आज अभिनेत्री प्रिया मराठेचे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामुळे निधन झाले. प्रिया मागील अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी लढत होती. मात्र तिची झुंज अपयशी ठरली आणि आज ३१ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनाच्या बातमीमुळे इंडस्ट्रीतील कलाकारांसोबतच प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला. वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी प्रियाच्या या अकाली एक्सिटमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रियाने मराठीसोबतच हिंदी मालिकाविश्वात देखील आपला ठसा उमटवला होता. तिने मराठी, हिंदीमधील गाजलेल्या मालिकांमध्ये दमदार आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या. मात्र आजची प्रिया मराठेंच्या निधनाची बातमी चटका लावून जाणारी आहे. (Marathi News)
मात्र आज प्रियाच्या निधनानंतर एक प्रश्न आ विसरून उभा आहे, तो म्हणजे अजूनही महिला आपल्या आरोग्याची काळजी नीट का घेत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना विशेषकरून ३० शी ओलांडलेल्या महिलांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. वेळोवेळी आरोग्य तपासणी करत दररोज आपल्या शरीराचे त्यात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, कोलन कॅन्सर या तीन कॅन्सरचा जास्त धोका असतो. त्यामुळे महिलांनी कायम घरासोबत, कुटुंबासोबतच स्वतःची काळजी घेणे दिवसेंदिवस अधिकच महत्वाचे होत आहे. जाणून घेऊया या तिन्ही कॅन्सरच्या लक्षणांबद्दल आणि खबरदारीबद्दल. (Todays Marathi Headline)
गर्भाशयाचा कॅन्सर
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्वायकल कॅन्सर. सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. पण, हळूहळू शरीरातून पांढरा स्त्राव होणे, योनीमार्गातून दुर्गंधी येणे, लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे आदी लक्षणे दिसतात. हा कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो, म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतात. एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) हा विषाणू शरीरात पसरल्यामुळे सर्वायकल कॅन्सरची समस्या दिसून येते. त्याशिवाय आनुवंशिकता हेही याचे प्रमुख कारण आहे. (Top Marathi News)
सर्वायकल कॅन्सरची लक्षणे
– अनियमित मासिक पाळी
– वजन कमी होणे
– गर्भाशयातून पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव होणे
– वारंवार लघवीला होणे
– छातीत जळजळ होणे
– जुलाबाचा त्रास होणे
– भूक न लागणे किंवा जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे
– खूप जास्त थकवा जाणवणे
– ओटीपोटात खूप वेदना होणे किंवा सूज येणे
– बऱ्याच वेळेस थोडा ताप येणे आणि सुस्त वाटणे
– शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव होणे
– मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे
स्तनांचा कॅन्सर
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. आकडेवारी दर्शवते की दरवर्षी जगभरात सुमारे २.१ दशलक्ष महिलांना स्तनाचा कर्करोग होतो. स्तनाचा कर्करोग ही अशी स्थिती आहे जिथे विशिष्ट जनुकांमधील बदलांमुळे स्तनाच्या पेशी विभाजित होतात, वाढतात आणि अनियंत्रितपणे पसरतात. (Latest Marathi News)
स्तनांच्या कॅन्सरची लक्षणे
– असामान्य गाठी किंवा सूज येणे
– श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत दुखणे
– अचानक वजन कमी होणे आणि भूक न लागणे
– न्यूरोलॉजिकल लक्षणे -स्तनाच्या कर्करोगाचा हा टप्पा मेंदूपर्यंत पसरू शकतो. वारंवार डोकेदुखी, झटके येणे, समन्वय किंवा संतुलनात अडचणी येणे, स्मरणशक्तीच्या समस्या किंवा दृष्टी किंवा बोलण्यात बदल ही लक्षणे असू शकतात. (Top Trending News)
========
Priya Marathe : अतिशय फिल्मी आहे प्रिया-शंतनूची प्रेमकहाणी
========
महिलांनी कोणती काळजी घ्यावी?
शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या शरीराचे थोड्या थोड्या काळाने नीट निरीक्षण करावे. शहरात होणारे बदल नजरेआड न करता त्याची नोंद घ्या. शिवाय नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्या. दररोज संतुलित, सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. जर तुम्हाला मद्यपान, तंबाखू किंवा धूम्रपान करण्याची सवय असेल तर आजच या सवयी बंद करा. ताण-तणावावर नियंत्रण ठेवा. यासाठी मेडिटेशन, योगाचा आधार घ्या. मुख्य मी म्हणजे शरीरात कोणताही बदल जाणवल्यास लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics