Home » केट यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरु…

केट यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरु…

by Team Gajawaja
0 comment
Catherine
Share

अखेर केट मिडलटन, प्रिन्सेस ऑफ वेल्सच्या आजाराचे कोडे उलगडले आहे.  खुद्द केटनेच सोशल मिडियाच्या मार्फत यासंदर्भात माहिती दिली आणि तिची कॅन्सरबरोबर लढाई सुरु असल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले. जानेवारीमध्ये केटवर शस्त्रक्रिया करण्यात आली.  त्यानंतर केट सोशल मिडियापासून गायब झाली.  राजघराण्याच्या समारंभातही केट दिसेनाशी झाल्यावर तिच्याबाबत चर्चा सुरु झाली.  दरम्यान तिचा पती प्रिन्स विल्यम याच्या प्रेमप्रकरणाची बातमीही पुढे आली.  केट यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली.  (Catherine)

पण या सर्व चर्चांना विराम देण्यासाठी खुद्द केटलाच पुढे यावे लागले.  केट मिडलटनं कॅन्सर झाल्याचे सांगून केमोथेरपी सुरु असल्याचे सांगितले आहे.  यासाठी केटनं एक छोटासा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.  ही बातमी आल्यावर केटच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ब्रिटिश जनता केटला भावी राणीच्या रुपात बघत आहे.  राजघराण्यातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिचा समावेश होतो.  याच केटला कॅन्सर झाल्याचे ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.  (Catherine)

प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटनवर (Catherine) जानेवारीमध्ये पोटाची मोठी शस्त्रक्रिया झाली होती.  त्यानंतर तीने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे टाळले होते.  त्याचे कारण आता स्पष्ट झाले आहे.  शस्त्रक्रियेनंतर केटला कर्करोग झाल्याचे निदान झाले असून ती आता केमोथेरपी घेत आहे.  प्रिन्सस केट आणि ब्रिटिश सिंहासनाचा वारसदार प्रिन्स विल्यम हे आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं.  त्यामुळेच गेल्या तीन महिन्यापासून गायब असलेल्या केटबद्दल अनेक चर्चा सुरु झाल्या.  त्यात केटचा मुलांसोबत आलेल्या फोटोमध्ये केटनं आपली अंगठी घातली नव्हती.  ब्रिटीश जनतेनं या फोटोवर टीका केली.  तसेच प्रिन्स विल्यमच्या वागण्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले.  या सर्वांना आता उत्तर देण्यासाठी केटच पुढे आली.  तिनं एक व्हिडिओ संदेश आपल्या चाहत्यांना दिला आहे.  त्यात कॅन्सर झाल्याचे सांगून मी ठीक आहे आणि दिवसेंदिवस यातून सावरत आहे, असे सांगितले.  केटला कुठला कॅन्सर झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.  मात्र या सर्वात तिचे वैद्यकीय अहवालाचीही चोरी करण्याचा प्रकार झाला.  ब्रिटीश राजघराण्यात यासंदर्भात गोपनीयता घेण्यात येत होती.  मात्र केट संदर्भात चालू असलेल्या सोशल मिडियातील वादळामुळे अखेर तिलाच पुढे यावे लागले.  

ब्रिटनच्या राजघराण्याकरिता हा कठीण काळ आहे. गेल्यावर्षी  किंग चार्ल्स यांना देखील प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे.  त्यांच्यावर राजवाड्यातच उपचार सुरु असून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे बंद केले आहे.  प्रिन्सेस केट आणि प्रिन्स विल्यम यांना प्रिन्स जॉर्ज, राजकुमारी शार्लोट, प्रिन्स लुईस अशी तीन मुलं आहेत.  त्यातील लुईस अवघ्या पाच वर्षाचा आहे.  आईच्या आजाराचा मुलांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून ब्रिटीश राजघराण्यानं ही बातमी दडवून ठेवल्याचे सांगण्यात येते. (Catherine)

केटने फेब्रुवारीच्या अखेरीस केमोथेरपी सुरू केली.  आता मुलांच्या शाळेच्या इस्टरच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे तिने आणि विल्यमने केटच्या आरोग्याची बातमी जाहीर करण्याचे निश्चित केले.  प्रिन्सेस केटचा हा व्हिडिओ जाहीर झाल्यावर अनेकांना धक्का बसला आहे.  त्या व्हिडिओच्या माध्यमातून  केटच्या लाखो चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे.  यात उल्लेखनीय म्हणजे, प्रिन्स विल्यमचा धाकटा भाऊ प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल यांचीही प्रतिक्रीया आली आहे.  या घटनेमुळे या दोघांनाही धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

============

हे देखील वाचा : पृथ्वीच्या पोटात दडलंय तरी काय ? 

============

शिवाय, प्रिन्सेस केट (Catherine) लवकरच बरी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही केटला  आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन तुमची शक्ती आम्हा सर्वांना प्रेरणा देते असा संदेश दिला आहे.  या सर्वांत प्रिन्सेस केट मिडलटनचे वैद्यकीय रेकॉर्ड हॉस्पिटलमधून लीक झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.  ब्रिटन राजघराण्यातर्फे याचा स्वतंत्ररित्या तपास सुरु झाला आहे.  याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांची चौकशी झाली असून सोशल मिडियावर केटसंदर्भात येणा-या चर्चांना उत्तर देण्यासाठी हे अहवाल करोडो रुपयांना विकल्याचा आरोप आहे.  ब्रिटनमध्ये रुग्णाची वैद्यकीय कागदपत्रे रुग्णाच्या संमतीशिवाय पाहणे गुन्हा आहे.  त्यामुळे संबंधितांवर त्या कायद्यान्वे कारवाई करण्यात येणार आहे.  

सई बने..


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.