Home » Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोन या दिवशी होणार लाँच, धमाकेदार फीचर्ससह जाणून घ्या महत्वाची माहिती

Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोन या दिवशी होणार लाँच, धमाकेदार फीचर्ससह जाणून घ्या महत्वाची माहिती

मोटोरोला कंपनीचा लेटेस्ट फोल्डेबेल स्मार्टफोन तुम्हाला सर्वाधिक उत्तम फीचर्स देणार आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Motorola Razr 50 Ultra
Share

Tech News : जर तुम्ही दीर्घकाळापासून मोटोरोला कंपनीचा फोल्डेबल फोन लाँचिंग करण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. खरंतर, मोटोरोला कंपनीकडून आपला फोल्डेबेल फोन Motorola Razr 50 Ultra भारतात येत्या 4 जुलैला लाँच करण्याच्या तयारीत आहे. मोटोरोलाच्या या फोनच्या लाँचिंगआधी याचे काही डिटेल्स लीक देखील झाले होते.

Motorola Razr 50 Ultra एक क्लॅमशेल स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंससंबंधित काही नवे फीचर्स दिले जाणार आहेत. याशिवाय फोनमध्ये अॅडॅप्टिव्ह स्टॅबेलाइजेशन, अॅक्शन शॉट, इंटेलिजेंट ऑटो फोकस ट्रॅकिंग, फोटो एनहांसमेंट प्रो, सुपर झूम, कलर, ऑप्टिमाइजेशन, स्टाइल सिंक आणि आर्टिफिशिअल इंटेलिजेंस मॅजिक कॅनव्हससारखे फीचर्स मिळणार आहेत. भारतात स्मार्टफोन लाँच होण्याआधी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Motorola Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन
फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास टिप्सटर Steve Hemmerstoffer यांनी म्हटले की, Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोनमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 999 युरो आहे. जी भारतीय चलनात 83 हजार रुपयांच्या आसपास आहे. गेल्या वर्षात जेव्हा Razr 40 Ultra लाँच केला होता तेव्हा त्याची किंमतही तेवढीच ठेवण्यात आली होती. या फोनला तीन रंगांच्या ऑप्शनमध्ये खरेदी करता येऊ शकते. (Tech News)

फोनमधील अन्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास उत्तम परफॉर्मेन्ससाठी Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट मिळण्याची अपेक्षा आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय फोनमध्ये 3.6 इंचाचा कव्हर डिस्प्ले आणि 6.9 इंचाचा इनर डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी USB Type-C चार्जिंग सपोर्ट करु शकते.


आणखी वाचा :
भारतात Meta AI लाँच, WhatsApp वर असा करा वापर
‘या’ लघुग्रहामुळे पुन्हा एकदा पृथ्वीवरील सजीवांना धोका

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.