Tech News : गुगलने 14 मे ला आपला मेगा इवेंट गुगल I/O 2024 चे आयोजन केले होते. याचा मुख्य उद्देश आर्टिफिशिअल इंटेलिजेंस होता. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कार्यक्रमाची सुरुवात जेमिनी आर्टिफिशिअल इंटेलिजेंसपासून केली. यापैकीच एक प्रोजेक्ट अस्र आहे. याच्या कॅमेऱ्यात पाहिली गेलेली प्रत्येक गोष्ट सविस्तर पद्धतीने कळणार आहे. याचा एक डेमो गूगलने आपल्या इवेंटवेळी देखील दाखवले.
काय आहे प्रोजेक्ट अस्र?
प्रोजेक्ट अस्र कंपनीचा एक नवा प्रोजेक्ट आहे. याचा उद्देश एक फ्यूचर आर्टिफिशिअल इंटेलिजेंस असिस्टेंट क्रिएट करणे आहे. असे म्हटले जात आहे की, हा प्रोजेक्ट काही ओपन एआयच्या जीपीटी4o सारखा आहे. जो तुमच्या फोनच्या कॅमेरासारखा असणार असून तुमच्या आसपासच्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. गुगल डीपमाइंडने आपल्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
युजरने विचारला प्रश्न
व्हिडीओची सुरुवात एक ऑडिओ जनरेट करणाऱ्या डिवाइसबद्दलच्या प्रश्नाने होते. यामध्ये एक महिला युजर जेमिनीला सांगताना दिसून येतेय की, तू एखादी आवाज असणारी वस्तूबद्दल सांग. यावर जेमिनी म्हणते की, मी एक स्पीकर पाहिला आहे. जो साउंडसाठी वापरला जातो. (Tech News)
महिला युजर यानंतर स्पीकरच्या पार्टबद्दल प्रश्न विचारते. याबद्दल जेमिनी लगेच उत्तर सांगते. धक्कादायक बाब अशी की, त्यावेळी कॅमेऱ्यामध्ये क्षेत्र दाखवले जाते. युजर विचारते हे कोणते क्षेत्र आहे. यावर जेमिनी योग्य उत्तर देतो.
