Home » Temba Bavuma : हाईटवरून डिवचलं तरी भाऊ ऑस्ट्रेलियाला नडला !

Temba Bavuma : हाईटवरून डिवचलं तरी भाऊ ऑस्ट्रेलियाला नडला !

by Team Gajawaja
0 comment
Temba Bavuma
Share

तो साऊथ आफ्रिकेतल्या एका लंगा नावाच्या छोट्याशा गावात जन्मलेला, आफ्रिकेतली हॅमनस्क्राल ही त्याची कम्युनिटी,आजीने नाव ठेवलं होतं ‘टेंबा’… झुलू भाषेत टेंबाचा अर्थ होतो विश्वास… एकंदरीत हे पोरगं आपली बिकट परिस्थिती दूर करेल, असा विश्वास आजीला वाटत असावा. त्यावेळी साउथ आफ्रिका थोडीफार प्रगती करायला लागला होता. त्यात आफ्रिकन लोकांना क्रिकेटचं वेड १०० वर्षांपासून, त्यामुळे झोपडी असो वा बंगला पोर बॅट आणि बॉलसोबत दिसायची… आपल्या भारतातल्या गल्ल्यांसारखं… टेंबासुद्धा रस्त्यावरच क्रिकेट खेळायचा. ते ज्या रस्त्यांवर क्रिकेट खेळायचे, त्या रस्त्यांना त्यांनी स्टेडियमची नावं दिली होती. एका रस्त्याला कराची नॅशनल स्टेडियम, दुसऱ्याला MCG तर तिसऱ्याला लॉर्ड्स… लॉर्ड्स लहानपणापासून त्याचा फेव्हरेट…

त्यामुळे याचं लॉर्ड्सच्या रस्त्यावर मन रमायचं. टेंबा म्हणायचा की एक दिवस मीसुद्धा लॉर्ड्सवर खेळणार आणि काय… ज्या मुलाला त्याच्या हाईटवरून सतत हिणवलं गेलं, ज्याला वशिल्यावर क्रिकेटमध्ये आलाय असं म्हटलं गेलं, ज्याच्यासोबत वर्णभेद केला गेला, त्याच्यासाठीच टाळ्या वाजवायला अक्खं लॉर्ड्स आज उठून उभा राहिला होता. हाच तो आयकॉनिक फोटो… ही गोष्ट आहे साउथ आफ्रिकेला पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनवून देणाऱ्या आणि चोकर्सचा टॅग कायमचा पुसणाऱ्या जॉन द डॉन टेंबा बावुमाची ! (Temba Bavuma)

टेंबा जन्मला, तेव्हाच त्याच्या कुटुंबियांना कळलं की याची हाईट फार वाढणार नाही. त्यामुळे त्यांनी त्याची हाईट वाढवण्यासाठी डॉक्टर वगैरे केले. पण या गोष्टी घरच्यांना परवडण्यासारख्या नव्हत्या. साऊथ आफ्रिकेत आपल्याला दोन्ही वर्णाची माणसं पाहायला मिळतात. म्हणजे गोऱ्या वर्णाचीसुद्धा आणि कृष्णवर्णीय पण… पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे कृष्णवर्णीय लोकांनी इतिहासात किती Racism झेललं आहे. शाळेत त्याच्यासोबत असे Racism चे प्रकार खूप घडायचे. त्यात हाईट नव्हती. पण पोट्ट्याला क्रिकेट खूप आवडायच. आपला गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर त्याचा आयडॉल… आणि असलाही पाहिजे, कारण सचिनने जेव्हा पाकिस्तानसमोर टेस्ट डेब्यू केलं होतं, तेव्हा त्यालाही हाईटवरून हिणवलं गेलं होतं आणि नंतर त्याने काय पराक्रम करून ठेवलाय हे अक्खं जग पाहतोय. बावुमाला हाईटचा एडव्हाँटेज नव्हता पण त्याचा गेम क्लासिक होता. त्यामुळे सोवेटो क्रिकेट क्लबचे कोच जॉफ्री टोयाना यांनी त्याचा गेम हेरला, आणि टेंबाला आपल्या क्लबमध्ये घेतलं. इथे तो प्रोफेशनल क्रिकेट शिकला. सचिनसारखाच स्ट्रेट ड्राईव्ह त्याला आवडायचं. क्लबमध्ये त्याला क्रिकेटर म्हणून एक शेप मिळाला आणि तो क्रिकेटच्या पुढच्या टप्प्यात उतरला ते म्हणजे लीग आणि डोमेस्टिक क्रिकेट…(Top Stories)

