मुघल सम्राट शाहजहानने हे 1632 मध्ये त्याची आवडती पत्नी मुमताज महलच्या आठवणीसाठी ताजमहालची निर्मिती केली. 42-एकर जागेमध्ये पसरलेल्या या संगमरवरी वास्तूला बघण्यासाठी जगभरातील लाखो, करोडो पर्यंटक येतात. आकडेवारीनुसार दरवर्षी 7 ते 8 दशलक्ष पर्यटक येतात, त्यापैकी 0.8 दशलक्षाहून अधिक परदेशी पर्यटक असतात. विशेषतः ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात पर्यटकांची संख्या वाढते. कारण या महिन्यात ताजमहल संध्याकाळी पाहिल्यास अधिक सुंदर दिसतो. सूर्य अस्ताला जातांना ताजमहल बघणे म्हणजे, एक सूरमयी शाम असते. ही सूरमयी शाम अधिक रम्य होण्यासाठी पर्यटक एका विशिष्ट ठिकाणी गर्दी करायचे. पर्यटक जिथे जमायचे ही जागा एका स्थानिक शेतक-याची होती. मात्र ती जागा पर्यटनाच्या नावावर त्याच्याकडून हडप करण्यात आली होती. या जागेला परत मिळवण्यासाठी मग या शेतक-यानं न्यायालयात तब्बल 40 वर्षांचा लढा दिला. आता या लढ्याचा निकाल शेतक-याच्या बाजुनं लागला आहे. (Taj Mahal)
आपली पूर्वापार जमिन परत मिळाल्याचा आनंद या शेतक-यानं व्यक्त केला असून आपल्या शेतजमिनीला त्यांनी नांगरुन या लढ्यातील विजय साजरा केला आहे. ताजमहाल बघणे हे अनेकांचे स्वप्न असते. असाच चांदण्यांच्या प्रकाशात ताजमहाल बघायला मोठी गर्दी होते. या संध्याकाळच्या ताजमहाल दर्शनाला सूरमयी शाम असे म्हणतात. गेल्या चाळीस वर्षापासून ही सूरमयी शाम एका जागेतून पर्यटक अनुभवत असत. मात्र आता ही शाम ज्या जागेवर होत होती ती जागा एका शेतक-याची होती. या शेतक-यानं सनदशीर मार्गानं कसा न्याय मिळवून घेतला, ही कथा जाणण्यासारखी आहे. मुन्ना लाल असे या शेतक-याचे नाव आहे. त्याला 40 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर त्याची 42 एकर जमिन परत मिळाली आहे. ताजमहालाजवळील यमुना नदीच्या पलीकडे असलेल्या इलेव्हन स्टेअर्स पार्कची जमीन आपली आहे, असा दावा मुन्ना लाल यांनी केला होता. मुन्ना लाल यांची ही जमीन 1976 मध्ये नागरी सीलिंग कारवाईत जप्त करण्यात आली होती. ताजमहाल बघण्यासाठी येणारे हजारो पर्यटक याच उद्यानात उभे राहून सूर्यास्ताच्यावेळी ताज बघत असत. (Social News)
मुन्ना लाल यांनी या सर्व जमिनीवर आपला हक्क सांगितला. ही जमिन वारसा हक्कानं आपली असून त्यासंबंधी पुरावेही असल्याचा दावा त्यांनी केला. या वडिलोपार्जित जमिनीसाठी लाल यांनी 40 वर्षे चाललेली न्यायालयीन लढाई जिंकली आहे. हा विजय मिळवल्यावर मुन्ना लाल यांनी या उद्यानाची जागा ट्रॅक्टरने नांगरुन त्याच्या बाजुने स्वतंत्र कुंपण घातले आहे. तसेच त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही या जागेवर जाण्यासाठी बंदी घातली आहे. यासंदर्भात मुन्ना लाल सांगितात की, त्यांचे वडील आणि काका या जमिनीचे नोंदणीकृत भाडेकरू होते. ही जमीन 1976 मध्ये नागरी सीलिंग कारवाईत गेली. 1998 आणि 2020 मधील जिल्हा न्यायालयाची कागदपत्रे लाल यांच्याकडे आहेत. याच कागदपत्रांच्या आधारे त्यांनी ही कायदेशीरलढाई जिंकल्याचे सांगितले. 2023 मध्ये याच इलेव्हन स्टेअर्स पार्कमध्ये ताजमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (Taj Mahal)
======
हे देखील वाचा : अमेरिकेत दिवाळीनंतर कोण साजरी करणार दिवाळी !
====
यापूर्वी 1997 मध्ये ग्रीक संगीतकार यानी यांची संगीत मैफलही येथे आयोजित करण्यात आली होती. मुघल सम्राट हुमायूनने या जागेचा उपयोग वेधशाळा म्हणून केल्याची माहिती आहे. मुन्ना लाल यांनी ही जमिन आपल्या ताब्यात घेतली असली तरी या जागेतून पर्यटकांना सूर्यास्त दाखवणा-या गाईड्ची खरी गैरसोय झाली आहे. टुरिस्ट गाईड्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस शकील चौहान यांनी पर्यटक या उद्यानात उभे राहून सूर्यास्ताच्या वेळी ताजमहालचे विलोभनीय दृश्य पाहत असत. आता हिच जागा नसल्यानं पर्यटकांची सायंकाळची गर्दी कमी होत जाणार आहे. कारण मुन्ना लाल यांनी या जागेवर पर्यटकांना आत प्रवेश नसल्याचे ठळक बोर्डही लावले आहेत. ऐतिहासिक मेहताब बागेला लागून असलेली ही जमिन आहे. तेथे उभारण्यात आलेल्या उद्यानात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. आता या सर्वांवर बंदी येणार आहे. मात्र मुन्ना लाल आणि त्यांच्या कुटुंबियांचा न्यायालयीन लढा मात्र सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. (Social News)
सई बने