Home » Truecaller नव्हे तर ‘या’ ट्रिकने ओळखता येईल तुम्हाला कोण फोन करतेय

Truecaller नव्हे तर ‘या’ ट्रिकने ओळखता येईल तुम्हाला कोण फोन करतेय

ट्रुकॉलरशिवाय तुम्हाला अज्ञात क्रमांकावरून आलेल्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊ शकता. यासाठी एक खास ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....

by Team Gajawaja
0 comment
technology tips
Share

Technology Tips :  डेटा चोरीचा आरोप लावत ट्रुकॉलरवर अॅप  (Truecaller App) बहुतांशजणांनी आपल्या फोनमधून डिलिट केला. मात्र हा अॅप डिलिट केल्यानंतर आता अज्ञात क्रमांकावर कोण फोन करतेय हे कळणार कसे असा प्रश्नही काहींना पडतो. यासाठी एक खास ट्रिक आहे.

अज्ञात क्रमांकाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी ट्रुकॉलरऐवजी तुम्ही युपीआय अॅप आणि टेलिग्रॅमच्या माध्यमातूनही ही ट्रिक वापरू शकता. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर….

युपीआयच्या माध्यमातून कसे ओळखाल?
तुमच्या मोबाइलमध्ये ट्रुकॉलर नसल्यास वारंवार अज्ञात क्रमांकावरून कॉल करत असतील तर त्रस्त होऊ नका. पण फोन पे, पेटीएम, गुगल पे किंवा दुसरे कोणतेही युपीआय अॅपचा वापर करत असल्यास याच्या मदतीने तुम्ही अज्ञात क्रमांकावरील व्यक्ती कोण आहे हे तपासून पाहू शकता. यासाठी युपीआय अॅप सुरू करून पेमेंट ऑप्शनमध्ये जाऊन तो क्रमांक टाका. असे केल्यानंतर तेथे अज्ञात क्रमांकावरून आलेल्या व्यक्तीचे नाव दाखवले जाईल.

How to Find Out an Unknown Caller's Number

युपीआयवरून मिळेल योग्य माहिती
काहीवेळेस ट्रुकॉलरवरील लोकांबद्दल योग्य माहिती मिळत नाही. कारण ट्रुकॉलरवर नाव एडिट करण्याचा ऑप्शन असतो. तर युपीआय पेमेंट अॅपवर बँकिंग डिटेल्समुळे व्यक्तीचे योग्य नाव दाखवले जाते. (Technology Tips)

टेलिग्रामचा वापर
युपीआय किंवा ट्रुकॉलरवरून अज्ञात क्रमांकावरील व्यक्ती कोण आहे ते तपासून पाहायचे नसल्यास यासाठी दुसरा ऑप्शनही निवड शकता. यासाठी केवळ तुम्हाला टेलिग्राम अॅप सुरू करून यामध्ये Truecallerjs_bot सुरू करून अज्ञात क्रमांक टाका. असे केल्यानंतर समोरच्या व्यक्तीबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल.


आणखी वाचा:
फुटलेल्या स्क्रिनचा मोबाइल वापरताय? व्हा सावध, अन्यथा…
फोनवर व्हिडीओ, गाणी ऐकताना सतत जाहिरात दाखवली जाते? टाळण्यासाठी करा ही सेटिंग
फ्लाइट रद्द झाल्यानंतर रिफंड मिळलेच पण ‘या’ गोष्टींसाठीही आहात हकदार

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.