Temba Bavuma

वयाच्या १८ व्या वर्षी तो ग्वाटेंग टीमकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आला. चांगला पर्फोर्मंस त्याने दिला आता पुढची स्टेप होती… International Cricket… तसं साउथ आफ्रिकेचा इतिहास पहायचा झाला तर ब्लॅक आफ्रिकन क्रीकेटर खूपच कमी खेळलेले आहेत… टेंबाच्या आधी एक legendry फास्ट बॉलर साउथ आफ्रिकेच्या टीममध्ये होता तो म्हणजे मखाया एनटिनी… त्याने ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटर्सना साउथ आफ्रिकन टीममध्ये संधी उपलब्ध करून दिली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्या नंतर मग टेंबा आला… मग कगीसो रबाडा, लुंगी एनगिडी, एन्डील फेलूकवायो असे ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटर्स टीममध्ये आले. मखाया एनटिनीनंतर तितकासा सन्मान कोणत्याही ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटरला मिळाला नव्हता. पण टेंबा ने सगळेच barriers मोडून काढले. २०१४ ला त्याने साउथ आफ्रिकन टीममध्ये डेब्यू केलं. आता त्याच्या येण्यासोबत कोणकोणत्या गोष्टी घडल्या बघा… टेंबा हा साउथ आफ्रिकाकडून टेस्ट खेळणारा पहिला batsmen आणि दुसरा ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटर ठरला. त्यातच २०१६ साली इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकून तो असाही पराक्रम करणारा पहिला ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटर ठरला. (Temba Bavuma)

२०१६ मध्येच त्याने वनडे डेब्यू केलं, त्यानंतर २०१९ मध्ये इंडियाविरुद्ध तो टी २० मध्येही उतरला. तसं त्याचं करिअर संथ गतीने चालत होतं. त्यातच त्याच्यावर एक tag लागला म्हणजे वशिल्यावर साउथ आफ्रिकेच्या टीममध्ये त्याला जागा मिळाली. त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित व्हायला लागले. त्यावेळी साउथ आफ्रिकेच्या टेस्ट टीमचा captain होता क्विंटन डीकॉक… बावूमाविरुद्ध इतकं सगळ कारस्थान शिजत असताना अचानक टेंबा बावूमाचं नाव थेट साउथ आफ्रिकेच्या कॅप्टनशिप वर आलं. इतकच काय तर तो कॅप्टन झाला आणि साउथ आफ्रिकेच्या १३६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिला black आफ्रिकन कॅप्टन होण्याचा बहुमान त्याने मिळवला. आता इथे त्याला एक वेगळी ओळख मिळू लागली होती. वनडे आणि टी२० मध्ये त्याचा नेतृत्वात साउथ आफ्रिकेचा पर्फोर्मंस इतका खास राहिला नाही. पण टेस्टमध्ये तो अनबीटन राहिला, ते पुढे सांगतो…(Top Stories)

तर टेंबा समोर सर्वात मोठ आव्हान होतं, ते म्हणजे २०२३ चा क्रिकेट वर्ल्ड कप… लीग स्टेजमध्ये साउथ आफ्रिकेचा पर्फोर्मंस जबरदस्त राहिला. त्यांनी ९ मधल्या ७ मॅची जिंकल्या. पण या सर्वातटेंबा चा परफॉर्मन्स तितका खास राहिला नाही. इतकच काय तर त्याला खराब खेळीमुळे दोन match बसावं लागलं होतं. साउथ आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचली. पण कांगारूंकडून त्यांचा पराभव झाला. इथे पुन्हा एकदा टेंबाला troll केलं गेलं. त्याच्या हाईटवरून त्याला डीवचलं गेलं. इतकच काय २०२४ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये त्याला टीममध्ये जागासुद्धा मिळाली नाही. त्यातच फायनलमध्ये इंडियाकडून पराभव झाल्यामुळे नॉक out matches मधला त्यांचा चोकर्सचा tag कायमच राहिला. पण तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक शेर म्हटला होता ना.. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूँ. लौटकर वापस आऊँगा !(Temba Bavuma)

===============

हे देखील वाचा : पाकिस्तानला वारंवार कर्ज कसे मिळते? जागतिक संस्थांची मजबुरी काय?

