद्यकीय कार्याची थायलँडमध्ये फार मोठी छाप पडली आहे.
डॉ. शिवगो यांचा इतिहास आणि आयुष्य:
डॉ. शिवगो यांचा जन्म इ.स. पू. ५व्या शतकात भारतात झाला होता. त्यांचा उल्लेख अनेक पाली ग्रंथांमध्ये आढळतो. ते भगवान गौतम बुद्धांचे वैद्य आणि निकटवर्तीय शिष्य होते. त्यांनी आयुर्वेद, हर्बल औषधी, योग आणि शारीरिक उपचारपद्धती यांचा सखोल अभ्यास केला होता. डॉ. शिवगो हे त्याकाळचे अत्यंत कुशल, करुणामय आणि विज्ञाननिष्ठ वैद्य होते. त्यांचे ज्ञान इतके प्रगल्भ होते की, त्यांनी केवळ औषधोपचारच नव्हे, तर शरीराच्या मर्मबिंदूंवर (energy points) काम करून शारीरिक संतुलन कसे राखायचे हे शिकवले.
थाय मसाजचा थायलँडमध्ये प्रवेश:
भारतीय वैद्यकशास्त्र, विशेषतः आयुर्वेद आणि योग, हे बौद्ध धर्मासोबत आशियाई देशांमध्ये प्रसारित झाले. बौद्ध भिक्षूंनी भारतातून थायलँडकडे प्रवास केला आणि त्यांच्या सोबत डॉ. शिवगो यांचे वैद्यकीय ज्ञानही पोहोचले. थायलँडमध्ये हे ज्ञान तात्कालिक पद्धतीने विकसित झाले आणि ‘नुवात फेन बोरान’ (Nuad Thai or Traditional Thai Massage) या नावाने ओळखले जाऊ लागले. थाय मसाजमध्ये प्राचीन भारतीय आयुर्वेद आणि चिनी उपचारशास्त्राचा प्रभाव आढळतो. हे मसाज केवळ स्नायूंना आराम देण्यासाठी नाही, तर शरीरातील जीवनशक्ती (प्राण किंवा “सेन लाईन”) संतुलित करण्यासाठी वापरले जाते.

Thailand
थाय मसाजची तत्त्वे आणि डॉ. शिवगो यांचा प्रभाव:
थाय मसाजमध्ये शरीराचे विशिष्ट बिंदू (pressure points), ताठ शरीरावस्था (stretching) आणि संपूर्ण शरीराचा सुसंगत प्रवाह लक्षात घेतला जातो. ही पद्धत म्हणजे योग, अॅक्युप्रेशर आणि ध्यान यांचे संमिश्र रूप आहे. डॉ. शिवगो यांच्या तत्त्वज्ञानात “शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन” हा प्रमुख आधार होता. त्यांनी ज्या प्रकारे शरीराच्या मर्मबिंदूंवर उपचार करण्याची पद्धत शिकवली, त्याचा थाय मसाजमध्ये थेट प्रभाव आहे. त्यामुळे थायलँडमधील पारंपरिक वैद्यकीय शिक्षणात आजही डॉ. शिवगो यांना “Father Doctor” किंवा “The King of Doctors” म्हणून मान दिला जातो.(Thailand)
थायलँडमध्ये डॉ. शिवगो यांचा सन्मान आणि वारसा:
थाय मसाज शिकवणाऱ्या शाळांमध्ये आणि मंदिरांमध्ये डॉ. शिवगो यांचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्या जातात. मसाज करण्यापूर्वी त्यांच्या नावाने प्रार्थना केली जाते. वॉट फो (Wat Pho) हे बँकॉकमधील एक प्रसिद्ध बौद्ध मंदिर आहे जेथे पारंपरिक थाय मसाज शिकवले जाते आणि येथे डॉ. शिवगो यांचे स्मारक आहे. याच ठिकाणी थाय मसाजचे शास्त्र लेखी स्वरूपात कोरलेले असून, युनेस्कोने या परंपरेला ‘Intangible Cultural Heritage’ म्हणून मान्यता दिली आहे.
===========
हे देखील वाचा :
World War-I History : राजकुमार फ्रांज फर्डिनेंड यांच्या हत्येने सुरू झाले होते महायुद्ध?
Nelson Mandela : नेल्सन मंडेला यांना अमेरिका का घाबरायची? वाचा कारणे
Akbar : अकबर महान होता की क्रूर? वाचा त्याच्या व्यक्तीमत्वाचे किस्से
============
थायलँडमधील थाय मसाज ही केवळ एक उपचारपद्धत नाही, तर ती एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. यामागे भारतीय वैद्य डॉ. शिवगो यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांनी वैद्यकशास्त्राच्या माध्यमातून शरीर आणि मन यांच्यामध्ये संतुलन साधण्याचा मार्ग दाखवला. त्यांचे शास्त्र आजही थायलँडमध्ये जगले जाते, सन्मानले जाते, आणि जागतिक स्तरावर पसरले आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics