कोणतीही प्रॉपर्टी खरेदी अथवा विक्री केल्याने उत्पन्नात वाढ होते. यामुळे तुम्हाला टॅक्सची रक्कम अधिक भरावी लागते. अशातच तुम्ही जुनं घर विक्री करुन नवं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधित इनकम टॅक्सचे नियम जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तुम्ही टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स दिला नाही तर इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या विरोधात कारवाई करु शकते. (Tax saving on property)
प्रॉपर्टी खरेदी अथवा विक्री केल्यानंतर टॅक्स द्यावा लागतो. मात्र तुम्ही आपली परंपरांगत चालत आलेली प्रॉपर्टी विक्री करत असाल तर इनकम टॅक्स संबंधित वेगळे नियम लागू होतात. अशातच प्रॉपर्टी खरेदी अथवा विक्री करण्यासंदर्भातील नियमांसह टॅक्स पासून कसा बचाव कराल हे सुद्धा सांगणार आहोत.
वडिलोपार्जित प्रॉपर्टी विक्रीसाठी टॅक्सचे नियम
वारसाने मिळालेली प्रॉपर्टी ठेवल्यास कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. मात्र काही राज्यांमध्ये अशा प्रॉपर्टीच्या कागदपत्रांसाठी काही शुल्क घेतला जातो. पण याचा टॅक्सशी काहीही संबंध नाही.जर तुम्ही ही प्रॉपर्टी भाड्याने देऊन कमाई करत असाल तर ते तुमच्या उत्पन्नाच्या रुपात पाहिले जाते. त्यामुळे त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल.
प्रॉपर्टी विक्री केल्यानंतर किती लागतो टॅक्स?
जेव्हा तुम्ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी विक्री करता तेव्हा त्यावर लॉन्ग टर्म अथवा शॉर्ट टर्मच्या हिशोबाने टॅक्स लावला जातो. ज्याला कॅपिटल गेन टॅक्स असे म्हटले जाते. प्रॉपर्टी विक्री केल्यानंतर कॅपिटल गेनच्या मते टॅक्स कॅल्युलेशन केले जाते आणि त्याच आधारावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. खरंतर तुम्हाला टॅक्स बचाव करण्याचा ऑप्शन मिळतो. तुमची वडिलोपार्डित प्रॉपर्टी विक्री केल्यानंतर जे कॅपिटल गेन होते आणि त्यावर टॅक्स बचाव करण्यासाठी तुम्ही एखाद्या दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करु शकता.(Tax saving on property)
हे देखील वाचा-रोख रक्कमेने व्यवहार करत असाल तर व्हा सावध! इनकम टॅक्स विभागाकडून येऊ शकते नोटीस
कॅपिटल गेनला आयटीआर मध्ये सहभागी करा
जेव्हा तुम्ही वडिलोपार्जित विक्री केल्यानंतर त्यावर होणारी कमाईला इनकम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवणे गरजेचे आहे. कोणतीही प्रॉपर्टी विक्री केल्यानंतर कॅपिटल गेन झाल्यास ते आयटीआर मध्ये जरुर दाखवावे. असे न केल्यास तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंट टॅक्स चोरी संदर्बात कारवाई करु शकता. यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला कॅपिटल गेनवर इनकम टॅक्स देणे गरजेचे आहे.