===============

टेंबानेही comeback केलं आणि साउथ आफ्रिकेनेही. त्यात वर्ल्ड टेस्ट championship च्या फायनलमध्ये जागा मिळवण्याचा साउथ आफ्रिकेचा फक्त ३८ टक्के चान्स होता. पण काय चमत्कार झाला माहित नाही, प्रोटीआजनी थेट फायनल गाठली. आता समोर होते मायटी ऑस्ट्रेलीयन्स आणि क्रिकेटचा मक्का असलेलं lords चं स्टेडीयम… ज्या lords मध्ये खेळण्याचं स्वप्न टेंबा बावूमाने लहानपणी पाहिलं होतं. त्याच lords मध्ये तो साउथ आफ्रिकाचं नेतृत्व करत होता. तेसुद्धा वर्ल्ड टेस्ट championship च्या फायनलमध्ये… आता kuthe साउथ आफ्रिकेकडे चान्स आला होता आपला चोकर्सचा tag कायमचा मिटवून टाकण्याचा… पण समोर ऑस्ट्रेलियाचे तगडे बॉलर्स… मिचेल स्टार्क, pat कमिन्स आणि जॉश हेजलवूड… यांच्यासमोर टिकाव लागण अवघड होतं. आणि ते दिसूनही आलं. पहिल्या इनिंगमध्ये आफ्रिकेची टीम फक्त १३८ धावांमध्येच तंबूत परतली. कॅप्टन बावूमाने ३६ रन्स जोडले तेव्हढे… त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरी इनिंगमध्ये २०७ रन्स करून साउथ आफ्रिकेसमोर २८२ रन्सचं टार्गेट ठेवलं. सर्वांना वाटलं जी टीम पहिल्या इनिंगमध्ये इतकी ढिली पडली, ती आता नाही टिकू शकणार… पण पुन्हा एकदा lord बावूमा टीमसाठी धावून आला, तेही पायाला cramp आलेला असूनसुद्धा… त्याला पार्टनरशिप मिळाली, एडन मार्कमची ज्याने lords वर ऐतिहासिक सेंच्युरी करून दाखवली.(Top Stories)

अखेर साउथ आफ्रिका जिंकला. १३६ वर्षात पहिल्यांदा वर्ल्ड champion होण्याचा आनंद काय असतो, ते त्यांच्या सेलेब्रेशनमध्ये दिसत होतं. त्यात २७ वर्षांनी आयसीसी टायटल त्यांच्याकडे आलं.तो ना कोणत्या रोल मॉडेलसारखा देखणा होता, त्यात ठेंगणा, कसलाही PR त्याच्याकडे नव्हता, ना तो कोणत्या सुपरस्टार कल्चरचा भाग होता… हा तोच आहे ज्याने हाईटवरून बऱ्याच लोकांची बोलणी खाल्ली, हा तोच आहे ज्याला वशिल्यावर क्रिकेट खेळायला मिळालं, असं हिणवल गेलं आणि हा तोच आहे जो RACISM चा शिकार ठरला. पण त्याने दाखवून दिलं की जॉन द डॉन काय करू शकतो.(Temba Bavuma)

जी गोष्ट GRAMI स्मिथ, jack कॅलीस, एबी डिव्हीलीयर्स, mark बाउचर, फाफ डूप्लेसीस यांच्या नेतृत्वात नाही होऊ शकली, ती टेंबा बावूमाने करून दाखवली. एका ब्लॅक आफ्रिकन क्रिकेटरने साउथ आफ्रिकेला आपलं पहिलं वर्ल्ड टायटल जिंकवून दिलं. १५० वर्षांपूर्वी साउथ आफ्रिकेवरही ब्रिटीशांचं राज्य होतं आणि ते या ब्लॅक आफ्रिकन लोकांना आपला गुलाम बनवून ठेवत होते आणि १५० वर्षांनी एका ब्लॅक आफ्रिकनसाठी टाळ्या वाजवायला संपूर्ण ब्रिटीशांचा ताफा उठला… कारण तो टेंबा होता, ज्याचा अर्थ आहे विश्वास !


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.