Home » बोटाच्या आकाराचा फोन, किंमत फक्त 2 हजार रूपये

बोटाच्या आकाराचा फोन, किंमत फक्त 2 हजार रूपये

तुम्ही आतापर्यंत सर्वाधिक महागडा किंवा प्रीमियम फोनचा वापर केला असेल. पण तुम्ही कधी बोटाच्या आकाराएवढा फोन वापरलाय का?

by Team Gajawaja
0 comment
Technology
Share

Technology :  तुम्ही आतापर्यंत सर्वाधिक महागडा किंवा प्रीमियम फोनचा वापर केला असेल. पण तुम्ही कधी बोटाच्या आकाराएवढा फोन वापरलाय का? खरंतर बोटाच्या आकाराएवढा फोन मार्केटमध्ये खरेदी करू शकता. हा फोन खेळण्यातील नव्हे तर या फोनवरून तुम्ही कॉलही करू शकता. या फोनचे असे काही फिचर्स मिळतात जे सामान्य फोनमध्ये दिलेले असतात.

या लिस्टमध्ये काही ब्रॅण्डचे फोन येतात. खरंतर बोटाएवढे फोन तुमच्या बेसिक गरजा पूर्ण करू शकतात. हे फोन तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

Kechaoda K10
सिंगल सिम फोनध्ये तुम्हाला 0.66 इंचाचा डिस्प्ले दिला जातो. ब्लूथूट कनेक्टिव्हिटीसह व्हायरलेस एफएम (FM) देखील मिळतो. 300mAh ची बॅटरी असणारा हा फोन 21 टक्के डिस्काउंटसह केवळ 1099 रूपयात खरेदी करता येईल.

itel Circle 1 Round Screen Phone
या फोनमध्ये तुम्हाला 500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. या फोनचा डिस्प्ले 1.32 इंचाचा असून रोज गोल्ड रंगाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळतो. याशिवाय फोनमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचरही दिला गेलाय. खरंतर फोनची मुख्य किंमत 1899 रूपये आहे. पण तुम्ही अॅमेझॉनवर हा फोन 21 टक्के डिस्काउंटसह केवळ 1499 रूपयांना खरेदी करू शकता. (Technology)

लक्षात ठेवा, बोटाऐवढे हे फोन केवळ तुमची बेसिक गरज पूर्ण करतात. आजकाल स्मार्टफोनच्या काळात बोटाऐवढ्या फोनमध्ये आधुनिक फीचर्स देण्यात आलेले नाही.

GREENBERRI G370
GREENBERRI G370 या फोनमध्ये तुम्हाला डुअल सिमकार्डचा पर्याय मिळतो. याचे डिझाइन स्लिम आणि स्टाइलिश आहे. ऑटो कॉल रेकॉर्डिंग, व्हायरलेस एफएम, ब्लूटूथ कनेक्टिव्हीसारखे फीचर्स या फोनमध्ये मिळतात. या फोनला तुम्ही अॅमेझॉनवर 43 टक्के डिस्काउंटसह केवळ 1139 रूपयांत खरेदी करू शकता.


आणखी वाचा :
जगातील अनोखे रेस्टॉरंट, नकारात्मक विचार करणाऱ्याच मंडळींचे केले जाते स्वागत
मालदीवला जाण्यापेक्षा लक्षद्विपला जाणे अधिक सुकर
लग्नासाठी हॉल निवडताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.